मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडची खुली भागविक्री 7 एप्रिल 2021 रोजी सुरू होईल आणि 9 एप्रिल 2021 रोजी बंद होईल

 

मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडची खुली भागविक्री 7 एप्रिल 2021 रोजी सुरू होईल आणि 9 एप्रिल 2021 रोजी बंद होईल

 

·         दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. 10 (इक्विटी शेअर) असलेल्या प्रत्येक इक्विटी शेअरची किंमत ₹483 - ₹486 दरम्यान असेल

·         बिड/ऑफर सुरू होण्याची तारीख - बुधवार, 7 एप्रिल 2021 आणि बिड/ऑफर समाप्त होण्याची तारीख - शुक्रवार, 9 एप्रिल 2021

·         किमान बोली (मिनिमम बिड लॉट) 30 इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर 30 इक्विटी शेअर्सच्या पटीत

·         फ्लोअर किंमत ही इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 48.3 पट आहे आणि कॅप किंमत इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 48.6 पट आहे.

 



 

गुंतवणूकदारांसाठी असलेली जोखीम : तीन ग्लोबल को-ऑर्डिनेटर्स रनिंग लीड मॅनेजर्स आणि या इश्युशी संलग्न असलेले सात बुक रनिंग लीड मॅनेजर्स यांनी गेल्या 3 वर्षांत 53 पब्लिक इश्यु हाताळले आहेत, त्यांच्यापैकी 18 इश्यु लिस्टिंग तारखेच्या दिवशी इश्यु किमतीच्या खाली बंद झाले. प्राइस बँडच्या वरच्या टोकाला आर्थिक वर्ष 2020 साठी डायल्युट केलेल्या ईपीएसवर प्राइस/अर्निंग रेश्यो 26.33 आहे. 2020, 2019 आणि 2018 या आर्थिक वर्षांसाठी नेट वर्थवरील अधिभारीत सरासरी मोबदला (वेटेड अॅव्हरेज रिटर्न) 41.8% आहे. आमचे प्रवर्तक श्री. राजेंद्र नरपटमल लोढा, संभवनाथ इन्फ्राबिल्ड आणि संभवनाथ ट्रस्ट यांच्या इक्विटी शेअर्सच्या संपादनाची सरासरी किंमत अनुक्रमे रु.760 कोटी, रु. 24.17 कोटी आणि शून्य आहे आणि प्राइस बँडच्या वरच्या टोकाची इश्यु किंमत प्रति इक्विटी शेअर रु.486 इतकी आहे.

 

मुंबई, 1 एप्रिल 2021 : मायक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड (पूर्वीचे लोढा डेव्हलपर्स लिमिटेड) हे मुंबई स्थित रिअल इस्टेट विकासक असून बुधवार, 7 एप्रिल 2021 रोजी त्यांच्या इक्विटी शेअर्सच्या (आरंभिक ऑफर” / “आयपीओ”)  इनिशिअल पब्लिक ऑफरशी संबंधित बोली / ऑफर कालावधी सुरू करतील आणि शुक्रवार, 9 एप्रिल 2021 रोजी बंद करतील.

या ऑफरसाठीचा प्राइस बँड प्रति इक्विटी शेअर रु.483-रु.486 असा ठरविण्यात आला आहे. कंपनी ग्लोबल को-ऑर्डिनेटर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्स आणि बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या (मॅनेजर्स”) सल्ल्याने अँकर इन्व्हेस्टर्सच्या सहभागाविषयी विचार करू शकतात, जे बिड/ऑफर दिवसाच्या एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी 6 एप्रिल 2021 रोजी  असेल.

आयपीओ हा Rs.10 दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्युअन्स आहे आणि याचे एकूण मूल्य रु. 2500 कोटीपर्यंत आहे. फ्रेश इश्युमध्ये पात्र कर्मचाऱ्यांसाठी (कर्मचारी आरक्षण पोर्शन) रु.30 कोटीपर्यंतच्या शेअर्सचे आरक्षण आहे आणि निव्वळ इश्यु (म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित असलेला इश्यु वजा करून) खालीलप्रमाणे असेल : क्वालिफाइड इन्स्टिट्युशनल बायर्स (क्यूआयबी) 50% हून जास्त असणार नाही, नॉन-इन्स्टिट्युशनल बिडर्स 15%हून अधिक असणार नाहीत आणि किरकोळ स्वतंत्र बिडर्स 35%पेक्षा अधिक असणार नाहीत. तपशीलासाठी कंपनीने 31 मार्च 2020 रोजी आयपीओशी संबंधित फाइल केलेले रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (आरएचपी) पाहावे.

या फ्रेश इश्यूमधून संकलित होणारी रक्कम कंपनीच्या रु.1500 कोटीपर्यंतच्या एकूण थकित कर्जाची कपात करणे, रु.375 कोटीपर्यंत जमीन संपादन किंवा जमीन विकास हक्क संपादित करणे आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरण्यात येईल.

आर्थिक वर्ष 2014 ते 2020 या आर्थिक वर्षांसाठी निवासी विक्रीमूल्यानुसार कंपनी भारतातील सर्वात मोठ्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक आहे. (स्रोत : अॅनारॉक अहवाल) 31 डिसेंबर 2020 पर्यंत कंपनीने एकूण 91 प्रकल्पांतर्गत सुमारे 77.2 दशलक्ष चौरस फुटांचे विकसित करण्यासारखे क्षेत्रफळ पूर्ण केले आहे. या कंपनीचे सध्या 54 सुरू असलेले आणि नियोजित प्रकल्प आहेत या प्रकल्पांमध्ये एकूण सुमारे 73.9  दशलक्ष विकास करण्याजोगे क्षेत्रफळ आहे. परवडण्याजोग्या आणि मध्यम उत्पन्न गृहनिर्माणावर लक्ष केंद्रीत करून निवासी रिअल इस्टेट विकासाचा प्रमुख व्यवसाय हे त्यांचे बलस्थान आहे. 2019 साली मॅक्रोटेक डेव्हलपर्सनी लॉजिस्टिक आणि इंडस्ट्रिअल पार्क्समध्ये पदार्पण केले आणि ईएसआर मुंबई 3 पीटीई लिमिटेड (ईएसआर) यांच्यासोबत जॉइंट व्हेंचर केले. ही कंपनी ईएसआर केमॅन लिमिटेडची उपकंपनी असून तो एक आशिया पॅसिफिकवर केंद्रीत लॉजिस्टिक्स रिअल इस्टेट प्लॅटफॉर्म आहे (स्रोत : अॅनारॉक अहवाल)

या इश्युसाठी अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, जे. पी मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड हे ग्लोबल को-ऑर्डिनेटर्स आणि बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. या इश्युसाठी आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, एडलवाइस फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड, आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड, जेएम फायनान्शिअल्स लिमिटेड, येस सिक्युरिटीज लिमिटेड (इंडिया) लिमिटेड, एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड आणि बीओबी कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy