एसबीआय कार्डने गुगलसोबत सहयोगाने कार्डधारकांना दिली गुगल पेच्या माध्यमातून पेमेण्ट्सची करण्याची सुविधा
एसबीआय कार्डने गुगलसोबत सहयोगाने कार्डधारकांना दिली
गुगल पेच्या माध्यमातून पेमेण्ट्सची करण्याची सुविधा
मुंबई, २१ सप्टेंबर २०२०: भारतातील सर्वात मोठी प्युअर-प्ले क्रेडिट कार्ड कंपनी एसबीआय कार्डने आज कार्डधारकांना त्यांचे एसबीआय क्रेडिट कार्डस् गुगल पे व्यासपीठावर वापरण्याची सुविधा देण्यासाठी गुगलसोबत सहयोगाची घोषणा केली. एसबीआय क्रेडिट कार्ड युजर्स आता त्यांच्या अँड्रॉईड स्मार्टफोन्सवरील गुगल पे अॅपचा वापर करत कार्ड पेमेण्ट्स करू शकतात. कार्डधारक आता एनएफसी सक्षम पीओएस टर्मिनल्स येथील टॅप अॅण्ड पे, व्यापा-यांजवळील भारत क्यूआर कोडचे स्कॅनिंग करत, तसेच प्रत्यक्ष क्रेडिट कार्डचा वापर न करता ऑनलाइन पेमेण्ट्स अशा तीन मोड्सच्या माध्यमातून गुगल पेचा वापर करत सुरक्षितपणे व विश्वसनीयपणे पेमेण्ट्स करू शकतात. हे सादरीकरण एसबीआय कार्डच्या सुरक्षित व सुधारित ग्राहक अनुभवासाठी पेमेण्ट्सच्या विनासंपर्क, डिजिटल पद्धतीला चालना देण्याच्या प्रयत्नांशी संलग्न आहे.
टोकनायझेशनच्या माध्यमातून उच्च सुरक्षित पेमेण्ट अनुभव मिळतो, जेथे कार्डधारक गुगल पेचा वापर करत व्यापा-याला प्रत्यक्ष कार्ड माहिती न सांगता त्यांच्या फोनशी जोडलेल्या डिजिटल टोकनच्या माध्यमातून पेमेण्ट करू शकतो. गुगल पे भारतातील मेट्रो, तसेच नॉन-मेट्रो शहरांमधील अधिकाधिक व्यापा-यांकडून पेमेण्ट अॅप म्हणून वापरले जात आहे. या सहयोगाच्या माध्यमातून एसबीआय कार्डचा कार्डधारकांना गुगल पेच्या माध्यमातून पेमेण्ट सुविधा देण्याचा आणि त्यांच्या मोबाइल फोन्सवर सुरक्षित पेमेण्ट अनुभव देण्याचा मनसुबा आहे. सध्या है वैशिष्ट्य व्हिसा प्लॅटफॉर्मवरील एसबीआय कार्डधारकांसाठी उपलब्ध आहे.
कार्डधारकांना पुढील काही पाय-यांचे पालन करत गुगल पे प्लॅटफॉर्मवर त्यांच्या एसबीआय कार्डची एकदाच नोंदणी करावी लागेल:
१. अँड्रॉईड मोबाइल फोनवर गुगल पे अॅपचे नवीन व्हर्जन डाऊनलोड करा.
२. सेटिंग्जमधील पेमेण्ट पद्धतीमध्ये 'अॅड कार्ड' प्रेस करा.
३. कार्डधारक नाव, कार्ड क्रमांक, एक्स्पायरी, सीव्हीव्ही प्रविष्ट करा आणि ओटीपीची पुष्टी करा.
४. ओटीपी सत्यापन केल्यानंतर कार्डची पेमेण्ट्ससाठी नोंदणी केली जाईल एनएफसी-सक्षम टर्मिनल्स, भारत क्यूआर सक्षम व्यापारी आणि निवडक ऑनलाइन व्यापा-यांना पेमेण्ट्स करण्याकरिता ही सुविधा वापरता येईल.
या सहयोगाबाबत बोलताना एसबीआय कार्डचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अश्विनी कुमार तिवारी म्हणाले, ''एसबीआय कार्डमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांसाठी जीवन सुलभ व सर्वोत्तम बनवण्यासाठी नाविन्यतेच्या पलीकडे जाण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहोत. गुगल पेसोबतचा सहयोग हे या दिशेने आणखी एक सकारात्मक पाऊल आहे. पेमेण्ट्स विभागातील आघाडीची प्रदाता सेवा गुगल पे सोबतचा आमचा सहयोग आम्हाला युजरवर्गाला सुरक्षित, आरामदायी डिजिटल पेमेण्ट सोल्यूशन्स देण्यामध्ये सक्षम करेल. भारतामध्ये स्मार्टफोनचा वापर झपाट्याने वाढत असताना मोबाइल फोनवर क्रेडिट कार्डस् सुरक्षितपणे वापर करण्याच्या पद्धतीमध्ये देखील बदल झाला आहे. गुगलसोबतचा आमचा सहयोग स्मार्टफोनचा वापर करणा-या आमच्या ग्राहकांसाठी नवीन, सुरक्षित व एकसंधी पेमेण्ट सुविधा देतो.''
भारतातील गुगल पे आणि नेक्स्ट बिलियन युजर्सचे व्यवसाय प्रमुख सजित शिवनंदन म्हणाले, ''आम्हाला एसबीआय कार्डसोबत सहयोगाने भारतीय युजर्ससाठी टोकनायझेशन सारखी जागतिक दर्जाची सुरक्षितता सुविधा सादर करण्याचा आनंद होत आहे. आम्ही आगामी वर्षांमध्ये देखील पेमेण्ट्स अधिक सुरक्षित, सोईस्कर व आरामदायी करण्याप्रती कटिबद्ध आहोत.''
Comments
Post a Comment