भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने ब्लिट्झ प्रीमियर लीगसाठी केला ब्लिट्झपोकरशी करार


भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने ब्लिट्झ प्रीमियर लीगसाठी केला ब्लिट्झपोकरशी करार


राष्ट्रीय, 25 सप्टेंबर 2020: भारतात सध्या चाललेला क्रिकेट कार्निवल साजरा करण्यासाठी डॅन बिल्झेरियनची अधिकृत पोकर रूम ब्लिट्झपोकरने ब्लिट्झ प्रीमियर लीग Blitz Premier League (बीपीएल) लाँच करण्यासाठी प्रख्यात भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकशी करार केला आहे. भारतीय क्रिकेट संघातील यष्टीरक्षक-फलंदाज आणि सध्या चाललेल्या आयपीएल २०२० मध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा (केकेआर) कर्णधार असलेला दिनेश कार्तिक हा आता ब्लिट्झ प्रीमियर लीगचा चेहरा आहे. दिनेश कार्तिकने २००४ मध्ये भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केले आणि २००७ मध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत त्याने संघासाठी सर्वाधिक धावा करून, भारताला २१ वर्षानंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका विजय मिळवून देण्यात मदत केली.  


पोकरबद्दलच्या प्रेमाची सांगड क्रिकेटशी घालून भारतीय चाहत्यांना अजोड रोमांचक अनुभव देणे हे उद्दिष्ट असलेली ब्लिट्झ प्रीमियर लीग म्हणजे २१ सप्टेंबर २०२० पासून सुरू झालेली एक ऑनलाइन पोकर स्पर्धा आहे. या ४५ दिवस चालणा-या स्पर्धेमध्ये अनेक रोमांचक वळणे येतील आणि नवीन व पूर्वीपासूनच्या ब्लिट्झपोकर खेळाडूंना ५० लाख रुपये मूल्याची बक्षिसे दिली जातील. भारतभरातील नवीन खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी ब्लिट्झपोकरतर्फे BLITZPOKER ब्लिट्झ प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. रोचक बाब म्हणजे, ऑनलाइन गेमिंग केवळ महानगरांतील प्रकार आहे या लोकप्रिय समजाला छेद देत, श्रेणी-२ शहरांतूनही ऑनलाइन गेमिंगला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शहरी व ग्रामीण अशा दोन्ही लोकसंख्यांमध्ये कमी किंमतीच्या स्मार्टफोन्सची वाढती संख्या हा या वाढीचा प्रमुख चालक घटक आहे. 


*ब्लिट्झ प्रीमियर लीगशी झालेल्या सहयोगाबद्दल दिनेश कार्तिक म्हणाला,* “क्रिकेटप्रमाणेच पोकरसाठीही विशिष्ट कौशल्यांचा संच आवश्यक असतो. ही कौशल्ये संपादित करण्यासाठी समर्पण, कष्ट आणि सरावाची आवश्यकता असते. ब्लिट्झ प्रीमियर लीग ही एक अनोखी ऑनलाइन पोकर स्पर्धा आहे आणि पोकर चाहत्यांसाठी हा नक्कीच रोमांचक अनुभव ठरेल. ब्लिट्झपोकरशी भागीदारी हा माझा या खेळाला पाठिंबा देण्याचा आणि खेळाडूंप्रती आदर व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे.” 


ब्लिट्झ प्रीमियर लीग अर्थात बीपीएल BPL दररोज ७५,००० रुपये बक्षिसाच्या बीपीएल स्ट्रायकर स्पर्धा घेणार आहे. खेळाडू केवळ ११० रुपयांची प्रवेशिका (गुंतवणूक) घेऊन या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth