ग्रुप पीएसएने भारतात युरोरेपार उत्पादन श्रेणी दाखल करत असल्याची घोषणा केली


ग्रुप पीएसएने भारतात युरोरेपार उत्पादन श्रेणी दाखल करत असल्याची घोषणा केली

 

  • भारतीय स्वतंत्र आफ्टरमार्केट उद्योगासाठी मल्टी-ब्रँडदर्जेदार ऑटोमोटिव्ह उत्पादनांची श्रेणी उपलब्ध करवून देण्यासाठी
  • गोमेकॅनिक या ओ2ओ ऑटोमोबाइल आफ्टरमार्केट प्लॅटफॉर्मसोबत केला विक्री व वितरण करार

 

ग्रुप पीएसएने युरोरेपार ही मल्टी-ब्रँडउच्च गुणवत्तापूर्ण आफ्टरमार्केट उत्पादनांची श्रेणी भारतात दाखल करत असल्याची घोषणा केली आहे.  ग्रुप पीएसएची स्थानिक कंपनी पीसीए इंडियाने गोमेकॅनिक या भारतीय आफ्टरमार्केट उद्योगातील नामांकित कंपनीसोबत विक्री व वितरण करार केला आहे.  गोमेकॅनिक हा ई-कॉमर्स टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म असून त्यांनी आपल्या स्वतःच्या व भागीदारांच्या वर्कशॉप्सचे व सुट्या भागांच्या रिटेलर्सचे नेटवर्क उभारले आहे. युरोरेपार सुट्या भागांची विक्री गोमेकॅनिकमार्फत केली जाणार आहेयामुळे भारतीय बाजारपेठेतील प्रवेश अधिक जास्त सहजसुलभ व प्रभावशाली बनेल.  भारतात ही श्रेणी दाखल करत ग्रुप पीएसएने युरोरेपार मल्टी-ब्रँड लेबल सह भारतीय बाजारपेठेतील प्रवेशाचा साहसी निर्णय घेतलाकार उत्पादन क्षेत्राचे भारतासाठी हे एक अभिनव धोरण आहे.

 

या लॉन्चबद्दल प्रतिक्रिया देताना ग्रुप पीएसएच्या सेल्स अँड मार्केटिंग इंडियाचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट रोलँड बौचरा यांनी सांगितले, "युरोरेपार हा जागतिक पातळीवर सिद्ध झालेला आमचा आफ्टरमार्केट ब्रँड भारतात दाखल करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. युरोरेपार उत्पादने ग्रुप पीएसएने पद्धतशीरपणे ऑडिट केलेल्या पुरवठादारांकडून काटेकोर आणि व्यापक गुणवत्ता प्रक्रियांचे पालन करत विकसित केली जातात.  आम्ही असे मानतो की युरोरेपार हा अशा भारतीय ग्राहकांसाठी सर्वोत्तम पर्याय आहे ज्यांची मागणी असते की सुट्या भागांच्या किमती स्वस्त असाव्यात आणि जे प्रीमियम आफ्टरमार्केट ब्रॅंड्सवर खूप जास्त खर्च करण्यासाठी उत्सुक नसतात.  कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये देखील आम्ही भारतात युरोरेपार मल्टी-ब्रँड पार्टस दाखल केले आणि म्हणून ही श्रेणी ग्रुप पीएसएचा पहिला ग्राहककेंद्री व्यवसाय उपक्रम म्हणून अनोखा आहेपहिली सिट्रोएन कार सी५ एयरक्रॉस एसयूव्ही येण्याच्या आधी हा उपक्रम सादर केला गेला आहेसी५ एयरक्रॉस एसयूव्ही २०२१ च्या पहिल्या तिमाहीमध्ये लॉन्च केली जाणार आहे."   

 

युरोरेपार उत्पादन श्रेणी खास भारतीय आफ्टरमार्केटसाठी तयार करण्यात आली आहे.

युरोरेपार ही ग्रुप पीएसएची विविध ब्रँड्सच्या सुट्या भागांची आणि ऍक्सेसरीजची श्रेणी आहेही उत्पादने गाड्यांची दुरुस्ती व देखरेखीमध्ये वापरली जातात.  जगभरात १०० देशांमध्ये उपलब्ध करवून देण्यात आलेल्या या श्रेणीमध्ये प्रत्येक मेक आणि मॉडेलच्या गाड्यांसाठी स्मार्ट किंमतींचीउच्च दर्जाची उत्पादने आहेत.  तीन वर्षे किंवा त्याहून जुन्या गाड्यांसाठीची ही उत्पादने अशा ग्राहकांसाठी बनवली गेली आहेत जे सुट्या भागांच्या खरेदीमध्ये दर्जा आणि मूल्य यांना प्राधान्य देतात.  भारतीय वर्कशॉप्समध्ये युरोरेपार श्रेणीतील पहिली उत्पादने लवकरच दाखल होतीलयामध्ये बी२बी (मल्टी-ब्रँड वर्कशॉप्स आणि स्पेअर पार्टस रिटेलर्स) आणि बी२सी ग्राहकांसाठी उच्च दर्जाचे ब्रेक पॅड्स स्मार्ट किंमतींना उपलब्ध होतील.  ही उत्पादने गोमेकॅनिक पार्टस डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्म्समार्फत ऑफलाईन व ऑनलाईन खरेदी करता येतील.

