आकाश इन्स्टीट्युटची जेईई मेन्स 2020 करिता प्रभावी निकालांची नोंद; 100

 आकाश इन्स्टीट्युटची जेईई मेन्स 2020 करिता प्रभावी निकालांची नोंद; 100 


टक्के मिळवत 3 विद्यार्थी देशात अव्वल आणि 9 विद्यार्थ्यांची राज्यात बाजी   

  • राज्यातील 9 टॉपरपैकी 6 मुली दिल्ली एनसीटी, पश्चिम बंगाल, ओडीशा, मध्य प्रदेश, पंजाब आणि हिमाचल प्रदेश येथील   
  • 100 टक्के मिळवलेल्या 3 विद्यार्थ्यांपैकी 2 विद्यार्थी दिल्ली एनसीटी तर 1 राजस्थान येथील   

 

13 सप्टेंबर 2020:  परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून अव्वल सेवा देणारी संस्था म्हणून राष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असलेल्या आकाश इन्स्टीट्युटने ऐतिहासिक निकालांची नोंद केली आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील स्पर्धा परीक्षा जेईई मेन्स 2020 (सप्टेंबर) करिता या संस्थेच्या 9 विद्यार्थ्यांनी राज्यात अव्वल येण्याचा विक्रम केला असून 3 आकाशियन (आकाश संस्थेचे विद्यार्थी) नी 100 टक्के मिळवून घवघवीत यश मिळवले आहे. या परीक्षेचा निकाल काल रात्री घोषित झाला.    

आकाश इन्स्टीट्युटमध्ये क्लासरूम कोर्सचे चिराग फॅलोर (AIR-12) 100 टक्के (296/300); त्यापाठोपाठ 99.99 टक्केवारी समवेत सूरज श्रीनिवासन (AIR-34)99.99 टक्केवारी समवेत अव्वल अमिल(AIR 43); 99.99 टक्केवारी समवेत पेरीत पालिवाल (AIR 75)99.99 टक्केवारी मिळवत इरा सारडा (AIR-79) आणि 99.99 टक्क्यांसोबत शिखर अगरवाल टॉप स्कोअरर ठरले. 

भारतातील एकूण 9 आकाशियन त्यांच्या राज्यांत अव्वल ठरले आहेत. आकाश क्लासरूम तसेच डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम (डीएलपी) कोर्ससह महिला गटात 6 विद्यार्थिनी अव्वल आल्या. टॉपर मुलींमध्ये इरा सारडा (क्लासरूम, AIR-79) हिने दिल्ली एनसीटीमधून 99.99 टक्के मिळवले; पश्चिम बंगाल येथून 99.99 टक्के मिळवत श्रीमंती डे (क्लासरूम, AIR-131); मध्य प्रदेश येथून 99.98 टक्क्यांचे यश गाठत श्रिया मोघे (क्लासरूम, AIR-241); तर हिमाचल प्रदेशमधून 99.83 टक्केवारी कमावत वंशिता; 99.98 मिळवत ओडीशा येथील स्थितीप्राजना साहू (आकाश डीएलपी, AIR-188); आणि पंजाबमधील आनंद कौर (आकाश डीएलपी, AIR-610) 99.95 टक्के मिळवत यशस्वी ठरल्या आहेत. 

अन्य राज्यांमधून अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये केंद्रशासित लडाखचा परवेझ मेहदी (क्लासरूम) याने  96.52 टक्के मिळवले; केरळच्या अद्वैत दीपक (आकाश डिजीटल, AIR-95) याने 99.99 टक्क्यांची कमाई केली  तसेच ओडीशा येथील सौरभ सौम्यकांता दासने 99.99 टक्के संपादित करत  (आकाश डीएलपी, AIR-128) यश मिळवले आहे. 

राजस्थानमधील पार्थ द्विवेदी (डीएलपी कोर्स, AIR-14) आणि दिल्ली एनसीटी यथील निशांत अगरवाल (AIR-21) या आकाश डीएलपीच्या दोन विद्यार्थ्यांनी 100 टक्के मिळवले. डीएलपीच्या अन्य अव्वल विद्यार्थ्यांमध्ये हरियाणाचा अमन बन्सल (AIR-55) याने  99.99 टक्केवारीचंडीगडच्या करण जैन (AIR-94)  याने 99.99 टक्के;तसेच राजस्थानमधील नमन सिंह राणा (AIR-97) याने 99.99 टक्क्यांची कमाई केली. 

आकाश डिजीटलमध्ये केरळच्या अद्वैत दीपक समवेत राजस्थानमधील वैभव साहा (AIR-39) याने 99.99 टक्के कमावले.  

आपल्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशाविषयी त्यांचे अभिनंदन करत आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (AESL) चे संचालक आणि सीईओ आकाश चौधरी म्हणाले की : “जेईई मेनचे प्रभावी निकाल हे आकाश’मधील गुणी शिक्षण वर्ग, अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण यांची एकत्रित पावती आहे. परीक्षा सराव सेवा क्षेत्रात जेईई मेन्स परीक्षेतील सर्वोत्तम निकालांची नोंद संस्थेच्या नावावर जमा झाली.  जेईई मेन्स परीक्षांमध्ये सर्वोत्तम कामगिरी बजावणाऱ्या आमच्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन! आमच्या विद्यार्थ्यांनी घेतलेली कठोर मेहनत, कुटुंबीय तसेच आमच्या शिक्षक वर्गाचे पाठबळ, त्याचप्रमाणे आकाश इन्स्टीट्युटमध्ये चाचणी परीक्षांकरिता करून घेण्यात येणारा गुणवत्तापूर्ण सरावाला या यशाचे श्रेय जाते. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता अनेक शुभाशीर्वाद! 

देशात बी. ई./बी.टेक जेईई (मेनपरीक्षा 1-6 सप्टेंबर 2020 या कालावधीत दोन सत्रांमध्ये एनटीए च्या वतीने आयोजित करण्यात आल्या होत्या. 

विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश संपादित करण्यासाठी असणाऱ्या जिज्ञासू वृत्तीत आकाश इन्स्टीट्युट मदतीचा हात देते. या संस्थेकडे अभ्यासक्रम आणि कंटेन्ट डेव्हलमेंटकरिता सेन्ट्रलाईज्ड इनहाऊस प्रोसेस (मध्यवर्ती संस्थातंर्गत प्रक्रिया) ची सोय आहे. त्यांच्या नॅशनल अकॅडमिक टीमद्वारे शिक्षक प्रशिक्षण आणि देखरेख ठेवण्यात येते. वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या विविध प्रवेश परीक्षा किंवा एनएसटीई, केव्हीपीव्हाय आणि ऑलिम्पीयाडसारख्या स्पर्धात्मक परीक्षांकरिता एईएसएलचे विद्यार्थ्यांना वर्षानुवर्षे हमखास यश मिळत आले आहे. 

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202