भारतातील होमवर्क अॅपमध्ये ब्रेनली शीर्षस्थानी

 भारतातील होमवर्क अॅपमध्ये ब्रेनली शीर्षस्थानी


मुंबई, २५ सप्टेंबर २०२०: महामारीमुळे शाळा ठप्प झाल्याने केवळ भारतातील ३२० दशलक्ष विद्यार्थ्यांवर परिणाम झाला. त्यामुळे ऑनलाइन लर्निंगकडे नवे यूझर्स मोठ्या संख्येने वळाले. जगातील सर्वात मोठा ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म असलेला ब्रेनली हा भारतातील एडटेक चार्टमध्ये अग्रेसर आहे. सिमिलर वेब आणि अॅपनी यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात ब्रेनली हे पहिल्या क्रमांकाचे होमवर्क अॅप्लीकेशन ठरले आहे. या वर्षी ब्रेनलीने भारतीय यूझर्समध्ये एप्रिल महिन्यादरम्यान वृद्धी अनुभवली. अल्पावधीतच प्लॅटफॉर्मचा यूझरबेस २२ ते २५ दशलक्षांपर्यंत गेला.


इतर लर्निंग प्लॅटफॉर्मच्या तुलनेत या एडटेक प्लॅटफॉर्मने चांगली वृद्धी करत हे स्थान मिळवले आहे. ब्रेनलीचा क्रमांक #१, त्यानंतर जागरण जोश, बायजूज आणि टॉपर यांचा क्रमांक लागला. नुकतेच मिळवलेले हे यश ब्रेनलीच्या ‘ नॉलेज शेअरिंग कम्युनिटी लर्निंग’ मॉडेलचे श्रेय असून यात २५० दशलक्ष विद्यार्थी आणि तज्ञ कठीण शालेय प्रश्न सोडवण्यासाठी सतत झटत असतात. शिक्षकांच्या प्रयत्नांची दखल घेत यावर्षी ब्रेनलीने ‘शिक्षक ऑफ द इयर’ ही स्पर्धा भारतात आयोजित केली आहे. सध्याच्या संकट काळात शिक्षणाची सुविधा देण्यासाठी ज्यांनी अपवादात्मक कामगिरी केली आहे, त्या शिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.


ब्रेनलीचे सीपीओ राजेश बिसानी म्हणाले, ‘‘जगभरातील पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी हा एक अभूतपूर्व काळ आहे. घरातील जास्तीत जास्त वेळ गुंतून राहण्यासाठी तसेच वेगवेगळ्या प्रकारे संकल्पना समजून घेण्यासाठी हे सर्वजण ऑनलाइन लर्निंगकडे वळत आहेत. शाळा पुन्हा सुरू होण्याबाबत स्पष्टपणा नसल्यास, महामारीनंतरही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी सर्वोत्कृष्ट साधने व प्लॅटफॉर्म आमच्यासोबतच राहतील.”

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202