 

लॉन्च आणि भागीदारीबद्दल ग्रुप पीएसए - इंडिपेंडंट आफ्टरमार्केट बिझनेस युनिटचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट जीन ख्रिस्टोफे बर्ट्रांड यांनी सांगितले, "भारतात युरोरेपार दाखल करण्याच्या निर्णयाचे विश्लेषण पीएसए आफ्टरमार्केटच्या जागतिक धोरणाला अनुसरून केले गेले पाहिजे. ग्राहकांची खरेदी क्षमता आणि त्यांच्या गाडीचे मेक किंवा गाडी किती जुनी आहे या कशाचीही पर्वा न करता विक्रीनंतर त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या गेल्या पाहिजेत हा पीएसए आफ्टरमार्केटच्या जागतिक धोरणाचा भाग आहे.  जागतिक बाजारपेठांसाठी ग्रुप पीएसएच्या 'पुश टू पासधोरणामध्ये भारत खूप महत्त्वपूर्ण आहे आणि आपल्या सर्व ब्रॅंड्ससाठी ग्रुप पीएसएचा ग्राहककेंद्री दृष्टिकोन दर्शविण्याची ही अभूतपूर्व संधी आहे.  गोमेकॅनिकसोबत भागीदारी करण्याचा आमचा निर्णय सर्व ग्राहकांना उच्च दर्जा आणि मूल्य देण्याच्या आमच्या समान उद्धिष्टांवर आधारित आहे.  आम्ही असे मानतो कीहे धोरण भारतात ग्रुप पीएसएचे स्थान अधिक जास्त बळकट करण्यात आणि अधिकाधिक जास्त ग्राहकांपर्यंत जाऊन पोहोचण्यात उपयुक्त ठरेल."   

 

गोमेकॅनिकसोबत भागीदारी आणि वितरण करार

या करारानुसार पीसीए इंडिया गोमेकॅनिकला युरोरेपार पार्टस देईल आणि गोमेकॅनिक आपल्या वेअरहाउसेस आणि पार्टस डिस्ट्रिब्युशन लॉजिस्टिकस प्लॅटफॉर्ममार्फत पार्ट्सना आपल्या नेट्वर्कमधील सर्व वर्कशॉप्स आणि रिटेलर्समध्ये वितरित करेल.  उच्च दर्जाचीप्रभावी उत्पादन श्रेणी देण्याबरोबरीनेच मार्केटिंगप्रशिक्षणब्रँड उभारणी इत्यादी मदत ग्रुप पीएसएकडून दिले जाईल. 

 

गोमेकॅनिकचे सहसंस्थापक श्री. अमित भसीन यांनी या भागीदारीबद्दल सांगितले, "भारतात युरोरेपार ब्रँड दाखल करण्यासाठी ग्रुप पीएसएसोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.  सर्वोत्तम दर्जाच्या सेवा आणि पार्टस आमच्या ग्राहकांना चांगल्या किमतींना मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील असतोही भागीदारी आमच्या त्या प्रयत्नांना अधिक सुलभ बनवेल.  या भागीदारीसाठी सध्या अतिशय अनुकूल काळ आहे कारण सध्या आम्ही देशभरात आमच्या सर्विस सेंटर्सचा अतिशय वेगाने विस्तार करत आहोत.  आम्हाला पक्की खात्री आहे कीआमच्या ३५० पेक्षा जास्त वर्कशॉप्स आणि सुट्या भागांच्या डिस्ट्रिब्युशनच्या विशाल नेटवर्कच्या बळावर आम्ही ग्रुप पीएसएच्या आफ्टरमार्केट उद्योगाला वेगाने वाढवण्यात मदत करू शकू."

 

सुरुवातीला युरोरेपारमध्ये उच्च दर्जाच्या ब्रेक पॅड्ससारखी उत्पादने आणली जातील आणि कालानुरूप या श्रेणीमध्ये वाढ केली जाईलत्यामध्ये वायपर ब्लेड्सफिल्टर्स (हवातेल आणि इंधन)ब्रेक डिस्क्सकूलंटग्रीज आणि ल्युब्रिकंट्स इत्यादी अनेक वेगवेगळ्या उत्पादन श्रेणी सामील करत सेवा व सुट्या भागांचा एक मजबूत प्रॉडक्ट पोर्टफोलिओ निर्माण केला जाईल.  हे पार्ट्स भारतात २९ सप्टेंबर २०२० पासून १५ प्रमुख शहरांमध्ये गोमॅकेनिकच्या वर्कशॉप्स आणि रिटेलर्समार्फत उपलब्ध होतील.

 

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24