इंदिरा आयव्हीएफ आता भारतातील 92 केंद्रांमध्ये

 इंदिरा आयव्हीएफ आता भारतातील 92 केंद्रांमध्ये

-       वंध्यत्वावरील उपचारांच्या शोधात असलेल्या जोडप्यांसाठी सहज उपलब्धता

~ आर्थिक वर्ष 2020- 2021 च्या पहिल्या सहामाहीत 4 नवी केंद्रे 

(नांदेडवारांगळसिरसा आणि गुलबर्गा)

 

मुंबई24 सप्टेंबर 2020 – इंदिरा आयव्हीएफ या भारतातील वंध्यत्व उपचार क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपनीने वाजवी आणि सर्वोत्तम दर्जाच्या वंध्यत्व उपचारांच्या शोधात असलेल्या जोडप्यांसाठी आर्थिक वर्ष 2020- 2021 च्या पहिल्या सहामाहीत तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये नांदेडवारांगळ सिरसा आणि गुलबर्गा या 4 नव्या केंद्रांचा समावेश केला आहे. उपचार केंद्रांची ही साखळी आता देशभरातील 92 केंद्रांत कार्यरत असून इच्छुक जोडप्यांना पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करत आहे.

रुग्णांच्या प्रजजन आरोग्याबरोबरच त्यांच्या स्वास्थ्याचीही काळजी इंदिरा आयव्हीएफला असल्यामुळे कंपनीने सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सर्व उपचार केंद्रे दोन महिने बंद ठेवली होती. 3 जून 2020 रोजी इंदिरा आयव्हीएफने इच्छुक जोडप्यांसाठी आपले दरवाजे परत खुले केले असून कोविड- पूर्व काळातील आयव्हीएफ प्रक्रियांची संख्या डिसेंबरपर्यंत पूर्ववत होईल अशी कंपनीला आशा वाटते. सध्या इंदिरा आयव्हीएफची सर्व केंद्रे सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत असून त्याचबरोबर केंद्राला भेट देणारे रुग्ण व कर्मचारी यांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाते.

 

या घडामोडीविषयी इंदिरा आयव्हीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. क्षितिज मुर्दिया म्हणाले, आपण अभूतपूर्व काळात जगत आहोत आणि प्रत्येक जण वेगवेगळी आव्हाने आणि अनिश्चिततेचा सामना करत आहे. संतती होऊ शकत नसल्याची भावना तणावपूर्ण असते. इच्छुक जोडप्यांसाठी वंध्यत्व उपचार प्रक्रिया परवडणारी आणि सहजपणे उपलब्ध होणारी असावी या धोरणाशी सुसंगत राहात आम्ही चार नवी केंद्रे सुरू केली आहेत.

ते पुढे म्हणाले, दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील शहरांमधून आमच्या सेवेला असलेल्या मागणीत मोठी वाढ दिसून येत आहे. आयव्हीएफ आणि वंध्यत्वाबदद्लचे ज्ञान आणि वाढत्या जागरूकतेमुळे या क्षेत्राचा विकास होऊन त्याचे उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा क्षेत्रात रुपांतर झाले आहे. तरुण व्यक्ती आणि जोडपी त्यांच्या प्रजनन क्षमतेविषयी जास्त जागरूक झाली असून त्यांचा इंदिरा आयव्हीएफमध्ये केल्या जाणाऱ्या आयव्हीएफ प्रक्रियांमध्ये मोठा वाटा आहे.

इंदिरा आयव्हीएफ आज देशातील सर्वात मोठअया आणि प्रतिष्ठित वंध्यत्व उपचार केंद्रांपैकी एक आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेल्या इंदिरा आयव्हीएफने आतापर्यंत अगणित जोडप्यांना वंध्यत्वाच्या गुंतागुंतीच्या प्रवासात मार्ग दाखवत पालक होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे.

 

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202