आपल्या घरात आरामात बसून घ्या ‘ड्रीम11 आयपीएल 2020’चा आनंद

 आपल्या घरात आरामात बसून घ्या ड्रीम11 आयपीएल 2020’चा आनंद

आयपीएलचा यंदाचा हंगाम मनोरंजक  आनंददायक बनविण्यासाठी काही टिपा

ड्रीम11 आयपीएल हे गेल्या 10 वर्षांपासून भारतीयांसाठी कायमस्वरुपी मनोरंजन झाले आहे. या स्पर्धांची लोकप्रियता दरवर्षी विलक्षण गतीने वाढत आहे. पुढील हंगाम कधी येतोयाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात असतात. यंदाच्या आयपीएलबाबत अनेक चर्चा होऊन आता 13 वा हंगाम या महिन्यापासून पुन्हा सुरू होत आहे. येत्या 19 सप्टेंबर रोजी संयुक्त अरब अमिरातीमध्ये त्याचा शुभारंभ होणार आहे.

क्रिकेटच्या चाहत्यांना यंदा स्टेडियममधील उर्जा व जल्लोष अनुभवता येणार नसलातरी घरात बसून टिव्हीवर सामना पाहण्याचा अनुभव तितकाच आनंददायक बनविण्यासाठी आपण बरेच काही करू शकता.

एचडी चॅनेलवर अपग्रेड व्हा : आपल्या ड्रीम11 आयपीएल 2020’ हंगामाचा आनंद लुटण्यासाठी व खेळाची मजा अनुभवण्यासाठी सर्वप्रथम आपल्या टिव्हीवर एचडी चॅनेल कार्यान्वित करा (आपल्याकडे अगोदर हे चॅनेल नसेल तर). एचडी प्रक्षेपणातून आपल्याला सामने अधिक स्पष्ट व ठसठशीतपणे दिसतीलतसेच त्यातील उत्कृष्ट ग्राफिक्समुळे एकूण सामना पाहण्याचा अनुभव अधिक समृद्ध व आरामदायक बनेल. आपण क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये नसलाततरी एचडी चॅनेलच्या पिक्चरच्या गुणवत्तेमुळे आपल्याला आवडत्या क्रिकेट स्टार्ससह प्रत्यक्षात तिथे असल्यासारखे वाटेल.

सकस आहार घ्या : ‘लीगचा आनंद घेत असताना सकसपौष्टिक खाद्यपदार्थांवर भर द्या. तंदुरुस्त आणि उत्साही राहण्यासाठी स्वच्छ आणि निरोगी अन्न खा.

शारिरीक हालचाली करा : स्टेडियमच वातावरण घरात निर्माण करण्यासाठी सतत जल्लोष करा. आपल्या आवडत्या खेळाडूने चौकार किंवा षटकार मारलातर उत्साहाने उभे राहा. खेळातील मध्यंतराच्या काळात जागेवरून उठून फिराएखादा खेळाडू बाद झालातर उड्या मारा. यातून आपल्याला संपूर्ण सामन्यात सक्रिय राहण्या मदत होईल.

कौटुंबिक वेळ : प्रत्येक सामना कुटुंबासमवेत पाहण्याचा आनंद घ्या. वातावरण मनोरंजक बनविण्यासाठी आपल्या भावंडांच्या आवडीच्या संघाच्या विरोधात असलेल्या संघाशी निष्ठा ठेवा. अर्थात अस असल तरीएकत्रित जल्लोष करणारे कुटुंबच एकत्र राहतेहे लक्षात ठेवा.

मित्र आणि सहकाऱ्यांना आभासी स्वरुपात भेट : गेल्या काही महिन्यांत आपण कदाचित आपल्या मित्रांना आणि सहकार्‍यांना वैयक्तिकरित्या भेटला नसालतर आता त्यांच्याबरोबर एकत्रितपणे "चिल" करण्यासाठी आणि ड्रीम11 इंडियन प्रीमियर लीग 2020’चा आनंद घेण्यासाठी ही उत्तम संधी आली आहे.


Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth