जागतिक दागिने उद्योगाची हरवलेली चमक पुन्हा आणण्याचे व्हॉइसचे उद्दिष्ट

जागतिक दागिने उद्योगाची हरवलेली चमक पुन्हा आणण्याचे व्हॉइसचे उद्दिष्ट

भारतीय दागिने उद्योगाला व्हॉइसकडून फायदा मिळणार असून जागतिक साथ, लॉकडाऊन, सणांच्या प्रतिबंधामुळे झालेल्या अनेक महिन्यांच्या नुकसानातून सुधारण्याकडे त्यांचे लक्ष लागले आहे

सप्टेंबर २०२०: जागतिक दागिने उद्योगाला कोविड-१९ जागतिक साथीमुळे मोठा फटका बसला आहे. विशेषतः भारतासारख्या देशांना रद्द झालेल्या किंवा पुढे ढकललेल्या लग्नासारख्या उत्सवांचा मोठा फटका बसला आहे.

जेव्हा प्रत्येक भारतीय आणि जागतिक उद्योग लॉकडाऊनमधील सवलतींमध्ये सुधारणेवर लक्ष केंद्रित करत असताना इटालियन प्रदर्शन समूह (आयईजी) या विविध कार्यक्रमांसोबत व्हिकेन्झारो या कार्यक्रमाच्या आयोजक कंपनीने व्हॉइस या अत्यंत आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनाची घोषणा शनिवार दिनांक १२ ते १४ दरम्यान व्हिकेन्झा एक्स्पो सेंटरमध्ये केली असून जानेवारी २०२१ मध्ये आयोजित होणाऱ्या विकेन्झारो या व्यापार कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जगभरात उद्योग आणि निर्यात उपक्रमांना नव्याने स्थापित करण्यासाठी सोने आणि दागिने क्षेत्राला एकत्र आणले जाणार आहे. या उपक्रमाचे आयोजन आयईजीकडून परकीय कामकाज आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्रालय व इटालियन ट्रेड एजन्सीच्या सहयोगाने केले जाणार असून ते मुख्यत्वे नावीन्यपूर्णता, आयोजन आणि जबाबदारीने वागणूक या गोष्टींवर भर देतील. हा उपक्रम आयईजीच्या #सेफबिझनेस प्रोजेक्टच्या पूर्ततेनुसार (https://www.iegexpo.it/it/safebusiness), कंपन्यांच्या आणि अभ्यागतांच्या संपूर्ण आरोग्याच्या संरक्षणाची हमी देऊन आयोजित केला जाणार असून ५० पेक्षा अधिक मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जातील. त्यात तिकिटांचे आणि प्रदानांचे डिजिटलायझेशन ते तापमान नियंत्रण आणि सॅनिटायझेशन मार्ग इत्यादी बाबी आहेत. आयईजीने व्हिकेन्झा एक्झिबिशन सेंटरसाठी स्वच्छतेचा आंतरराष्ट्रीय दर्जा कायम राखण्यासाठी जीबॅक स्टार्टटीएम प्रोग्राम निवडला आहे. उद्योगाच्या जागतिक पुनर्स्थापनेला चालना देण्यासाठी सुरूवात केलेला व्हॉइस हा कार्यक्रम 'फायजिटल' या विशेष प्रकारात- प्रत्यक्ष आणि व्हर्च्युअल बाबी एकत्रित आणून आयोजित केला जाईल.

'मेड इन इटली' हॉलमार्क हे दागिन्यांच्या कारागिरीतील सर्वोत्तमतेचे प्रतीक असून त्यामुळे इटली हस्तकलेच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे. या देशाकडे डिझाइन, फॅशन आणि स्टाइलसाठी आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून ओळखले जाते आणि इटलीत बनवलेले दागिने जगभरात अत्यंत आवडीने वापरले आणि मागवले जातात. दागिन्यांच्या उत्पादन तंत्रज्ञानातील आघाडीवरील देश म्हणून इटलीकडे पाहिले जाते. त्यामुळे या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वारशातून येणारा हा उपक्रम एक महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखला जातो.

भारतासारख्या देशांसाठी व्हॉइसला एक उपक्रम म्हणून अत्यंत महत्त्व आहे. कारणसोने आणि चांदीच्या चढ्या किंमती, आणि रिटेल क्षेत्रात असलेली प्रचंड अशाश्वतता यांच्यासारख्या जागतिक समस्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या दागिन्यांच्या उद्योगात एक नवीन जीवनदान दिले जाणार आहे. भारतात दागिन्यांच्या उद्योगाला खूप मोठा फटका बसला आहे. कारण मोठ्या प्रमाणावरील खरेदी थांबली आहे आणि लग्नाचा हंगाम असतानाही दागिन्यांच्या दुकानांमध्ये लोक येताना दिसत नाहीत. मार्च २०२० हा सलग १२ वा महिना होता, जेव्हा वार्षिक पातळीवरील निर्यातीत सकारात्मक वाढ दिसून आली नाही. आर्थिक वर्ष २० मध्ये खडे आणि दागिन्यांची एकूण निर्यात वार्षिक पातळीवर १० टक्क्यांनी कमी झाली असून ती ३५,५३१ दशलक्ष डॉलरवर गेली आहे. महत्त्वाच्या वस्तू जसे कापलेले आणि पॉलिश केलेले हिरे, कच्चे हिरे, सोन्याचे मेडल्स आणि नाणी व रंगीत खडे यांच्या निर्यातीला मागणी कमी झाल्याचे दिसून आहे.

या उद्योगाला सीमाशुल्क आणि निर्यातीसारख्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणावर आव्हान निर्माण झाले होते. किंमतीत अचानक वाढ झाल्यामुळे मागील काही महिन्यांत विक्रीमध्ये घट झाली होती. या साथीच्या उद्रेकामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसानात भर पडली कारण सर्व रिटेल दुकाने लॉकडाऊनच्या काळात बंद होती. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा सोन्याचा ग्राहक असलेल्या देशात मागणीमध्ये प्रचंड घट झाली. कारण मागील दशकाच्या कालावधीत वाढीचा वेग अत्यंत कमी होता.

अशा कालावधीत लॉकडाऊन हळूहळू उघडत असून बाजारपेठा खुल्या होऊ लागल्यामुळे व्हॉइससारखी व्यासपीठे भारतीय दागिने उद्योगाला सुधारणेच्या दिशेने जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरण्यासाठी सज्ज आहेत.

व्हॉइसचे उद्दिष्ट भारतीय तसेच जागतिक दागिन्यांच्या जगाला आवाज देण्याचे आणि ट्रेंड तयार करणे व आर्थिक सुधारणेच्या टप्प्यावर मदत करण्याचे आहे. हे उपक्रम अत्यंत अद्ययावत टीव्ही ब्रॉडकास्टिंग यंत्रणांसोबत समावेश करणे आणि डिजिटल साधनांचा वापर करणे यांच्याद्वारे सुरू होतील तसेच सर्व सत्रे तसेच चर्चासत्रे यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक यांच्यासारख्या प्लॅटफॉर्म्सवर लाइव्ह दाखवली जातील आणि संपूर्ण जगभरात पाहिली जातील.

तीन दिवसांच्या कालावधीत व्हॉइस हे एक असे चर्चासत्र म्हणून आयोजित केले जाईल, जिथे आंतरराष्ट्रीय दागिने समूहातील मतप्रवर्तक- दामियानी ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी ते डीबीअर्सचे कार्यकारी संचालक, वर्ल्ड डायमंड कौन्सिलचे अध्यक्ष ते वर्ल्ड ज्वेलरी कॉन्फडरेशनचे अध्यक्ष (सिब्जो), रिस्पॉन्सिबल ज्वेलरी कौन्सिलचे कार्यकारी संचालक ते सर्वाधिक प्रतिष्ठित इटालियन सोने आणि दागिने कंपन्यांचे सीईओ, ज्यात बल्गरी आणि पोमेलाटो यांचा समावेश आहे, हे सर्वजण विविध विषयांवर चर्चा आणि समन्वय साधतील. त्यात दागिने उद्योगाची स्थिती आणि आगामी आव्हानांचा समावेश असेल. दागिने ब्रँड्स आणि डिझायनर्स यांनाही आपले नवीन कलेक्शन, अद्ययावत डिझाइन ट्रेंड्स व समकालीन प्रक्रिया तसेच प्रोसेसिंग नावीन्यपूर्णता दाखवणे शक्य होईल. एक खास आणि अत्यावश्यक आऊटफिटिंग साहित्य याउपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांचे स्वागत करेल. दरम्यान, इटलीला प्रवास करणे शक्य नसलेल्या ग्राहकांसाठी आणि व्हर्च्युअल सहभागींसाठी बायर व्हर्च्युअल रूम तयार केली जाईल.

इटालियन एक्झिबिशन ग्रुपचे ज्वेलरी आणि अँड फॅशनचे ब्रँड संचालक मार्को कार्निएलो म्हणाले की, ''जगभरातील उद्योग आता विकसित होऊ लागले आहेत आणि त्यांना सुधारणेची अपेक्षा आहे. अनेक महिने लाइव्ह कार्यक्रम न झाल्यानेव्हॉइस एक खास प्लॅटफॉर्म सादर करेल, जो लाइव्ह आणि डिजिटलचे मिश्रण असेल. त्याचे उद्दिष्ट जागतिक दागिने उद्योगातील समभागधारकांना एक आवाज देण्याचे असून त्यातून त्यांना आपले नवीन कलेक्शन, नवीन डिझाइन ट्रेंड्स आणि समकालीन प्रोसेसिंग नावीन्यपूर्णता दाखवता येईल. आम्हाला आंतरराष्ट्रीय ज्वेलरी उद्योगाला पुन्हा एकत्र आणताना आनंद होत आहे.''

व्हॉइस हे उत्पादनांसाठीही अत्यंत महत्त्वाचे असेल कारण यातील व्यापार संपर्क समभागधारकांना बिझनेसच्या संधींचा पाठपुरावा करण्यासाठी देण्यात आले आहेत. ही परिषद भविष्यातील व्यापार निर्माण करून विद्यमान आव्हाने सोडवण्यासाठी शिक्षण आणि माहितीचे मिश्रण असेल

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth