नवनीत फाउंडेशन तर्फे वेबिनार मालिका – ‘तयारी दहावीची’

नवनीत फाउंडेशन तर्फे वेबिनार मालिका – तयारी दहावीची

गेली ६ वर्षे नवनीत ही शैक्षणिक साहित्य व प्रकाशनांमधील अग्रगण्य संस्था आहे. अभ्यासक्रम, मूल्यमापन पद्धती यांमध्ये वेळोवेळी होणारे बदल यांविषयी ठोस मार्गदर्शन करणारी विश्वासार्ह प्रकाशने, असे विद्यार्थी व पालक यांच्या मनात खास स्थान नवनीतने निर्माण केले आहे. व्यावसायिक सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून स्थापन झालेल्या नवनीत फाउंडेशनने शिक्षण, आरोग्य, आपत्ती निवारण इत्यादी क्षेत्रांत भरीव योगदान दिले आहे. सन २०१६ पासून फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ‍शिक्षकांसाठी प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आल्या. हजारो शिक्षकांना या उपक्रमाचा लाभ झाला. सध्याच्या परिस्थितीत वेबिनार्सच्या माध्यमातून शिक्षकांशी संवाद सुरू आहे.

कोविड-19 मुळे चालू शैक्षणिक वर्षात बहुसंख्य विद्यार्थी समाधानकारक व गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहिले आहेतशाळा सुरू झाल्यानंतर मिळणाऱ्या कमी कालावधीमध्ये विद्यार्थ्यांची दहावी बोर्डाच्या अंतिम परीक्षेसाठी योग्य प्रकारे तयारी करून घेणे हे शिक्षकांपुढील आव्हान आहेनवनीत फाउंडेशनच्या वतीने इयत्ता दहावी परीक्षेसाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांची तयारी अधिक चांगल्या प्रकारे करून घ्यावीयासाठी ‘तयारी दहावीची’ ही मार्गदर्शनपर वेबिनार मालिका नुकतीच आयोजित करण्यात आली. ही वेबिनार मालिका विनामूल्य होती. सहा दिवस चाललेल्या या विषयवार वेबिनार मालिकेचा महाराष्ट्रातील सुमारे पंच्याहत्तर हजार शिक्षकांनी लाभ घेतला. आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. अजूनही युट्युब तसेच फेसबुकच्या माध्यमातून शिक्षक या प्रशिक्षण मालिकेचा लाभ घेत आहेत.  


Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth