अमेरिकी डॉलर कमकुवत झाल्याने सोन्याला झळाळी

अमेरिकी डॉलर कमकुवत झाल्याने सोन्याला झळाळी

मुंबई, ३१ ऑगस्ट २०२०: मागील आठवड्यात स्पॉट गोल्डमध्ये सुमारे १.१ टक्क्यांची वाढ नोंदवली. अमेरिकी सरकारच्या डोविश दृष्टीकोनाचे हे परिणाम असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले. अमेरिकी डॉलरची कमकुवतता आणि कमी व्याज दर आणि भरपूर उत्तेजनाची अपेक्षा हे मुख्य मुद्दे असून गुंतवणुकदार यामुळेच सोन्यकडे आकर्षित होतात. जेरोम पॉवेल यांनी रोजगाराला चालना मिळण्याकरिता आणि महागाई कमी करण्याकरिता आखलेल्या नवीन धोरणामुळे अमेरिोच्या तिजोरीत चांगली वाढ झाली आहे. यामुळे बाजारातील भावनांना आधार मिळाला असून त्याचा परिणाम सोन्यातील नफ्यावर झाला. अमेरिकेचे कोरोना मदत विधेयक संसदेत अजूनही कठीण स्थितीत आहे.

तथापि, डॉलरची कमकुवत किंमत आणि डोव्हिश स्टान्समुळे गुंतवणुकदारांसाठी सोने आकर्षित करणारे ठरले. एमसीएक्सवर आज सोने उच्चांक गाठण्याची अपेक्षा आहे.

कच्चे तेल: मागील आठवड्यात, कच्चे तेल ०.९२ टक्क्यांनी वधारले आणि अमेरिकेतील मालसाठ्यात घट झाली. मागील आठवड्यात दोन सारख्या वादळांनी तेलाच्या किंमतींना बराचसा आधार मिळाला. उष्णकटिबंधीय वादळ आणि चक्रीवादळ मार्कोचे संकट आले, त्यामुळे मेक्सिकोच्या आखातत बहुतांश तेलाचे उत्पादन बंद पडले. दररोज सुमारे १.५६ दशलक्ष बॅरलचे उत्पादन ठप्प होते, जे गल्फ मेक्सिको तेल उत्पादनाच्या सुमारे ८४% आहे.

एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या ताज्या माहितीनुसार, अमेरिकेतील कच्च्या तेलाच्या मालसाठ्यात मागील आठवड्यात ४.७ दशलक्ष बॅरलची घट झाली. ती ३.७ दशलक्ष बॅरल एवढीच होणे अपेक्षित होते. महामारी तसेच नव्याने संसर्ग झालेल्या रुग्णांतील वाढीमुळे कच्च्या तेलाचा नफा मर्यादित राहिला.

बेस मेटल: मागील आठवडा एमसीएक्सवरील बेस मेटलकरिता  सकारात्मक ठरला कारण त्यापैकी अनेक धातू उच्चांकी स्थितीत होते. निकेल हा मागील आठवड्यात सर्वाधिक नफा कमावणारा ठरला. चिनी कारखान्यांमधील काम सुरू झाल्याने धातूंचीही गरज वाढली. डॉलरच्या किंमतीत घट हा धातूंच्या

किंमतींना आधार देणारा एक पैलू आहे.

चीन आणि अमेरिकेदरम्यानच्या व्यापार करारातील पहिल्या टप्प्याची निश्चिती हे औद्योगिक मेटलच्या किंमती वाढण्याचे आणखी एक कारण आहे. चीन हा साथीच्या आजारातून मुक्त झाला असून स्टीलची वाढही वेगाने होत आहे.

तांबे: मागील आठवड्यात एलएमई तांबेदेखील १ टक्क्याने वाढले. अधिक प्रोत्साहनाच्या अपेक्षेने लाल धातूच्या किंमतीत आणखी वाढ झाली. एलएमई तांबे यादीत, ८९,३५० टन खाली गेली आहे, जी मागील आठवड्यातील १४ वर्षातील सर्वात कमी पातळी आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE