बेंचमार्क निर्देशांकांत घसरण; निफ्टी ११,६०० पातळीखाली घसरला

 बेंचमार्क निर्देशांकांत घसरण; निफ्टी ११,६०० पातळीखाली घसरला


मुंबई, १७ सप्टेंबर २०२०: आजच्या व्यापारी सत्रात, बँकिंग आणि मेटल स्टॉक्समुळे भारतीय निर्देशांकाने घसरण घेतली. रिलायन्स इंडस्ट्रीचा या घसरणीत मोठा वाटा दिसून आाला. निफ्टी ०.७६% किंवा ८८.४५ अंकांनी कमी होऊन ११,६०० च्या पातळीखाली घसरला. तो ११,५१६.१० अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.८२% किंवा ३२३.०० अंकांनी कमी होऊन ३८,९७९.८५ अंकांवर पोहोचला.


एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आज हिंडाल्को (४.३५%), टाटा मोटर्स (२.४४%), श्री सिमेंट (२.३४%), बजाज फिनसर्व्ह (२.२०%) आणि अदानी पोर्ट्स (२.०१%)हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. तर डॉ. रेड्डीज लॅबरोटरीज (४.२६%), झी एंटरटेनमेंट (२.३६%), एचसीएल टेक्नोलॉजीज (२.१६%), इन्फोसिस (०.९२%) आणि मारुती सुझूकी (०.७४%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले.


फार्मा, आयटी आणि मीडिया वगळता इतर सर्व क्षेत्रातील निर्देशांक लाल रंगात स्थिरावले. बीएसई मिडकॅप ०.२४% घसरला तर बीएसई स्मॉलकॅपमध्ये ०.५३% ची घट दिसून आली.


जेएमसी प्रोजेक्ट्स (इंडिया)लि.: कंपनीला १३४२ कोटी रुपयांच्या नव्या ऑर्डर मिळाल्या असून त्यात पूर्व आशियातील अंदाजे ७२५ कोटी रुपयांचा प्रकल्प आणि ओडिशातील पुरवठा प्रकल्पाच्या ४७१ कोटी रुपयांचा समावेश आहे. कंपनीचे स्टॉक्स ७.४५% नी वाढले व त्यांनी ५७.०० रुपयांवर व्यापार केला.


दालमिया भारत लि.: सीएलएसए या जागतिक संशोधन संस्थेने कंपनीचे शेअर खरेदी करणे सुरु ठेवल्यानंतर दालमिया भारत कंपनीचे शेअर्स ३.३१% नी वाढले व त्यांनी ७९३.०० रुपयांवर व्यापार केला. सीएलएसएने शेअर्सची खरेदी कायम ठेवली तरी लक्ष्यित किंमत १००० रुपये प्रति शेअरने कमी केली गेली.


धानुका अॅग्रीटेक लि.: कंपनीने नुकतेच १००० रुपये प्रति शेअर या अंतिम मूल्यावर १०,००,००० पर्यंत इक्विटी शेअर्सच्या खरेदीला मान्यता दिली. त्यानंतर आजच्या व्यापारी सत्रात कंपनीचे शेअर्स ६.७५% नी वाढले व त्यांनी ८२१.०० रुपयांवर व्यापार केला.


टाटा मोटर्स: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये २.४४% ची वाढ झाली व त्यांनी १४७.७५ रुपयांवर व्यापार केला. कंपनीने नव्या प्रवासी कार नोंदणीत वार्षिक स्तरावर २९% तर मासिक स्तरावर ३२% ची घट झाल्याचे दर्शवले. त्यानंतर हे परिणाम दिसले.


भारतीय रुपया: देशांतर्गत इक्विटी बाजारात विक्री दिसून आल्याने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने ७३.५५ रुपयांचे मूल्य कमावले.


जागतिक बाजार: कोव्हिड-१९च्या सातत्याने वाढणा-या जगभरातील रुग्णसंख्येमुळे तसेच साथीमुळे आलेल्या आर्थिक मंदीच्या चिंतेने जागतिक बाजाराने घसरणीचा व्यापार केला. नॅसडॅकने १.२५%, हँगेंगने १.५६%, निक्केई २२५ ने ०.६७% ची घसरण घेतली. तर एफटीएसई १०० व एफटीएसई एमआयबीने अनुक्रमे ०.५९% आणि १.२४% ची घट अनुभवली.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24