जागतिक आर्थिक सुधारणेच्या वाढत्या चिंतेमुळे सोन्याला झळाळी

जागतिक आर्थिक सुधारणेच्या वाढत्या चिंतेमुळे सोन्याला झळाळी

मुंबई, १४ सप्टेंबर २०२०: कोव्हिड-१९ चे वाढते रुग्ण आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील घसरण यामुळे गुंंतवणूकदाराांच्या भावनांवर परिणाम झाला.एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले कि, स्पॉट गोल्डने उच्चांकी व्यापार केला तर कच्चे तेल व बेस मेटलने नकारात्मक चित्र दर्शवले. कच्च्या तेलाच्या मागणीतील घसरणीमुळे किंमतही घसरली. तर अमेरिका-चीनमधील तणावामुळे धातूंच्या किंमतीवर परिणाम झाला.

सोने : अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावामुळे स्पॉट गोल्डचे दर ०.८ टक्क्यांनी वाढले. कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येत अखंड वाढ होत असल्याने आर्थिक सुधारणेची आशा मावळत असून त्यामुळेच पिवळ्या धातूची मागणी वाढली.

अमेरिकेतील रोजगारातील वाढ खुंटल्याने तसेच कायमस्वरुपी नोकऱ्या गमावल्यामुळे बाजारपेठेच्या भावनांवर आणखी परिणाम झाला. यामुळेही आर्थिक सुधारणा लवकर होण्याच्या आशा मावळत असल्याचे संकेत मिळाले.  जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेने कमकुवत कामगार बाजाराचे संकेत दिले. बेरोजगारीच्या वाढत्या आकडेवारीमुळे सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याची मागणी वाढली. सोन्याचे दर आजच्या सत्रात एमसीएक्सवर चांगले व्यवहार करतील.

कच्चे तेल: मागील आठवड्यात साथीचे वाढते प्रमाण आणि घटती मागणी यामुळे डब्ल्यूटीआय क्रूडच्या दरात ६ टक्क्यांची घट झाली. अमेरिकेच्या तेलसाठ्यात वाढ आणि डॉलरचे मूल्य वधारल्यामुळे तेलाचे दर घसरले.

४ सप्टेंबर २०२० रोजी संपलेल्या आठवड्यात, अमेरिकी एनर्जी इनफॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशन (इआयए)च्या अहवालानुसार, तेलसाठ्यात २.० दशलक्ष बॅरलची वाढ झाली. कच्च्या तेलाच्या मागणीतील घट लक्षात घेता, क्रूडचा सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या सौदी अरेबियाने ऑक्टोबर ममहिन्यासाठी आशियासाठी अधिकृत विक्री किंमत (ओएसपी) कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तेलाच्या किंमती घटल्या. सध्याच्या तेल बाजाराच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी ओपेक व सहयोगींची १७ सप्टेंबर रोजी बैठक होईल.  ऑगस्टपासून तेलाची वाढलेली मागणी लक्षात घेता, ओपेकने दररोज ७.७ बॅरलपर्यंत उत्पादन कपात सुरू आहे.

अमेरिकेतील आखाती उत्पादनावर वादळाचे संकट आल्यामुळे क्रूडचे नुकसान कमी होईल. आजच्या व्यापारी सत्रात तेलाच्या किंमती एमसीएक्सवर दुर्लक्षित राहतील.

बेस मेटल्स: वाढत्या कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येमुळे तसेच अमेरिका आणि चीन या दोन जागतिक महासत्ततांमधील वाढत्या तणावामुळे मागील आठवड्यात एलएमई बेस मेटलने लाल रंगात स्थान मिळवले होते.

या वर्षी नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अमेरिकी निवडणुकांनंतर चीनशी असलेले सर्व संबंध संपुष्टात आणण्याच्या सूचना अमेरिकी अध्यक्षांनी दिल्या आहेत. त्यामुळे दोन देशांमधील संबंध बिघडू लागल्याने औद्योगिक धातूंचे दर घसरले.

धातूचा सर्वात मोठा ग्राहक असललेल्या चीनमध्ये ऑगस्ट २०२० मधील निर्यात वााढली असून त्यामुळे धातूच्या किंमतीतील नुकसान मर्यादित राहिले. चीनचे शुद्धिकरण केलेले झिंक उत्पादन २.८ टक्क्यांनी वाढले असूून ते ४५०,००० टनांवर पोहोचले. तर त्याचे निकेल उत्पादन १५ टक्क्यांनी वाढले.

एलएमई कॉपरचे दर ०.७७ टक्क्यांनी घसरले. एलएमई अधिकृत गोदामातील तांबे यादीमुळे हे नुकसान झाले. चीनमधील वाढत्या मागणीमुळे तसेच एलएमई तांब्याच्या तेलसाठ्याक घट झाल्याने तांब्याच्या दरांना आधार मिळाला. आजच्या सत्रात एमसीएक्सवर तांबे जास्त व्याापार करणण्याची शक्यता आहे.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202