वॉल्वो कार इंडियातर्फे एचडीएफसी बँकेच्या सहयोगाने वॉल्वो कार फायनान्शिअल सर्व्हिसेस सुरू

वॉल्वो कार इंडियातर्फे एचडीएफसी बँकेच्या सहयोगाने 

वॉल्वो कार फायनान्शिअल सर्व्हिसेस सुरू

वॉल्वो सुलभपणे खरेदी करण्यासाठी विविध प्रकारचे अर्थसहाय्य पर्याय केले उपलब्ध

मुंबई१६ सप्टेंबर २०२० : वॉल्वो कार इंडियातर्फे एचडीएफसी बँकेच्या सहयोगाने वॉल्वो कार फायनान्शिअल सर्व्हिसेस ही सेवा आज सुरू केली. या माध्यमातून खरेदीदारांना त्यांची आवडती वॉल्वो कार विकत घेण्यासाठी सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सेवेमध्ये कारच्या एक्स-शोरूम किमतीवर १००% पर्यंत कर्जसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि परतफेडीचे सुलभ पर्याय देण्यात आले आहेत तसेच विशिष्ट अटींची पूर्तता केल्यावर मुदतपूर्व परतफेडीवरही कोणत्याही प्रकारचा आकार लावण्यात येणार नाही.

कर्जाची मुदत ७ वर्षांपर्यंत असू शकते. त्याचप्रमाणे वित्त विमावाढीव वॉरंटीसेवा पॅकेज आणि अॅक्सेसरींचे पर्यायही उपलब्ध आहेत. वॉल्वो कार फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या माध्यमातून वेगवान कर्जमंजुरी देण्यात येते आणि एकसारखे प्रक्रिया शुल्क आकारण्यात येते. त्यामुळे ग्राहकांना विनाअडथळा कर्जप्राप्तीचा अनुभव मिळतो.

वॉल्वो कार इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. चार्ल्स फ्रम्प म्हणालेवॉल्वो कार फायनान्शिअल सर्व्हिसेस ही वॉल्वो कारसाठी अर्थसहाय्य मिळविण्यासाठी वेगवानलवचिक आणि वाजवी दरातील उपाययोजना आहे. आमच्या लोककेंद्री दृष्टिकोनाची व्याप्ती विस्तारत नेऊन या माध्यमातून ग्राहकांना आमच्या कार विकत घेण्याचा सुलभ मार्ग उपलब्ध होतो. एचडीएफसी बँक या प्रिमिअर बँकिंग इन्स्टिट्युशनशी भागीदारी करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे आणि या भागीदारीमुळे आमच्या ब्रँडवरचा ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होईलअशा आमची खात्री आहे.

एचडीएफसी बँकेच्या रिटेललेंडिंग विभागाचे कंट्री हेड श्री. अरविंद कपिल म्हणालेही सेवा भारतभरातील डीलरशिपमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी वॉल्वो कार्ससह करत असलेल्या भागीदारीबद्दल आम्ही अत्यंत उत्साही आहोत. ग्राहकांना सुविधा देण्याबरोबरच आमची विविध प्रकारची उत्पादने व सेवा यांचा लाभ घेता यावा या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील असतो. या भागीदारीमध्ये ग्राहकानुरूप आणि वाजवी दरातील ऑफर्स उपलब्ध होणार असल्याने ही भागीदारी सर्वांसाठीच लाभदायक ठरणार आहे.

वॉल्वो कार फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या वैशिष्ट्यांवर एक दृष्टिक्षेप :

·                    एक्स-शोरूम किमतीच्या १००% पर्यंत अर्थसहाय्य

·                    मुदतपूर्व परतफेडीवर शून्य आकार

·                    विम्यावर अर्थसहाय्य

·                    कर्जाचा कालावधी ७ वर्षांपर्यंत

·                    एक्स्टेंडेड वॉरंटीसेवा पॅकेजेस आणि अॅक्सेसरींसाठी कव्हरेज

·                    बलून फायनान्स

·                    स्टेप-अप फायनान्स

·                    बुलेट फायनान्स

टिप : वरील सर्व अर्थसहाय्य ऑफर्ससाठी एचडीएफसी बँकेच्या अटी व नियम लागू असतील.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM