अॅमेझॉन तर्फे नवीन एको फॅमिली सादर

 अॅमेझॉन तर्फे नवीन एको फॅमिली सादर

मुंबई, ३० सप्‍टेंबर २०२० - अॅमेझॉनने आज पूर्णत: नवीन डिझाइन्‍स, सुधारित ऑडिओ आणि अधिक शक्तिशाली हार्डवेअर असलेली एको डिवाईसेसची नवीन रेंज सादर केली. घोषणा करण्‍यात आलेले नवीन एको डिवाईसेस मध्ये एको डॉट मध्ये आतापर्यंतचा सर्वात लोकप्रिय एको डिवाईस. नवीन गोलाकार डिझाइन सुस्‍पष्‍ट, विशाल आवाज व शक्तिशाली बासची खात्री देते. एको डॉट विथ क्‍लॉक मध्ये सर्वाधिक विक्री होणारा स्‍पीकर, ज्‍यामध्‍ये एलईडी डिस्‍प्‍ले, नवीन गोलाकार डिझाइन असण्‍यासोबत आता अतिरिक्‍त निळ्या रंगामध्‍ये उपलब्‍ध आहे. एको मध्ये एको व एको प्‍लसचे सर्वोत्तम घटक एकाच डिवाईसमध्‍ये संयोजित करण्‍यात आले असून यामध्‍ये स्‍मार्ट होम सेट-अपला साजेसे असे नवीन गोलाकार डिझाइन, डॉल्‍बी स्टिरिओ साऊंड आणि बिल्‍ट-इन झिग्‍बी हब आहे. या डिवाईसची किंमत ४,४९९ पासून ९,९९९ रूपये पर्यंत आहे.



नेक्‍स्‍ट-जनरेशन एकोसाठी एको व एको प्‍लसचे सर्वोत्तम घटक त्‍याच किफातयशीर एको दरातील एकाच डिवाईसमध्‍ये संयोजित करण्‍यात आले आहेत. नवीन डिझाइन व फॅब्रिक फिनिश कोणत्‍याही ठिकाणी आकर्षक दिसतात. गोलाच्‍या तळाशी असलेली प्रखर एलईडी लाइट रिंग पृष्‍ठभागांवरून परावर्तित होत लक्षवेधक दृश्‍याची खात्री देते. नवीन एको ३.०-इंच वूफर, ड्युअल-फायरिंग ट्विटर्स आणि सुस्‍पष्‍ट हाय, डायनॅमिक-मिड्स व सखोल बास स्टिरिओ साऊंड देणा-या डॉल्‍बी प्रोसेसिंगच्‍या माध्‍यमातून लक्षणीयरित्‍या उत्तम व सुस्‍पष्‍ट आवाजाची खात्री देते. एको स्‍टुडिओसह नवीन एको आपोआप पणे तुमच्‍या खोलीसाठी योग्‍य असलेला आवाज ओळखते आणि त्‍यानुसार आवाज समायोजित करत तुमच्‍या आवडीची गाणी ऐकण्‍याचा आनंद देते. संपन्‍न, सविस्‍तर साऊंड आपोआप पणे तुमच्‍या खोलीच्‍या आकारमानाशी जुळवून घेतो. पहिल्‍यांच एकोमध्‍ये बिल्‍ट-इन झिग्‍बी स्‍मार्ट होम हब असण्‍यासोबत ब्‍ल्‍यूटूथ लो एनर्जी (बीएलई) आहे, जे ऊर्जा बचत करण्‍यामध्‍ये मदत करते.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार