प्रोजेक्ट मुंबईने पर्यावरण व हवामानातील बदल मंत्रालयाच्या सहयोगाने जाहीर केला ‘एन्व्हॉयर्नमेंट 2.0 – जेन नेक्स्ट – लँड, वॉटर, एअर’ उपक्रम


प्रोजेक्ट मुंबईने पर्यावरण व हवामानातील बदल मंत्रालयाच्या सहयोगाने जाहीर केला

एन्व्हॉयर्नमेंट 2.0 – जेन नेक्स्ट – लँड, वॉटर, एअर उपक्रम

#मीforMaharashtra ही प्रेरणा कायम राखणार

मुंबई/एमएमआर व महाराष्ट्र येथील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करून या उपक्रमाला सुरुवात

 

विजेते पर्यावरण मंत्र्यांना सादर करणार अमलात आणता येतील असे उपाय

                                                                                                                       

मुंबई, 25 नोव्हेंबर 2020एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, पर्यावरणविषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी अमलात आणता येतील असे उपाय सुचवण्यासाठी मुंबई व महाराष्ट्र येथील शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहेविना-नफा तत्त्वावर कार्यरत प्रोजेक्ट मुंबई आणि महाराष्ट्र सरकार (पर्यावरण व हवामानातील बदल मंत्रालय) यांच्या या उपक्रमाचे उद्दिष्ट 'आयडियाज फॉर अॅक्शनया निबंध स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांना उपाय सुचवण्याची संधी देणे, हे आहे. ही स्पर्धा जबाबदार अशी युवा पिढी घडवण्यासाठी तरुणांमध्ये #मीforMaharashtra ही भावना रुजवणार आहे.

या स्पर्धेच्या निमित्ताने युवकांना मुंबईतील व महाराष्ट्रातील भूमी, पाणी व हवा यासाठी उपाय सुचवण्याची संधी मिळणार आहेया सर्जनशील उपक्रमामध्ये नीरी व पीडब्लूसी हे नॉलेज पार्टनर आहेतराज्यातील प्रमुख नागरिकांचा सहभाग असलेले नामवंत परीक्षक मंडळ स्पर्धेतील विजेत्यांची निवड करणार आहेत्यांना त्यांच्या कल्पना एका परिसंवादाद्वारे महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे व अन्य पर्यावरण तज्ज्ञ यांच्यासमोर मांडण्याची संधी मिळणार आहेविजेत्यांना 'एन्व्हॉयर्नमेंट 2.0-जेन नेक्स्टलँड, वॉटर, एअर' या फेब्रुवारी 2021 मध्ये होणाऱ्या परिषदेत सहभागी होण्याचीही संधी मिळणार आहे.

 

पर्यावरण व हवामानातील बदल मंत्रालयाच्या प्रमुख सचिव मनीषा म्हैसकर म्हणाल्या, महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण व हवामानातील बदल खात्याने नागरिकांना हवामानातील बदल व पर्यावरणीय समस्या यांविषयी जागरुक करण्यासाठी, तसेच पर्यावरणामध्ये सुधारण्यासाठी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी माझी वसुंधरा अभियान हा सर्वांगीण उपक्रम हाती घेतला आहे.

 

त्यांनी नमूद केले, “या खात्याने राज्याच्या शाश्वत विकासाच्या उद्देशाने हाती घेतलेला हा भूमी (पृथ्वी), जल (पाणी), वायू (हवा), अग्नी (ऊर्जाव आकाश (सुधारणाया पंचमहाभूतांवर आधारित असणारा भारतातील पहिलावहिला व विशेष उपक्रम आहेपर्यावरणविषयक प्रश्नांच्या बाबतीत तरुण पिढी उत्साहाने, बांधिलकीने व पुढाकाराने उपाय सुचवते आणि हे आमच्या दृष्टिकोनाशी मिळतेजुळते आहेआमच्या खात्यामध्ये आयोजित केले जाणारे सर्व उपक्रम व योजना सर्व वयोगटांना सहभागी करून घेतातय या पहिल्यावहिल्या उपक्रमात मुलांना सामावून घेण्यासाठी आम्ही अतिशय उत्सुक आहोत.”

 

प्रोजेक्ट मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संस्थापक शिशिर जोशी यांनी सांगितले, सार्वजनिक व खासगी सहभागाचे मॉडेल म्हणून प्रोजेक्ट मुंबईने नेहमीच समाजातील प्रत्येक श्रेणीसाठी व विशेषतः महत्त्वाच्या श्रेणींसाठी काम केले आहेया उपक्रमाच्या बाबतीत, बालके व युवक यांच्याबरोबर काम केले जाणार आहेत्यांचीही काही मते आहेत आणि ती ऐकली पाहिजेतएन्व्हॉयर्नमेंट 2.0 जेन नेक्स्टकडे जाणारा आयडियाज फॉर अॅक्शन हा उपक्रम म्हणजे स्वच्छ हवा, जमीन व पाणी असलेले उत्तम पर्यावरण साध्य करण्यासाठी या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहेया स्पर्धेसाठी भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.”

 

स्पर्धेविषयी –

·         स्पर्धेची मध्यवर्ती संकल्पना

विद्यार्थ्यांनी पुढीलपैकी कोणत्याही एका (स्वच्छ वायू, स्वच्छ जल किंवा स्वच्छ भूमीपर्यावरणीय आव्हानावर मात करण्यासाठी अमलात आणता येईल असा उपाय सुचवणे अपेक्षित आहे:

'आयडियाज इन अॅक्शनमूव्हिंग टुवर्ड्स विथ ए वर्ल्ड विथ क्लीन एअर क्लीन वॉटर क्लीन लँड.'

#मीforMaharashtra या विचारापासून प्रेरित.

प्रवेशिका मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या भाषांमध्ये पाठवाव्यातत्या टेक्स्ट/निबंध किंवा ऑडिओ/व्हीडिओ फाइल्स या स्वरूपात असाव्यात.

उगमाच्या ठिकाणी कचऱ्याचे विभादन, भराव, कचरा व्यवस्थापन, सांडपाण्यावर प्रक्रिया, रेनवॉटर हार्वेस्टिंग, नद्यांची स्वच्छता, मरिन लिटर, किनाऱ्याची स्वच्छता, वाहनांतून उत्सर्जन, कचरा जाळणे व आवाजाचे प्रदूषण या बाबतीत उपाय शोधणे ही काळाची गरज आहे

·         कोणाला सहभागी होता येईल: #मीforMaharashtra

'आयडियाज फॉर अॅक्शन' ही निबंध स्पर्धा उच्च माध्यमिक शाळांसाठी (वय 14 ते 17) आणि कनिष्ठ महाविद्यालयांसाठी (वय 17 ते 21) खुली आहे.

शाळा/महाविद्यालय/शैक्षणिक संस्था यांच्याद्वारे सादर करण्यात आलेल्या व प्रमाणित असलेल्या प्रवेशिकाच केवळ स्वीकारल्या जातील.

सहभागी होणाऱ्या प्रत्येक संस्थेने प्रत्येक श्रेणीसाठी जास्तीत जास्त दोन प्रवेशिका पाठवाव्यात: पृथ्वी, जल व वायू.

निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला व शाळेला जेन-नेक्स्ट चॅम्पिअन असे प्रमाणपत्र दिले जाईल.  

प्रवेशिका येथे ईमेल कराव्यात:

environment@projectmumbai.org

प्रक्रियेचा तपशील येथे पाहता येईल - www.projectmumbai.org

प्रवेशिकांसाठी अंतिम तारिख आहे डिसेंबर 20, 2020.

 

प्रोजेक्ट मुंबई:

प्रोजेक्ट मुंबई हे खासगी-लोक सहभागाचे नॉट-फॉर-प्रॉफिट मॉडेल आहे. कोविड 19 दरम्यान मानवतेचे कार्य केल्याबद्दल युनायटेड नेशन्स एसडीजी सॉलिडरी अॅक्शन अॅवॉर्ड 2020च्या विजेत्या असणारी (या सन्मानाने गौरवण्यात आलेल्या जगभरातील 50 पैकी एक)प्रोजेक्ट मुंबई मुंबईकरांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी आरोग्यसेवा, शिक्षण व सरकारशी संबंधित क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.

प्रोजेक्ट मुंबईचा पर्यावरणविषयक उपक्रम 'मुंबई प्लास्टिक रीसायक्लोथॉन(प्लास्टिकचे प्रमाण कमी करणे, प्लास्टिकला नकार देणे व प्लास्टिकचा पुनर्वापर करणे याद्वारे वर्तनात बदल करण्याला उत्तेजन देणेआणि जल्लोष (जलस्रोतांचे संरक्षण करणेयांचा उल्लेख लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स 2020 मध्ये करण्यात आला आहे.

 

पर्यावरण व हवामानातील बदल खाते:

तरुण व नव्या उमेदीचे नेते आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व असणाऱ्या, महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण व हवामानातील बदल या खात्याने महत्त्वाकांक्षी योजना आखली असून त्याद्वारे निसर्गाच्या पंचमहाभूतांचा वेध घेतला जाणार आहेभूमी, वायू, जल, अग्नी व आकाश.

 

भूमीच्या बाबतीमध्ये हे खाते वनीकरण, जंगलांचे संवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, जमिनीची धूप होण्यास प्रतिबंध, .वर लक्ष केंद्रित करणार आहे

 

वायूच्या बाबतीत, हे खाते हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि राज्यातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक उंचावण्यासाठी उद्योग व वाहतूक खाते, तसेच अन्य महत्त्वाच्या खात्यांशी सहकार्य करण्यावर भर देणार आहे

 

जलविषयक नियोजनामध्ये, नद्यांच्या पुनरुत्थानासाठी सध्या सुरू असलेले प्रयत्न, सागरी जैवविविधता, जलस्रोतांचे व किनाऱ्यांसारख्या किनारवर्ती ठिकाणांचे संरक्षण व स्वच्छता यांचा समावेश आहे.

 

अग्नीचा अर्थ उर्जेचे एक स्वरूप असा लावत, उर्जेचा कार्यक्षम वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी, अपव्यय कमी करण्यासाठी व नावीन्यपूर्ण पर्यायांद्वारे अपारंपरिक ऊर्जा निर्माण करण्यासाठी या खात्याने अन्य खात्यांबरोबर काम करायचे ठरवले आहे.

 

आकाश म्हणजे अवकाश व प्रकाश आणि त्याचा संदर्भ मानवाच्या स्वभावामध्ये बदल असा लावला आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24