दापोली येथे लाइफस्टाइल प्लॉट्स खरेदीची संधी

 

दापोली येथे लाइफस्टाइल प्लॉट्स खरेदीची संधी

~ झानाडू रिअॅलिटीचा प्रकल्प; २५०० चौरस फुटांचे प्लॉट्स ९.९० लाखांत उपलब्ध ~

मुंबई, ११ सप्टेंबर २०२०: झानाडू रिअॅलिटी या अग्रगण्य रिअॅलिटी प्लॅटफॉर्मने ब्लिस (ब्रँड लँड इन्व्हेस्टमेंट स्टॉक्स स्कीम) हा प्रकल्प सादर केला असून याअंतर्गत ग्राहकांना भारताच्या एकमेव किनारपट्टीवरील हिल स्टेशन असलेल्या दापोली येथे नयनरम्य रहिवासी समुदायात लाइफस्टाइल प्लॉट्स खरेदी करुणायची सुवर्णसंधी मिळणार आहे. २५०० चौरस फुटांचे प्लॉट्स ९.९० लाख रुपये किंमतीला असून ग्राहक पहिल्या रकमेवर सहजपणे प्री-बुक करू शकतात.

पुणे आणि मुंबईवरून फक्त ५ तासांच्या अंतरावर असलेले दापोली हे कोकण किनारपट्टीवर वसलेले आहे. कोकण किना-यावरील अलिबागनंतरचे हे मोठे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होईल, असा अंदाज आहे. या प्रकल्पाच्या सुविधांमध्ये समुद्राच्या बाजूला क्युरेटेड लँड पार्सल, प्लॉट सहजपणे अधिग्रहित करण्यासाठी जमीन प्री-कट व पॅकेजिंग, वीज, रस्ते, पाणी या सर्व खात्रीशीर पायाभूत सुविधा, जागतिक पातळीवरील सुविधांसह संकल्पना आधारीत विकास, मालकीच्या कागदपत्रांत वैयक्तिक सात/बारा, एनकम्ब्रन्स सर्टिफिकेट आदींचा समावेश आहे.

झानाडू रिअॅलिटीचे संचालक श्री सॅम्युज्वल घोष म्हणाले, “भारतात ग्राहकांदरम्यान जमीन खरेदीचे लोकशाहीकरण करणे, हा आमचा उद्देश आहे. जमीन मालकीतील सर्व अडथळे दूर करत भारतातील सर्वात सुरक्षित मालमत्ता आणण्याचे आम्ही ठरवले आणि हे ब्लिस या कोडनेमद्वारे या योजनेची सुरुवात केली. योजनेअंतर्गत, या पातळीवरील विकासात गुंतवणूक करण्याची दुर्मिळ संधी दिली जात आहे.”

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार