वाहन, फार्मा आणि रिअॅलिटी क्षेत्राच्या नेतृत्वात भारतीय निर्देशांकांचा उच्चांकी व्यापार

 वाहन, फार्मा आणि रिअॅलिटी क्षेत्राच्या नेतृत्वात भारतीय निर्देशांकांचा उच्चांकी व्यापार


मुंबई, १६ सप्टेंबर २०२०: वाहन, फार्मा आणि रिअॅलिटी क्षेत्राच्या नेतृत्वात आजच्या व्यापारी सत्रात भारतीय निर्देशांकांनी उच्चांकी व्यापार केला. निफ्टी ०.७२% किंवा ८२.७५ अंकांनी वाढला व ११,६०४.५५ अंकांवर स्थिरावला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.६६% किंवा २५८.५० अंकांनी वाढून ३९,३०२.८५ अंकांवर स्थिरावला.


एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात डॉ. रेड्डीज (४.४४%), एमअँडएम (४.०१%), हिंडाल्को (३.९०%), बजाज ऑटो (३.५२%) आणि ब्रिटानिया (३.०५%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर इंडसइंड बँक (२.००%), एनटीपीसी (१.६५%), भारती इन्फ्राटेल (१.१४%), एसबीआय (१.०७%) आणि अॅक्सिस बँक (१.०२%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.


निफ्टी फार्मा, निफ्टी ऑटो आणि निफ्टी रिअॅलिटी हे चांगली कामगिरी करणाऱ्या सेक्टर्समध्ये समाविष्ट होते व त्यांनी १.५% च्या पुढे नफा कमावला. तर बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉल कॅपने सकारात्मक व्यापार करत अनुक्रमे ०.२१% आणि ०.४४% ची बढत घेतली.


लक्ष्मी विलास बँक: बँकेने क्लिक्स ग्रुपमध्ये विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण केल्याची बातमी दिल्यानंतर लक्ष्मी विलास बँकेचे शेअर्स ९.८०% नी वाढले व त्यांनी २२.४० रुपयांवर व्यापार केला. तसेच पुढील प्रक्रियेसाठी दोन्ही ग्रुपमध्ये चर्चा सुरू असल्याचीही माहिती बँकेकडून देण्यात आली.


स्टरलाइट टेक्नोलॉजीज: ऑप्टिकल फायबर नेटवर्क तयार करण्यासाठी कंपनीने भारती एअरटेलशी हातमिळवणी केल्यानंतर स्टरलाइट टेक्नोलॉजीच्या शेअर्समध्ये ३.६२% ची वाढ झाली व त्यांनी १६२.९५ रुपयांवर व्यापार केला.


वेदान्ता लिमिटेड: वेदान्ताच्या बाजूने निवाडा दिल्यानंतर त्याच्या अंमलवजावणीस आव्हान देणारी सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. तरीही कंपनीचे शेअर्स १.८६% नी वाढले व त्यांनी १३४.०० रुपयांवर व्यापार केला.


पीव्हीआर लिमिटेड: पीव्हीआर लिमिटेडचे शेअर्स १.३२% नी वाढले व त्यांनी १,२४८.०० रुपयांवर व्यापार केला. कंपनीने जून २०२० मध्ये संपलेल्या तिमाहित एकत्रित महसूल ५५ कोटी रुपयांचा झाल्याने नोंदवले. मागील वर्षी याच काळात एकत्रित महसूल ८८७ कोटी होता. या तिमाहीत कर भरल्यानंतर कंपनीचा एकत्रित तोटा २२६ कोटी रुपये झाला.


भारती एअरटेल: भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये १ टक्क्यांनी वाढ झाली मात्र नंतर ०.८२ टक्क्यांनी घसरण झाली. टेलिकॉम क्षेत्रात दिग्गज असलेल्या या कंपनीने स्टरलाइट टेक्नोलॉजीसोबत १० टेलिकॉम सर्कलमध्ये आधुनिक ऑप्टिकल फायबर नेटवर्क तयार करण्यासाठी करार केल्यानंतर कंपनीच्या शेअर्सनी ४८१.५५ रुपयांवर व्यापार केला.


भारतीय रुपया: सकारात्मक देशांतर्गत इक्विटी मार्केटच्या पार्श्वभूमीवर भारतीय रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७३.५२ रुपयांचे मूल्य कमावले.


सोने: आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचे दर काहीसे घसरल्याने एमसीएक्सवर सोन्याने उच्चांकी व्यापार केला. ऑक्टोबर २०२० मधील सोन्याचे वायदे ०.१६% वाढून ५१,८५० रुपये प्रति १० ग्राम एवढे झाले.


तेल: अमेरिकेतील किनारपट्टीवरील तेल आणि वायू उत्पादनाला चक्रिवादळाचा फटका बसल्यानंतर आजच्या सत्रात तेलाचे दर वाढले. तथापि, जागतिक तेल मागणी कमी झाल्याने नुकसानावर मर्यादा आल्या.


जागतिक बाजार: आजच्या सत्रात जागतिक बाजारपेठेची संमिश्र कामगिगरी दिसली. गुंतवणुकदारांनी फेडरल रिझर्व्हकडून मदतीच्या धोरणाची अपेक्षा केल्याने अमेरिकी शेअर्समध्ये वाढ झाली. तथापि, युरोपियन स्टॉक्स लाल रंगात स्थिरावले. नॅसडॅक १.१२%% आणि निक्केई २२५ चे शेअर्स ०.०९% नी वाढले. तर दुसरीकडे एफटीएसई एमआयबी, एफटीएसई १०० व हँगसेंगचे शेअर्स अनुक्रमे ०.४७%, ०.१८% आणि ०.०३% नी घटले.

Comments

Popular posts from this blog

Piramal Capital & Housing Finance Limited Secured NCD Public Tranche I - Issue Opens on July 12, Coupon Rate Upto 9.00% p.a.#

54 School Principals from across India get the prestigious Change Maker Award for digital transformation & holistic learning

Samco Launches ‘KyaTrade’ - India’s First Real-time Stock Trading & Recommendation App