मॅरिको लिमिटेडचा फ्रण्टलाईन कोविड-१९ योद्ध्यांना ५ लाख मास्क देण्याचा वायदा; महाराष्ट्रात ३ लाख तर गुजरातमध्ये २ लाख मास्क देणार

 मॅरिको लिमिटेडचा फ्रण्टलाईन कोविड-१९ योद्ध्यांना  लाख मास्क देण्याचा वायदा; महाराष्ट्रात  लाख तर गुजरातमध्ये  लाख मास्क देणार

मुंबई, 29 Sep 2020: मॅरिको लिमिटेड या भारतातील आघाडीच्या एफएमसीजी कंपनीने महाराष्ट्रातील फ्रण्टलाईन कोविड योद्ध्यांना ३ लाख मास्क वितरित करण्याचातर गुजरातमध्ये २ लाख मास्क वितरित करण्याचा वायदा केला आहेमेडिकर सॅनिटायजर या आपल्या नव्याने बाजारात आणलेल्या हेल्थ अँड हायजिन उत्पादनासह कंपनीने हा वायदा केला आहेया सॅनिटायजरच्या प्रत्येक बाटलीच्या विक्रीमागे कंपनी एक थ्री-प्लाय मास्क देणगी स्वरूपात देणार आहे.

महाराष्ट्रात हे मास्क बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी), ठाणे महानगरपालिका (टीएमसी), भारतीय अन्न सुरक्षितता व मानक प्राधिकरण (एफएसएसएआय), अन्न व औषध प्रशासन (एफडीएआणि महाराष्ट्र पोलिस या विभागांना दिले जाणार आहेतकंपनीने महाराष्ट्रातील या सर्व प्राधिकरणांना यापूर्वीच १.१५ लाख मास्क वितरित केले आहेत.

हे मास्क सरल डिझाइन्स या मुंबई स्थित स्टार्टअपकडून खरेदी करण्यात आले आहेतमॅरिको इनोव्हेशन फाउंडेशनच्या इनोव्हेट२बीट कोविड’ या राष्ट्रव्यापी विशाल स्पर्धेच्या माध्यमातून या स्टार्टअपची निवड मास्क खरेदीसाठी करण्यात आलीकिफायतशीरसृजनशील व मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याजोगी पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट्सव्हेंटिलेटर्स व  वैद्यकीय व्यावसायिकांना उपयुक्त ठरू शकतील अशी अन्य श्वसनविषयक उपकरणे तयार करण्यासाठी हे आव्हान देण्यात आले होतेसरलने कौशल्याने आपल्या पेटंट असलेल्या सॅनिटरी नॅपकिन उत्पादन यंत्राद्वारे उच्च दर्जाचे थ्री प्लाय सर्जिकल मास्क किफायतशीर पद्धतीने उत्पादित केले आहेत.

भारत अभूतपूर्व अशा जागतिक साथीला तोंड देत असतानाचमॅरिको लिमिटेड सरकारनागरिक व वैद्यकीय व्यावसायिकांना मदत करत आहेमेकिंग अ डिफरन्स’ या आपल्या घोषवाक्याशी सुसंगती राखत कंपनी अविश्रांत काम करत आहे आणि या लढ्यात सहाय्य करण्यासाठी असंख्य पद्धतींनी पुढाकार घेत आहेदेशभरातील स्थलांतर करणारे कामगारपोलिसआरोग्यसेवा कर्मचारीगरीब आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नाचे वितरण करण्यासोबतच कंपनी कोविडशी प्रत्यक्ष लढणाऱ्यांना सुरक्षा उपकरणेवैयक्तिक स्वच्छतेची साधणे व पीपीई किट्स वितरित करत आहे.  

 

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth