इन्फ्लूएंसर मार्केटिंग स्टार्टअप 'क्लॅनकनेक्ट.एआय'ची ५ कोटींची निधी उभारणी

 इन्फ्लूएंसर मार्केटिंग स्टार्टअप 'क्लॅनकनेक्ट.एआय'ची ५ कोटींची निधी उभारणी



मुंबई, २३ सप्टेंबर २०२०: क्लॅनकनेक्ट.एआय (ClanConnect.ai) या ब्रँडसाठीच्या सेल्फ सर्व्ह इन्फ्लुएंसर मार्केटिंग स्टार्टअपने ५ कोटी रुपयांची बीज फेरी यशस्वीरित्या पूर्ण केली. या निधीफेरीचे नेतृत्व व्हेंचर कॅटॅलिस्ट्सनी केले. तसेच यात फॉरेस्ट इसेन्शिअल्सचे व्यवस्थापकीय संचालक समर्थ बेदी, ड्रूम.इनचे संस्थापक संदीप अग्रवाल, हॅपटिकचे सह संस्थापक आक्रीत वैश आणि रेडचिलीज व्हीएफएक्सचे चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर हरेश हिंगोरानी आदी दिग्गज उद्योगपतींचा सहभाग होता.


हा कृत्रिम बुद्धिमत्ता संचलित इन्फ्लुएंसर मार्केटिंग मंच व्हॅल्यू३६० कम्युनिकेशन्सचे सहसंस्थापक कुणाल किशोर सिन्हा, चेईल इंडियाचे माजी डिजिटल मिडिया प्रमुख सागर पुष्प आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते अंशाई लाल यांनी स्थापन केला आहे. क्लॅनकनेक्ट.एआय हा एआय संचलित इन्फ्लुएंसर मार्केटिंग प्लॅटफॉर्म असून याद्वारे विविध ब्रँड्सना त्यांचे प्रभावी मार्केटिंग उपक्रम अधिक माहितीपर व परिणामकारक होण्यासाठी मदत करते. हा मंच डिस्कव्हरी, मॅनेजमेंट आणि परफॉर्मन्स हे तिन्ही एकाच प्रणालीत आणून विविध ब्रँड्सना त्यांचे मार्केटिंगचे प्रयत्न अधिक यशस्वी होण्यासाठी मदत करतो. लक्ष्यित सर्च आणि ग्राहकांनुसार विश्लेषक आणि मार्केटर्स अधिक प्रासंगिक इन्फ्लूएंसर्स शोधून त्यांच्याशी हातमिळवणी करू शकतात. क्लॅनकनेक्ट.एआय हे प्रत्येक इन्फ्लूएंसची योग्यता आणि पोहोच मोजण्यासाठी विविध प्रकारचे ३० पॅरामीटर्स प्रदान करते.


व्हेंचर कॅटलिस्टचे सह संस्थापक व अध्यक्ष डॉ. अपूर्व रंजन शर्मा म्हणाले, “ जागतिक इन्फ्लूएंसरची बाजारपेठ ९ अब्ज डॉलरपर्यंत विस्तारली आहे. २०२५ पर्यंत ती २४ अब्ज डॉलरला स्पर्श करेल, अशी अपेक्षा आहे. महामारीमुळे डिजिटलच्या स्वीकारास गती मिळाली असून, आता लोकांचा परस्परांशी असलेला संबंध हे मार्केटिंगचे प्रमुख साधन बनेल, असे आम्हाला वाटते. या विस्तारणाऱ्या क्षेत्राचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी वित्तीयदृष्ट्या शिस्तबद्ध असलेल्या सास बिझनेस असलेल्या क्लॅनकनेक्ट.एआयच्या प्रवासात साथीदार होत असल्याबद्दल आम्ही उत्साही आहोत.”


क्लॅनकनेक्ट.एआयचे सह संस्थापक आणि सीईओ सागर पुष्प म्हणाले, “ भारत हा इन्फ्लूएंसर्सने समृद्ध समाज आहे. येथे देशाच्या सर्व भागातील डिजिटल नेटिव्ह एकत्र सहभाग घेतात. या समाजात असूनही प्रचंड प्रकारच्या शक्यता दडलेल्या असून त्या अद्याप अज्ञात आहेत, असे मला वाटते. योग्य प्रोत्साहन मिळाले आणि उद्योगाचा योग्य पाठिंबा मिळाला तर तो आणखी चांगले काम करेल. हेच साध्य करण्याचे प्रयत्न आमचा समर्पित एआय संचालित इन्फ्लूएंसर मार्केटिंग आणि कोलॅबरेशन मंच करत आहे.”

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24