सिनेपोलीस आणि नेक्सस मॉल यांच्या संयुक्त विद्यमाने सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉल येथे सिनेमाचा अनोखा अनुभव

 सिनेपोलीस आणि नेक्सस मॉल यांच्या संयुक्त विद्यमाने 

सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉल येथे सिनेमाचा अनोखा अनुभव  

~  28, 29 आणि 30 डिसेंबर रोजी रु. 1 मध्ये वंडर वूमन 1984 दाखवणार  ~

नेक्सस मॉल येथे सिनेपोलीस उपलब्ध असल्याने मॉलममध्ये ही विशेष ऑफर ~

 

नवी मुंबई, 25 डिसेंबर : सिनेपोलीस इंडिया आणि नेक्सस मॉल यांनी संयुक्तपणे एक अभिनव ऑफर उपलब्ध करून दिली असून ती चार नेक्सस मॉलच्या पोर्टफोलियोत  अनुभवता येईल. याठिकाणी भेट देणाऱ्यांकरिता डीसीची नवीन कलाकृती ‘वंडर वूमन 1984’ रु. 1 मध्ये पाहता येईल. सिनेचाहत्यांसाठी ही एक पर्वणीच ठरणार असून तिचा आनंद सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉल, नवी मुंबई; अहमदाबाद वन, अहमदाबाद; वेस्टएंड मॉल, औंध आणि मॉल ऑफ अमृतसर, पंजाब इथे घेता येईल. नेक्सस मॉल आणि सिनेपोलीस इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने रु 1 च्या विशेष किंमतीत तीन दिवसांकरिता वंडर वूमनचा सिक्वेल दाखवण्यात येणार आहे. सिनेपोलीसमध्ये दर दिवशी एका ऑडीटोरियममध्ये या खास किंमतीत सर्व शो दाखवले जातील. बुकमायशो तसेच पेटीएमवर CINEWW84 या कोडद्वारे  विशेष ऑफरचा  लाभ घेता येणार आहे.

जेव्हा एखादी व्यक्ती मॉलमध्ये जाण्याचा विचार करते, त्यावेळी अशा व्यक्तीला सर्वांगीण अनुभव देण्यात सिनेमाचा मोलाचा वाट असतो. 2020 ला अलविदा करण्याआधी सिनेमाला जाण्याच्या अनुभवाचे पुनरुज्जीवन व्हावे याकरिता सिनेपोलीस इंडिया आणि नेक्सस मॉल एकत्र आले आहे. टाळेबंदीनंतर अशा अनुभवाचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने एखादा सिनेमा ऑपरेटर आणि मॉल डेव्हलपर एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ म्हणावी लागेल.

या उपक्रमाविषयी बोलताना सिनेपोलीस इंडियाचे सीईओ देवांग संपत म्हणाले की, “संपूर्ण सिने क्षेत्र आणि प्रामुख्याने एक्झिबिशन इंडस्ट्रीच्या दृष्टीने 2020 हे वर्ष अतिशय आव्हानात्मक ठरले. तरीच आपण आता पुढे जाण्यासाठी सज्ज आहोत. नेक्सस मॉल्ससोबतची ही संधी अतिशय सुंदर ठरणार आहे. आमच्या ग्राहकांकरिता ही भागीदारी सकारात्मक आहे. डीसी आणि पॅटी जेनकिन्स यांनी अगोदरच निश्चित केल्याप्रमाणे वंडर वूमन 1984 चा अनुभव प्रेक्षकांना घेता येईल. शिवाय त्यांच्याकरिता उपलब्ध असलेली ऑफर पूर्वी कधीही, कोणालाही मिळालेली नाही. आमच्या ग्राहकांना सिनेमाचा जागतिक दर्जाचा अनुभव लाभावा म्हणून या ऑफरकरिता करण्यात आलेल्या भागीदारीचा आनंद वाटतो.

या अशापद्धतीच्या एकमेव भागीदारीविषयी बोलताना नेक्सस मॉल्सचे चीफ मार्केटींग ऑफिसर निशांक जोशी म्हणाले की, मागील नऊ महिने कमालीच्या अनिश्चिततेत गेले. मोठ्या कालावधीसाठी प्रत्येक जन घरातच अडकून राहिला. देशातील मॉल खुले करण्यासाठी एमएचएकडून परवानगी मिळाली असली तरीही सिनेमागृह खुली होण्याची प्रतीक्षा करावी लागली. पुन्हा एकदा ग्राहक वर्गाने आपल्या कुटुंबियांसमवेत सिनेमागृहांत परतावे याची खातरजमा आम्ही करत आहोत. सिनेपोलीस इंडिया समवेत भागीदारीचा आम्हाला आनंद आहे. हा उद्योग क्षेत्रात सुरू करण्यात आलेला अशाप्रकारचा पहिलाच प्रस्ताव आहे. मॉलमध्ये येणाऱ्यांना सुरक्षित आणि आरोग्यदायक अनुभव मिळावा आणि त्यांनी पसंतीच्या सिनेमाकरिता मॉलमध्ये पुनरागमन करावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमच्या सभोवताली असणारे नक्कीच या संधीचा लाभ घेतील आणि नऊ महिन्यातील डीसीच्या पहिल्या मोठ्या रिलीजचा आनंद लुटतील.

सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉलच्या परिसरात उद्योग क्षेत्रातील सुरक्षा आणि आरोग्याच्या सर्वोत्तम पद्धतींचे पालन केले जाते. मॉलमध्ये येणाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेत ब्यूरो वेरीताजसोबत हातमिळवणी करण्यात आली आहे. जेणेकरून उद्योग क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धतींचे पालन होईल. न्यू नॉर्मल वातावरणात स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार सुरक्षा आणि स्वच्छतेची सर्व अमलबजावणी करत आम्ही आमचे ग्राहक, विक्रेते आणि कर्मचारी यांचे मॉलच्या परिसरात स्वागत करणार आहोत.  

वंडर वूमन 1984 (WW84 म्हणून लोकप्रियही 2020 अमेरिकन सुपरहिरो फिल्म डीसी कॉमिक कॅरेक्टर वंडर वूमनवर आधारीत आहे. 2017 मध्ये आलेल्या वंडर वूमनचा हा सिक्वेल असून डीसी एक्सटेंडेड युनिव्हर्स (डीसीईयु) मधील नववी आवृत्ती आहे. पॅटी जेनकिन्स हिने जेफ जॉन्स आणि डेव्हिड कॉलाहम समवेत या सिनेमाचे लेखन केले असून तिचे दिग्दर्शन लाभले आहे. डायना प्रिन्स / वंडर वूमनची व्यक्तिरेखा गाल गडॉट हिने साकारली असून तिच्यासोबत ख्रिस पाईन, क्रिस्तेन विग, पेद्रो पास्कल, रॉबिन राईट आणि कॉनी नेल्सन यांची अदाकारी पाहता येईल. 1984 च्या शीतयुद्धाची पार्श्वभूमी कथानकाला असून डायना आणि तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर स्टीव्ह ट्रेव्हर मॅक्सवेल लॉर्ड आणि चिताहचे पितळ उघडे पाडताना दिसतील. 

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24