ओडिसी इलेक्ट्रीक वेहीकल्सची नवीन डिलरशीप मुलुंड, मुंबई येथे सुरू

 
ओडिसी इलेक्ट्रीक वेहीकल्सची नवीन डिलरशीप मुलुंड, मुंबई येथे सुरू




 
मुंबई, भारत | 23 सप्टेंबर, 2020– स्वदेशी इलेक्ट्रीक टू-व्हीलर निर्मितीदार कंपनी, ओडिसी’ने मुलुंड, मुंबई येथे नवीन कंपनी मालकीच्या डिलरशीप उद्घाटनासोबत विक्री आणि सेवा जाळे विस्तारले आहे. ही सुविधा 850 चौरस फुटांवर पसरलेली असून इथे ग्राहकांसमवेत संपर्क साधण्याकरिता पुरेशी जागा आहे. जिथून सर्वोत्तम आफ्टर सेल्स सर्विस आणि सपोर्ट देण्यात येतो.
 
मुलुंड येथील नवीन दालनामुळे ओडिसी विक्रेत्यांची संख्या भारतात 5च्या पुढे गेली आहे. आगामी महिन्यांत इतर ठिकाणी कामकाजाला सुरुवात होईल. हे नवीन दालन खालील ठिकाणी सुरू करण्यात आले आहे:

पत्ता: ओडिसी इलेक्ट्रीक वेहीकल्स प्रा लि, दुकान क्र 8, शांती सदन, 90 फिट रोड, कॅम्पस वेज ट्रीटजवळ, मुलुंड पूर्व, मुंबई - 400081

 
या नवीन दालनाच्या उद्घाटनाविषयी बोलताना ओडिसी इलेक्ट्रीक वेहीकल्सचे चीफ एक्झिक्यूटीव्ह ऑफिसर नेमीन वोरा म्हणाले की,“स्वच्छ दळणवळणाच्या दिशेने भारताचा प्रवास होतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘व्होकल फॉर लोकल’ची हाक देशवासियांना दिली आहे. भारतात स्थानिक पुरवठ्याला चालना देण्यात ओडिसीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ओडिसीसोबत लोकांच्या प्रवास करण्याच्या सवयीत आम्हाला बदल आणायचा आहे. आमची इलेक्ट्रीक स्कूटर आणि बाईक उत्पादने सर्व प्रकारच्या रायडर्सकरिता उपयुक्त आहेत. तरुणांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत, युवा ट्रेंडी खरेदीदार आणि आरामदायक प्रवास करू इच्छिणारे ते व्यस्त बिझनेस रायडर अशा सर्वांसाठी हा वाहतूक पर्याय उपयुक्त ठरेल.”
 
“नव्याने सुरू करण्यात आलेली डिलरशीप म्हणजे आमचे महाराष्ट्रातील नेटवर्क बळकट करण्यासाठी उचललेले पाऊल आहे, जिथे सातत्याने इलेक्ट्रीक स्कूटरना मोठी मागणी असते. पर्यावरण-स्नेही ग्राहकांचा कल नेहमीच स्मार्ट दळणवळण वाहतूक पर्यायांकडे असतो. ग्राहकांना समृद्ध अनुभव मिळावा यासाठी विक्री, सेवा उपलब्ध करून देणाऱ्या मुलुंड- ओडिसी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. इथे ग्राहक वर्ग उच्चतम गुणवत्ता, चिंता-मुक्त मालकीचा अनुभव घेतील”, असे त्यांनी पुढे सांगितले.
 
ई-बाइक्स आणि स्कूटरशिवाय दालनात हेल्मेट, स्कूटरकरिता गार्डस, सीट कव्हर्स, स्पोर्टी जाकिटे आणि हातमोजे अशी एक्सेसरीजही ठेवण्यात आली आहेत. भारतात इतरत्र टप्प्याटप्प्याने ही उत्पादने उपलब्ध करून देण्यात येतील.
 
ओडिसी ईव्ही स्कूटर्स लोकांसाठी अतिशय उपयुक्त पर्याय आहे, यामुळे शून्य-कार्बन उत्सर्जन होते, किफायतशीर स्कूटर स्पोर्ट बाईकसारख्या सर्वोत्तम परफॉर्मन्स देते. पहिल्यांदा दुचाकी खरेदी करणारे आणि वाहन-इच्छुकांकरिता विविध ई-स्कूटर पाहायला मिळणार आहेत. या ई-स्कूटर विशिष्ट लिंगाचा म्हणजे स्त्री किंवा पुरुषाला समोर ठेवून तयार केली नसल्याने तिचे डिझाईन सर्व व्यक्तींना साजेसे असेल. हा वाहन पर्याय कमीत-कमी किंमतीत शेवटच्या मैलापर्यंत प्रवासाची हमी देतो. शिवाय कार्बनचे शून्य टक्के उत्सर्जन करतो.





Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet