किया सोनेट 6,71,000 रूपये इतक्‍या सुरूवातीच्‍या खास किंमतीमध्‍ये भारतात सादर

 

किया सोनेट 6,71,000 रूपये इतक्‍या सुरूवातीच्‍या खास किंमतीमध्‍ये भारतात सादर

·         2 ट्रिम लाइन्‍समध्‍ये सादर - टेक-लाइन ऑफरिंग एचटीई, एचटीके, एचटीके+, एचटीएक्‍स व एचटीएक्‍स+ व्‍हेरिएण्‍ट्स; आणि विभागामध्‍ये पहिल्‍यांदाच जीटी-लाइनसह जीटीएक्‍स+ व्‍हेरिएण्‍ट

·         आठ मोनोटोन व तीन ड्युअल-टोन रंगांच्‍या योजनांमध्‍ये उपलब्‍ध

·         त्रासमुक्‍त व आरामदायी ड्रायव्हिंगसाठी विभागातील पहिलेच डिझेल सिक्‍स-स्‍पीड ऑटोमॅटिक व क्रांतिकारी इंटेलिजण्‍ट मॅन्‍युअल ट्रान्‍समिशन (आयएमटी)सह सुसज्‍ज

·         डिझेल 1.5 डब्‍ल्‍यूजीटी जीएमटीसाठी प्रतिलिटर 24.1 किमी, डिझेल 1.5 व्‍हीजीटी 6एटीसाठी प्रतिलिटर 19.0 किमी आणि स्‍मार्टस्‍ट्रीम जी1.2 5एमटीसाठी प्रतिलिटर 18.4 किमी इंधन कार्यक्षमता (प्रमाणित चाचणी स्थितींअंतर्गत)

·         आतापर्यंत 25,000 हून अधिक बुकिंग्‍ज करण्‍यात आल्‍या आहेत; आजपासून भारतभरात डिलिव्‍हरीजना सुरूवात



(नवी दिल्‍ली), 18 सप्‍टेंबर 2020 - किया मोटर्स इंडिया या किया मोटर्स कॉर्पोरेशनच्‍या पूर्णत: मालकीच्‍या उपकंपनीने आज भारतामध्‍ये त्‍यांची पहिली कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही नवीन किया सोनेट सादर केली. सोनेट एण्‍ट्री-लेव्‍हल एचटीई स्‍मार्टस्‍ट्रीम जी1.2 5जीएमटी व्‍हेरिएण्‍ट 6,71,000 रूपये (एक्‍स-शोरूम, भारतभर) पदार्पण करत आहेत. जगासाठी मेड-इन-इंडिया किया सोनेट इंजिन्‍स व ट्रिम्‍सच्‍या संदर्भात विभागामध्‍ये व्‍यापक प्रकारांसह ऑफर करण्‍यात आली आहे. एकूण सोनेट 17 व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये ऑफर करण्‍यात आली आहे, ज्‍यामध्‍ये दोन पेट्रोल इंजिन्‍स, दोन डिझेल इंजिन्‍स (डब्‍ल्‍यूजीटी व व्‍हीजीटी कन्फिग्‍युरेशन्‍स), पाच ट्रान्‍समिशन्‍स व दोन ट्रिम लेवल्‍स - टेक लाइन व जीटी-लाइनचा समावेश आहे. याव्‍यतिरिक्‍त सोनेटमध्‍ये अनेक प्रमाणित वैशिष्‍ट्ये असण्‍यासोबत किया यूव्‍हीओ कनेक्‍टच्‍या माध्‍यमातून आधुनिक इन-कार तंत्रज्ञान आहे.

कंपनीने आतापर्यंत तिच्‍या नवीन कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍हीसाठी 25,000 हून अधिक बुकिंग्‍जची नोंदणी झाल्‍याची देखील घोषणा केली, जो देशामध्‍ये विभागासाठी नवीन सुवर्ण टप्‍पा आहे. भारतीय ग्राहकांसाठी प्रथम ऑफर करण्‍यात आलेली सोनेट आंध्रप्रदेशमधील अनंतपूर येथील कंपनीच्‍या अत्‍याधुनिक उत्‍पादन केंद्रामध्‍ये निर्माण करण्‍यात आली आहे. 300,000 युनिट्सच्‍या वार्षिक उत्‍पादन क्षमतेमुळे कियाला भारतीय, तसेच आंतरराष्‍ट्रीय ग्राहकांकडून सोनेटसाठी होणा-या वाढत्‍या मागणीची सुलभपणे पूर्तता करता येईल.

किया मोटर्स इंडियाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. कूखयून शिम म्‍हणाले, ''एसयूव्‍हीला मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहता आम्‍हाला भारतामध्‍ये जगासमोर कियाची आधुनिक मेड-इन-इंडिया कार 'सोनेट' सादर करण्‍याचा अत्‍यंत आनंद होत आहे. आकर्षक किंमतीसोबत सोनेटच्‍या तरूण व मनाने तरूण असलेल्‍या ग्राहकांना आनंद व अविश्वसनीय मूल्‍याचा अनुभव मिळतो. या विभागामध्‍ये व्‍हर्च्‍युअली सर्व ग्राहकांसाठी सोनेट उपलब्‍ध असण्‍याची खात्री घेण्‍यासाठी आमचा प्रयत्‍न राहिला आहे, म्‍हणूनच ही वेईकल या विभागामध्‍ये व्‍यापक निवड म्‍हणून ऑफर करण्‍यात आली आहे. दर्जात्‍मक वैशिष्‍ट्ये, लक्षवेधक डिझाइन, अपवादात्‍मक दर्जा व आधुनिक तंत्रज्ञानासह सोनेट पुन्‍हा एकदा कियाच्‍या 'दि पॉवर टू सरप्राईज' कटिबद्धतेला नवीन रूप देते. आम्‍हाला विश्‍वास आहे की, ही वेईकल देशातील कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही विभागामध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणेल.''

ते पुढे म्‍हणाले, ''आम्‍ही या अवघड काळामधून प्रगतीच्‍या दिशेने वाटचाल करत असताना भारतामध्‍ये सोनेटचे सादरीकरण हे कोविड-19 महामारीदरम्‍यान देखील कियाच्‍या भारतीय आणि जागतिक टीम्‍सची क्षमता व अथक मेहनतीमुळे शक्‍य झाले आहे. मी अनंतपूर येथीत आमच्‍या अत्‍याधुनिक प्‍लाण्‍टमधील आमच्‍या कर्मचा-यांच्‍या प्रयत्‍नांचे देखील कौतुक करतो. त्‍यांनी देखील नवीन सोनेटच्‍या विनाव्‍यत्‍यय उत्‍पादनासाठी अथक मेहनत घेतली आहे. ज्‍यामुळे ही वेईकल देशभरातील आतुरतेने वाट पाहत असलेल्‍या ग्राहकांच्‍या घरी पोहोचू शकेल आणि त्‍यानंतर जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचेल. यामधून भारतामध्‍ये उदयास आलेली तंत्रज्ञान क्षमता व जागतिक दर्जासह प्रगत उत्‍पादने विकसित करण्‍याची कियाची कटिबद्धता दिसून येते.''

नाविन्‍यता व स्‍टायलिश लुक्‍सचे परिपूर्ण संयोजन असलेल्‍या नवीन किया सोनेटचा पवित्रा डायॅनमिक असून रचना प्रबळ व आकर्षक आहे. या वेईकलमध्‍ये कियाची लक्ष वेधून घेणा-या शैलीची खासियत, तसेच प्रि‍मिअम व उत्‍साही आकर्षकपणा समाविष्‍ट आहे. ज्‍यामुळे ही वेईकल रस्‍त्‍यावर सर्वांचे लक्ष वेधून घेते. वर्ष 2020 मधील सर्वात बहुप्रतिक्षित असलेली कार 'किया सोनेट' या विभागातील व्‍हर्च्‍युअली सर्व गरजांची पूर्तता करणा-या टेक लाइनच्‍या ड्युअल ट्रिम कन्‍सेप्‍टमध्‍ये आणि विविध इंजिन पर्यायांसह विभागातील पहिलेच जीटी-लाइनमध्‍ये ऑफर करण्‍यात आली आहे. जीटी-लाइन वैशिष्‍ट्ये सोनेटला स्‍पोर्टीनेस व शर्यतीसाठी सुसज्‍ज आकर्षकता, गतीशीलता देण्‍याची इच्‍छा असलेल्‍या ग्राहकांसाठी आहेत. 

