गोदरेज मटेरियल हँडलिंग्जतर्फे इन्ट्रा- लॉजिस्टिक सेवांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी स्कुत्रोच्या विस्तार श्रेणीची योजना

 गोदरेज मटेरियल हँडलिंग्जतर्फे इन्ट्रालॉजिस्टिक सेवांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी स्कुत्रोच्या विस्तार श्रेणीची योजना

 

चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दोन तिमाहींमध्ये वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी विविध उद्योगक्षेत्र शर्थीचे प्रयत्न करत असताना स्कुत्रो त्यांची शॉपफ्लोअर वाहतूक आणि कर्मचाऱ्यांची उत्पादनक्षमता उंचावण्यास मदत करणार

 


मुंबई, 29 सप्टेंबर  गोदरेज मटेरियल हँडलिंग या गोदरेज अँड बॉइस समूहाच्या व्यवसायाने आज गोदरेज स्कुत्रो या आपल्या इन्ट्रालॉजिस्टिकस्थलांतरवाहतूक सेवेच्या श्रेणीचा विस्तार करण्याची योजना आखल्याचे जाहीर केले आहेगेल्या वर्षी लाँच करण्यात आलेले स्कुत्रो हे मॅन्युअल रायडर उपकरण असून ते शॉपफ्लोअरवर अवजड सामान एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी वापरले जाते.

 

लॉकडाउन वाढल्यामुळे सलग दोन तिमाही संथ गेल्यानंतर आणि नंतर वटप्प्याने निर्बंध शिथिल होत गेल्यानंतर इंडिया इंक आर्थिक वर्षाच्या उर्वरित दोन तिमाहींमध्ये वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करेल असा अंदाज आहेअशा इतर क्षेत्रांमध्ये रिटेलफार्मास्युटिकल्स आणि एफएफसीजी कही क्षएत्रे वेगवान शॉपफ्लोअर यंत्रणा  स्वयंचलनाचा अवलंब करेल आणि बाजारपेठेतील हिश्शाचे झालेले नुकसान  आर्थिक उत्पन्नातूल तूट भरून काढण्यासाठी उत्पादनक्षमतेला चालना देईल असा अंदाज आहे.

 

गोदरेज मटेरियल हँडलिंगचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख अनिल लिंगायत म्हणाले, या महामारीमुळे देशाच्या पुरवठा साखळी आणि वेयरहाउस क्षेत्रांचे काम विस्कळीत झाले आहेव्यवसायांचा आता वेयरहाउसिंगचे पुनर्मूल्यांकन करण्याकडे आणि बाजारपेठ परत उसळी घेईल या आशेने इन्ट्रालॉजिस्टिक तयार ठेवण्याकडे कल आहेम्हणूनच सध्याच्या काळात कर्मचाऱ्यांची उत्पादनक्षमता  आरोग्य चांगले राखतानाच मालाची हाताळणी सहज  सुरळीतपणे करण्यास इंडिया इंकचे प्राधान्य आहेगेल्या वर्षी झालेल्या लाँचनंतर स्कुत्रो हे नाविन्यपूर्ण स्थलांतरवाहतूक उत्पादन असल्याचे सिद्ध झाले होतेया कालावधीत आम्हाला स्कुत्रोसाठी होणारी विचारणा मोठ्या प्रमाणावर वाढली आहेम्हणूनच आम्ही इन्ट्रालॉजिस्टिक सेवांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी स्कुत्रोच्या श्रेणीचा विस्तार करण्याचे  पर्यायाने उद्योगाला #इमर्जस्ट्राँगर साठी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

लॉकडाउनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर ग्राहक मागणीत झालेली अचानक वाढ आणि त्याला कर्मचारीवर्गाने मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केल्याने कुशल मनुष्यबळाच्या कमतरतेच्या समस्येची मिळालेली जोड यांमुळे पुरवठा साखळी आणि वेयरहाउसिंग क्षेत्र प्रचंड तणावाखाली आहेशॉपफ्लोअर वाहतूक सुधारण्यात तसेच कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका उत्पन्न  करता त्यांची उत्पादनक्षमता वाढवण्यात स्कुत्रोचा महत्त्वाचा वाटा असेल.

 

गोदरेज मटेरियल हँडलिंगने केलेल्या मूल्यांकनात असे दिसून आलेकी कोविडपूर्व काळात 50,000 चौरस फुटांच्या वेयरहाउसमध्ये एका कर्मचाऱ्याकडून आठ तासांच्या एका शिफ्टमध्ये अंदाजे 15 किलोमीटर अंतर पार केले जायचेस्कुत्रोमुळे कर्मचाऱ्यांना एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी सामान उचलण्यासाठी आणि त्याचे स्थलांतर करण्यासाठी चालण्याऐवजी राइड करता येतेअनुभवाअंती दिसून आलेल्या पुराव्यानुसार स्कुत्रोमुळे एकंदर उत्पादनक्षमता 25 टक्क्यांपर्यंत वाढतेथकवा कमी होते आणि काम करताना जास्त आनंद मिळतो.

Comments

Popular posts from this blog

Piramal Capital & Housing Finance Limited Secured NCD Public Tranche I - Issue Opens on July 12, Coupon Rate Upto 9.00% p.a.#

54 School Principals from across India get the prestigious Change Maker Award for digital transformation & holistic learning

Samco Launches ‘KyaTrade’ - India’s First Real-time Stock Trading & Recommendation App