आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएल) तर्फे दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंगची ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती

 आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएल) तर्फे 

दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंगची ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती 



सप्टेंबर 24, 2020: आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएल) या परीक्षा पूर्व तयारी सेवेतील राष्ट्रीय स्तरावरील अग्रणी संस्थेने युवराज सिंग या निष्णात क्रिकेटपटूची त्यांचा ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली.  

कंपनीला आणि आकाश इन्स्टिट्यूट, आकाश आयआयटी-जेईई, आकाश डिजिटल आणि मेरीटनेशन या त्यांच्या विविध ब्रँड्सना प्रोत्साहन देण्यासाठी हा क्रिकेटपटू पुढे सरसावला आहे. आकाशचा एक चेहरा म्हणून युवराज सिंग हा आकाश डिजिटलच्या ‘सक्सेस इज वेटिंग’ या नव्या ओम्नी-चॅनेल मोहिमेचे नेतृत्व करणार आहे.   

वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेसाठी पुन्हा एकदा प्रयत्न करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘सक्सेस इज वेटिंग’ ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा प्रयत्न करण्यासाठी उद्युक्त करण्याचे या मोहिमेचे उद्दिष्ट असून डिजिटल माध्यमातून ते बघता येणार आहे.   

‘जोशात पुनरागमन’ हा संदेश  देणारा आणि स्वत: अतिशय ताकदीने पुनरागमन करणारा हा खेळाडू असल्याने युवराज सिंगची या मोहिमेसाठी केलेली निवड ही अतिशय योग्य आणि प्रेरणादायी आहे. आपल्या देशात क्रिकेट हा अतिशय लोकप्रिय खेळ असल्याने, युवराज सिंगच्या पुनरागमनाच्या गोष्टीभोवती संवाद गुंफले गेले आहेत. सुरुवातीला क्रिकेटमधील यशस्वी कारकीर्द, त्यानंतर कर्करोगाशी त्याने दिलेली झुंज, मग त्यांचे प्रेरणादायी पुनरागमन आणि आता हा मानवतावादी पुढाकार यामुळे हा खेळाडू अनेक भारतीयांसाठी एक मोठे प्रेरणास्थान आहे.    

Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy