भारतीय निर्देशांकांत किरकोळ घसरण

 भारतीय निर्देशांकांत किरकोळ घसरण


मुंबई, २९ सप्टेंबर २०२०: आजच्या सत्रातील प्रचंड चढ-उताराअंती भारतीय निर्देशांकांत किरकोळ घसरण झाली. 

धातूच्या शेअर्सनी आजच्या व्यापारी सत्रात चमकदार कामगिरी केली तर बँकिंग, वित्तीय, फार्मा आणि एफएमसीजी स्टॉक्स नकारात्मक स्थितीत बंद झाले. निफ्टी ०.०५% किंवा ५.१५ अंकांनी घसरला व ११,२२२.४० अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.०२% किंवा ८.४१ अंकांनी घसरून ३७,९७३.२२ अंकांवर थांबला.


एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आज जवळपास ११७० शेअर्सना नफा झाला, १४०६ शेअर्स घसरले तर १६८ शेअर्स स्थिर राहिले. हिंडाल्को इंडस्ट्रीज (५.३१%), अल्ट्राटेक सिमेंट (३.३२%), जेएसडब्ल्यू स्टील (२.११%), हिरो मोटोकॉर्प (२.८५%) आणि टीसीएस (२.४९%) हे निफ्टीतील टॉप गेनर्समध्ये समाविष्ट होते. तर ओएनजीसी (३.४८%), इंडसइंड बँक (३.४६%), युपीएल (३.४९%), पॉवर ग्रिड कॉर्प (३.२१%) आणि अॅक्सिस बँक (२.७९%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.


आयटी, मेटल आणि ऑटो सेक्टरने आज खरेदी अनुभवली. तर दुसरीकडे बँक, एफएमसीजी, इन्फ्रा, फार्मा आणि एनर्जी निर्देशांकात घट दिसून आली. बीएसई मिडकॅप ०.३१ टक्क्यांनी घसरला तर बीएसई स्मॉलकॅपमध्ये ०.०३% ची वाढ झाली.


श्री सिमेंट लिमिटेड: कंपनीने रायपूरमध्ये बलोडा बाजार येथे क्लिनकर युनिट उभारण्याची परवानगी दिली. त्यानंतर श्री सिमेंटचे स्टॉक्स १.३४% नी वाढले व त्यांनी १९,७९५.०० रुपयांवर व्यापार केला. यामुळे प्रकल्पाची क्षमता दररोज १२००० टनांनी वाढेल. यासाठी १००० कोटींच्या आसपास गुंतवणुकीची गरज आहे.


एसबीआय कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस लि.: एसबीआय कार्ड्सने अमेरिकन एक्सप्रेससोबत धोरणात्मक भागीदारी केली. या भागीदारीतून संमिश्र जागतिक लाभ मिळतील. तसेच भारतातील ग्राहकांना विशेष सवलत मिळेल. एसबीआयचे स्टॉक्स ०.४३% नी वाढले व त्यांनी ८४५.०० रुपयांवर व्यापार केला.


 


स्टील स्ट्रिप व्हील्स लि.: कंपनीने ईयू ट्रेलर मार्केटसाठी ९,००० चाकांची निर्यात ऑर्डर स्वीकारली. चेन्नई येथील प्रकल्पातून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही ऑर्डर पूर्ण केली जाईल. कंपनीचे शेअर मूल्य २.२९% नी वाढले व त्यांनी ४४३.१५ रुपयांवर व्यापार केला.


प्राइम फोकस लिमिटेड: कंपनीने २०२५ मध्ये सुरक्षित नोटांच्या एकूण मूळ रकमेत ३७५ दशलक्ष अमेरिकी डॉलरची खासगी ऑफरिंग देण्याची घोषणा केली. कंपनीचे स्टॉक्स ९.९७ टक्क्यांनी वाढले व त्यांनी ४१.३५ रुपयांवर व्यापार केला.


भारतीय रुपया: अस्थिर देशांतर्गत इक्विटी बाजारामुळे भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७३.८६ रुपये मूल्यावर घसरला.


जागतिक बाजार: आजच्या सत्रात कोव्हिड-१९ रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने तसेच मागील आठवड्यातील विक्रीमुळे अमेरिकी बाजारात सुधारणा दिसून आल्याने आशियाई आणि युरोपियन बाजाराने आजच्या सत्रात संमिश्र संकेत दर्शवले. नॅसडॅकने १.८७%, एफटीएसई एमआयबीने ०.०२%, निक्केई २२५ ने ०.१२% ची वृद्धी दर्शवली. तर एफटीएसई १०० आणि हँग सेंगने अनुक्रमे ०.४९% आणि ०.८५% ची घट अनुभवली.

Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy