एसबीआय जनरल इन्शुरन्सने येस बँकेसोबत कॉर्पोरेट एजन्सी करारावर केल्या स्वाक्षऱ्या, ग्राहकांना यातून जीवन विम्याव्यतिरिक्तचे पर्याय होणार उपलब्ध

एसबीआय जनरल इन्शुरन्सने येस बँकेसोबत कॉर्पोरेट एजन्सी करारावर केल्या स्वाक्षऱ्या, ग्राहकांना यातून जीवन विम्याव्यतिरिक्तचे पर्याय होणार उपलब्ध

मुंबई, 16 सप्टेंबर 2020: एसबीआय जनरल या भारतातील आघाडीच्या जनरल इन्शुरन्स कंपनीने आणि येस बँक या खासगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकेने एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॉर्पोरेट आणि रीटेल ग्राहकांसाठी त्यांच्या रीटेल उत्पादनांचे वितरण करण्याच्या उद्देशाने कॉर्पोरेट एजन्सी करारावर सह्या केल्या आहेत. यामुळे एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीची उत्पादने आता देशातील 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांतील येस बँकेच्या ग्राहकांना उपलब्ध होतील.
एसबीआय जनरल अनेक बँका, पेमेंट अॅप्स, ईकॉमर्स कंपन्या, ब्रोकर्स यांच्याशी अर्थपूर्ण सहकार्य करून देशभरातील आपल्या वितरणजाळ्याला बळकटी देत आहे. या भागीदारीमुळे ग्राहकांना व्यापक प्रमाणातील बिगर जीवन विमा उत्पादने आणि सेवा उपलब्ध होतील आणि संपूर्ण ग्राहक मूल्य साखळीत तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांसाठी उत्कृष्ट अनुभवनिर्मिती केली जाईल.
या सहकार्याबद्दल एसबीआय जनरल इन्शुरन्सचे चीफ बिझनेस ऑफिसर अमर जोशी म्हणाले, "येस बँकेसोबतचे आमचे सहकार्य म्हणजे अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे आणि यामुळे या बँकेच्या देशभरातील शाखा आणि डिजिटल नेटवर्कमुळे आमची विमा उत्पादने व्यापक ग्राहकांपर्यंत नेणे आम्हाला शक्य होणार आहे. येस बँकेसोबत भागीदारी करताना आम्ही उत्साही आहोत. दीर्घकाळासाठी ग्राहकांना सेवा देणारा संस्मरणीय प्रवास आहे. या सहकार्यामुळे आम्हाला अगदी अंतिम ग्राहकापर्यंत पोहोचून आजवर दुर्लक्षित राहिलेल्या बाजारपेठांचा वेध घेता येईल आणि त्यामुळे विमा घेण्याचे प्रमाण वाढेल."
याप्रसंगी येस बँकेच्या रीटेल बँकिंगचे ग्लोबल हेड राजन पेंटल म्हणाले, "येस बँकेला एसबीआय जनरल इन्शुरन्ससोबत या मार्गावर पुढे जाताना आनंद होत आहे आणि आमच्या वाढत्या ग्राहकसंख्येच्या उत्क्रांत होणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी या सहकार्याचा लाभ होईल, असे आम्हाला वाटते. येस बँकेच्या शाखा आणि डिजिटल बँकिंगच्या अनोखा क्षमतांना एसबीआय जनरल या ब्रँडचे बळ आणि नाविन्यपूर्ण उत्पादनांची जोड मिळाल्याने आमच्या ग्राहकांसाठी मूल्यवर्धन होईल, यावर आमचा विश्वास आहे." येस बँकेच्या रीटेल बँकिंगचे ग्लोबल हेड श्री. राजन पेंटल आणि एसबीआय जनरल इन्शुरन्सचे चीफ बिझनेस ऑफिसर श्री. अमर जोशी यांनी या करारावर सह्या केल्या.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24