दोन पेट्रोल इंजिन्‍स - वैविध्‍यपूर्ण स्‍मार्टस्ट्रिम 1.2-लिटर फोर-सिलिंडर व शक्तिशाली 1.0 टी-जीडीआय (टूर्बोचार्ज्‍ड पेट्रोल डायरेक्‍ट इंजेक्‍शन) दोन कार्यक्षम 1.5-लिटर सीआरडीआय डिझेल इंजिनसह (डब्‍ल्‍यूजीटी व व्‍हीजीटी कन्फिग्‍युरेशन्‍स) सादर करण्‍यात आले आहेत. सोनेट पाच ट्रान्‍समिशन पर्यायांसह येते, यामध्‍ये फाइव्‍ह- व सिक्‍स-स्‍पीड मॅन्‍युअल्‍स, सर्वोत्तम सेव्‍हन-स्‍पीड डीसीटी, सिक्‍स-स्‍पीड ऑटोमॅटिक आणि कियाचे क्रांतिकारी नवीन सिक्‍स-स्‍पीड इंटेलिजण्‍ट मॅन्‍युअल ट्रान्‍समिशन (आयएमटी) यांचा समावेश आहे. तसेच कियाचे उल्‍लेखनीय तंत्रज्ञान क्‍लच पेडल-लेस गिअरबॉक्‍ससह त्रासमुक्‍त व आरामदायी ड्रायव्हिंगचा आनंद देते आणि समकालीन मॅन्‍युअल ट्रान्‍समिशनप्रमाणे तेच ड्रायव्‍हर कंट्रोल देते. पहिल्‍यांदाच विभागामध्‍ये 1.5 सीआरडीआय डिझेल मोटर सिक्‍स-स्‍पीड ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशनसह देखील उपलब्‍ध आहे.

किया सोनेट आठ आकर्षक रंग व तीन ड्युअल टोन पर्यायांच्‍या आकर्षक निवडीसह येते. हे पर्याय शक्तिशाली डिझाइनची खात्री देतात. किया सोनेटचे इंटीरिअर्स आरामदायी व लक्‍झरीअस प्रवासाचा अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. हे इंटीरिअर्स उत्तमरित्‍या सुसज्‍ज असून त्‍यामध्‍ये वापरण्‍यास सुलभ कनेक्‍टेड इन्‍फोटेन्‍मेंट आणि क्‍लस्‍टर इंटरफेससह उच्‍च दर्जाचे साहित्‍य आहेत. कॉम्‍पॅक्‍ट एक्‍स्‍टीरिअर आकारमान असताना देखील सोनेटचे इंटीरिअर सर्व प्रवाशांना एैसपैस व मुबलक जागा देते. 

याव्‍यतिरिक्‍त किया सोनेटमध्‍ये विभागातील अनेक पहिली वैशिष्‍ट्ये आहेत, जी ग्राहकांना परिपूर्ण आराम, सोयीसुविधा, सुरक्षा व अधिकतम ड्रायव्हिंग आनंद देतात. ही वैशिष्‍ट्ये आहेत:

·         सर्वात मोठे आणि विभागातील सर्वोत्तम 10.25 इंच (26.03 सेमी) एचडी टचस्क्रिनसह नेव्हिगेशन आणि लाइव्‍ह ट्रॅफिक माहिती

·         विषाणू व जीवाणूपासून संरक्षण करणारे स्‍मार्ट प्‍युअर एअर प्‍युरिफायर

·         बोस प्रिमिअम सेव्‍हन-स्‍पीकर साऊंड सिस्‍टमसह सब-वूफर

·         हवेशीर ड्रायव्‍हर व पुढील प्रवासी आसने

·         4.2 इंच (10.7 सेमी) कलर इन्‍स्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टर 

·         एलईडी साऊंड मूड लाइट्स

·         यूव्‍हीओ कनेक्‍ट व स्‍मार्ट कीच्‍या माध्‍यमातून रिमोट इंजिन स्‍टार्ट (ऑटोमॅटिक व मॅन्‍युअल ट्रान्‍समिशन)

·         ओव्‍हर-दि-एअर (ओटीए) मॅप अपडेट्स

·         ऑटोमॅटिक मॉडेल्‍समध्‍ये मल्‍टी-ड्राइव्‍ह व ट्रॅक्‍शन मोड्स

·         वायरलेस स्‍मार्टफोन चार्जरसह कूलिंग फंक्‍शन

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24