व्हीएन फायनान्सतर्फे कधीही, कुठूनही ऑनलाइन ‘गोल्ड लोन’ सुविधा

 व्हीएन फायनान्सतर्फे कधीही, कुठूनही ऑनलाइन ‘गोल्ड लोन’ सुविधा

·       २४X७ सेवातासभरात सोने तारण कर्जाचे वितरणसोपी व सहज प्रक्रिया

·       तुमचे सोने गहाण ठेऊन अत्युच्च व सर्वोत्तम मूल्याचे कर्ज मिळवा

·       गोल्ड लोन व छोट्या रकमेच्या कर्जांवर भर देऊन शाखाविस्ताराचे लक्ष्य

कोविड टाळेबंदीपश्चात मिशन बिगिन अगेन सुरू असताना, छोटे व्यावसायिक स्त्री-पुरूष, लघूउद्योग आणि स्टार्टअप्स नव्याने व्यवसायाच्या सुरुवात करण्यासाठी सज्ज झाले असताना, तंत्रज्ञानसमर्थ बँकेतर वित्तीय कंपनी व्हीएन फायनान्सने लोकांना त्यांच्या स्वप्नांची पूर्तता कधीही आणि कुठूनही करणे शक्य करणारी गोल्ड लोनची प्रस्तुती केली आहे. अत्युच्च आणि सर्वोत्तम मूल्यानुरूप कर्जाचे गुणोत्तर (लोन टू व्हॅल्यू रेशो) राखताना, २४X७ धर्तीवरील सेवेतून लोकांना त्यांच्या तातडीच्या वित्तीय गरजांची पूर्तता व्हीएन फायनान्स शक्य तितक्या कमी कालावधीत करू पाहत आहे.  

या प्रकारचे कर्ज ५,००० रुपयांपासून पुढे इतक्या किमान स्तरापासून सुरू होणारे आहे. कोणतेही तारण नसलेल्या अथवा विद्यमान कोणतीही मालमत्ता नाही अशा तातडीने वित्त साहाय्याची गरज असलेल्या लोकांनी थेट (किंवा मध्यस्थांमार्फत) व्हीएन फायनान्सशी संपर्क साधून आपली पत आणि परतफेड योग्यतेची क्षमता सिद्ध करता येऊ शकेल. तसेच ठरविलेली स्वप्ने साकार करण्यासाठी त्यांना सर्वोत्तम शर्तींवर वित्तपुरवठाही मिळविता येईल. व्हीएन फायनान्सद्वारे कोणतेही दंड न आकारता मुदतपूर्व परतफेडीची सुविधा, किमानतम दस्तऐवज, अत्यल्प प्रतिसाद कालावधी, कुटुंबाचे दागदागिने आणि सोन्याच्या आभूषणांच्या सुरक्षित जतनाची सोय केली गेली आहे. इच्छुकांनी फक्त ०२२ २०८७७८८८ या क्रमांकावर संपर्क साधावयाचा आहे.

Comments

Popular posts from this blog

Piramal Capital & Housing Finance Limited Secured NCD Public Tranche I - Issue Opens on July 12, Coupon Rate Upto 9.00% p.a.#

54 School Principals from across India get the prestigious Change Maker Award for digital transformation & holistic learning

Samco Launches ‘KyaTrade’ - India’s First Real-time Stock Trading & Recommendation App