भारतीय निर्देशांकाचा उच्चांकी व्यापार, जागतिक बाजारात सकारात्मक भावना

 भारतीय निर्देशांकाचा उच्चांकी व्यापार, जागतिक बाजारात सकारात्मक भावना


मुंबई, १५ सप्टेंबर २०२०: आजच्या व्यापारी सत्रात बेंचमार्क निर्देशांकाने उच्चांकी स्थिती गाठली. सकारात्मक बाजार भावनांमुळे हे परिणाम दिसून आले. आज फार्मा क्षेत्रात खरेदी दिसली. निफ्टी ०.७१% किंवा ८१.७५ अंकांनी वाढला व ११,५०० ची पातळी ओलांडत ११,५२१.८० वर बंद झाला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.७४%किंवा २८७.७२ अंकांनी वधारला व ३९,०४४.३५ वर बंद झाला.


एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात इंडसइंड बँक (४.६८%), सिपला (२.८८%), युपीएल (२.७५%), अॅक्सिस बँक (२.३४%) आणि भारती एअरटेल (२.३१%) हे आज निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर टायटन (१.३५%), मारुती सुझुकी (१.११%), एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स (०.९१%), आयशर मोटर्स (०.८५%) आणि आयटीसी (०.८२%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.


निफ्टी प्रायव्हेट बँक, निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि निफ्टी आयटी क्षेत्रानंतर निफ्टी फार्माने २% ची वृद्धी घेतली. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅपने अनुक्रमे ०.८५% आणि १.४४% नी उच्चांकी व्यापार केला.


आयसीआयसीआय बँक: बँकेला तीन वर्षांसाठी विमा सहाय्यक कंपन्यांमध्ये स्टेक खरेदी करण्याची सवलत मिळाली. त्यामुळे कंपनीचे शेअर्स २.२०% नी वाढले व त्यांनी ३७१.७० रुपयांचे मूल्य कमावले.


श्रेई इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेड: श्रेई इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स ७.५९% नी वाढले व त्यांनी ७.८० रुपयांवर व्यापार केला. कंपनीने जूनच्या तिमाहीत नफा नोंदवल्याने हे परिणाम दिसले. कर भरल्यानंतर कंपनीचा एकत्रित नफा २३.०१ कोटी रुपये झाला.


फ्युचर रिटेल: २०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहित कंपनीने एकत्रित निव्वळ नुकसान ५६१.९५ कोटी रुपये झाल्याचे नोंदवले. या नुकसानीनंतरही कंपनीचे शेअर्स २.८२% नी वाढले व त्यांनी १०३.९५ रुपयांवर व्यापार केला.


मिंडा इंडस्ट्रिज: राइट इश्युजद्वारे २४२ कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे कंपनीने ठरवल्यानंतर मिंडा इंडस्ट्रिज कंपनीचे शेअर्स ३.८२% नी वाढले व त्यांनी ३६५.२० रुपयांवर व्यापार केला.


भारतीय रुपया: आजच्या सत्रात देशांतर्गत इक्विटी मार्केट सकारात्मक असूनही अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने ७३.६४ रुपयांवर व्यापार केला.


जागतिक बाजार: संभाव्य कोव्हिड-१९ लस विकसित होण्याच्या वाढत्या अपेक्षांच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजार निर्देशांकाने सकारात्मक व्यापार केला. नॅसडॅकने १.८७% ची वृद्धी घेतली तर हँगसेंगने ०.३८% ची वाढ दर्शवली. तर एफटीएसई एमआयबी आणि एफटीएसई १०० ने अनुक्रमे ०.७२% आणि १.०९% ची वृद्धी घेतली. तरनिक्केई २२५ कंपनीचे शेअर्स आजच्या सत्रात ०.४४% नी घटले.

Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy