‘जॉन्सन्स’ बेबीतर्फे भारतात नवीन ‘कॉटनटच’ श्रेणी खास ‘इ-कॉमर्स’वर सादर

जॉन्सन्स बेबीतर्फे भारतात नवीन कॉटनटच श्रेणी
खास इ-कॉमर्सवर सादर



नैसर्गिक कापूस अनोख्या रितीने मिसळलेल्या उत्पादनांची नवीन श्रेणी देते यापूर्वी कधीही अनुभवली नव्हती अशी कोमलता

राष्ट्रीयसप्टेंबर 14 , 2020 : लहान बाळांच्या नाजूक व संवेदनशील त्वचेची काळजी घेण्याच्या दृष्टीने नैसर्गिक कापसाचा अंश असलेल्या उत्पादनांची कॉटनटच या नावाची श्रेणी जॉन्सन्स बेबीने सादर केली. केवळ इ-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरच उपलब्ध असणाऱ्या या नवीन श्रेणीमध्येवॉशलोशनक्रीम व तेल यांचा समावेश आहे. अॅमेझॉन, फ्लिपकार्टबिग बास्केटफर्स्टक्राय आणि नायका या प्लॅटफॉर्मवर ही उत्पादने आजपासून मिळू लागतील.

जॉन्सन्सला 125 वर्षांचा वारसा आहे. या कंपनीने बनविलेली अतिसुरक्षित उत्पादने मातांनी आपल्या बाळांसाठी विश्वासाने व भरवशाने वापरली आहेत. संपूर्ण विश्वासार्ह अशा बेबी केअर ब्रॅंड्सकडून विज्ञानाधारीत व प्रभावी ठरणाऱ्या उत्पादनांना सध्याच्या आव्हानात्मक काळात वाढती मागणी असल्याने तिची दखल घेऊन कॉटनटच ही नवी अनोखी श्रेणी सादर करण्यात आली आहे. भारतीय बाजारात कॉटनटचचे स्वागत करण्यासाठी जॉन्सन्सने 700 हून अधिक प्रभावकारांना नेमले आहे.

कॉटनटच ही अतिशय गहन स्वरुपाच्या संशोधन व विकासातून निर्माण करण्यात आलेली एक अभिनव श्रेणी आहे. बेबी केअर उत्पादनांमध्ये नैसर्गिक कापसाचा वापर करण्यात आलेली आणि बाळाच्या त्वचेला अजिबात त्रासदायक नसलेली ही जगातील पहिलीच उत्पादने आहेत. यामध्ये अतिशय नरम अनुभव मिळावायासाठी मऊशोषक व अॅलर्जीविरहीत नैसर्गिक कापूस वापरण्यात आलेला आहे.

जॉन्सन अँड जॉन्सनच्या कन्झ्युमर डिव्हिजनचे भारतातील मार्केटिंग व्हाईस प्रेसिडेंट मनोज गाडगीळ म्हणाले, “नवजात बालकांसाठी सर्वात चांगले काययाचा विचार सांगणारी सर्वात सुरक्षित बेबी केअर उत्पादने बनविण्यामध्ये दीर्घकालीन कटिबद्धतेसाठी जॉन्सन्स हा ब्रॅंड ओळखला जातो. बाळाची त्वचा समजून घेण्यासाठी आम्ही अनेक दशके गुंतवणूक केलेली आहे आणि नवजात बाळाच्या त्वचेच्या गरजा कोणत्या आहेत व त्याला कोमल स्वरुपाची काळजी कशी घ्यावी लागतेहे आम्हाला चांगले ठाऊक आहे. म्हणूनच आम्ही कॉटनटचची श्रेणी सादर करीत आहोत. यातून मातांना कोमलता मिळतेजी त्यांनी यापूर्वी कधीही अनुभवली नव्हती. टाऴेबंदीच्या काळातदेखील भारतीय बाजारांत बेबी केअरला खूप मोठी मागणी असल्याचे आम्ही पाहिले आहे. त्यावेळी सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वोच्च गुणवत्ता असलेल्या उत्पादनांविषयी अनेक मातांनी चौकशी केलेली होती. त्यातूनच आम्हाला हे उत्पादन सादर करण्याची प्रेरणा मिळाली आहे. आम्ही इ-कॉमर्सच्या मार्गाने शक्य तितक्या पालकांपर्यंत पोहोचण्याची आणि त्यांचा पालकत्वाचा प्रवास अधिक आनंददायक बनविण्यात मदत करण्याची आशा बाळगून आहोत.’’

नवीन कॉटनटच श्रेणी रिटेल बाजारपेठेत काही आठवड्यांतच उपलब्ध होईल.

इ-कॉमर्स पोर्टल्सच्या लिंक्स:

https://www.flipkart.com/johnson's-store

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth