स्वच्छता व सुरक्षितता यांबाबत ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत, 99.9 टक्क्यांहून अधिक विषाणूनाशक, आरोग्याच्या हमीसह ‘गोदरेज एअर कंडिशनर्स’चे ‘हेवी-ड्यूटी कूलिंग’

 

स्वच्छता व सुरक्षितता यांबाबत ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत,
99.9 टक्क्यांहून अधिक विषाणूनाशक, आरोग्याच्या हमीसह
गोदरेज एअर कंडिशनर्सचे हेवी-ड्यूटी कूलिंग

 

गोदरेज अप्लायन्सेसतर्फे आत्मनिर्भरतेच्या धोरणानुसार इन-हाऊस बॅकवर्ड इंटिग्रेटेड एसीच्या कारखान्याचा धोरणात्मक विस्तार

 



·         गोदरेज अप्लायन्सेसतर्फे 100 टक्के भारतीय बनावटीचे एसी सादर. या विभागात 30 हून अधिक मॉडेल्स उपलब्ध. एअर कंडिशनर्सच्या या सर्वात नवीन श्रेणीमध्ये पर्यावरणास अनुकूल अशा आर290आर32 या रेफ्रिजरंट्सचाच केवळ वापर. या मॉडेल्समध्ये जागतिक तपमानवाढीची क्षमता अत्यंत कमी राखण्यात यश.

·         जगातील सर्वात हरित अशा आर290 रेफ्रिजरंटचा वापर करणारी गोदरेज अप्लायन्सेस हा भारतातील एकमेव एसी उत्पादक ब्रॅंड. या रेफ्रिजरंटमध्ये जागतिक तापमानवाढीची क्षमता अत्यंत कमी असून ओझोन घटविण्याची क्षमता शून्य आहे.

·         या ब्रॅंडतर्फे शिरवळ व मोहाली या दोन्ही कारखान्यांमध्ये 2025 पर्यंत 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. यातून त्यांची एसीची उत्पादन क्षमता 8 लाख युनिट्सपर्यंत वाढविता येईल.

·         पुढील 3 वर्षांत एसी विभागात बाजारपेठेतील 10 टक्के हिस्सा मिळविण्याचे या ब्रँडचे ध्येय.

मुंबई, 15 एप्रिल 2021 : 'सोच के बनाया है' हे ब्रँड तत्वज्ञान व पर्यावरणरक्षण हे ब्रॅंड मूल्य असलेल्या गोदरेज अप्लायन्सेसने 100 टक्के भारतीय बनावटीचे (मेड इन इंडिया), पर्यावरणास अनुकूल असलेले, आरोग्याची हमी देणारे एअर कंडिशनर सादर केले आहेत. गोदरेज अप्लायन्सेस हा गोदरेज समुहातील प्रमुख कंपनी गोदरेज अ‍ॅन्ड बॉयस हिचा एक व्यवसाय आहे, तसेच गृहोपयोगी उपकरण उद्योगातील तो एक महत्त्वाचा व आघाडीचा ब्रॅंडही आहे. या नवीन एअर कंडिशनर्समध्ये विशेष प्रकारचे नॅनो-कोटेड अॅंटी-व्हायरल फिल्ट्रेशन तंत्रज्ञान आहे. नॅनो-कोटेड फिल्टर सरफेसच्या संपर्कात येणाऱ्या विषाणू व जीवाणू कणांपैकी 99.9 टक्के कण नष्ट होतात आणि घरात स्वच्छता पाळली जाऊन ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण होते. मेक इन इंडिया या धोरणाला अनुसरून या ब्रॅंडने आपल्या शिरवळच्या कारखान्यात एसी उत्पादनासाठी नव्या सुविधा निर्माण केल्या आहेत. एसींच्या 30 मॉडेल्सच्या संपूर्ण नव्या श्रेणीमध्ये पर्यावरणास अत्यंत अनुकूल असणारी आर290आर32 ही रेफ्रिजरंट्सच केवळ वापरण्यात आली आहेत. त्यामुळे जागतिक तपमानवाढीची त्यांची क्षमता (ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शिअल – जीडब्ल्यूपी) अगदी किमान पातळीवर आलेली आहे.

कोविडच्या साथीच्या काळात विविध वस्तूंच्या खरेदीबाबत ग्राहकांच्या मानसिकतेवर मोठाच परिणाम झालेला आहे. ग्राहक आता घरातच अधिक वेळ घालवत असल्यामुळे त्यांना घरबसल्या उत्तम आरोग्य, चांगली स्वच्छता व आराम या गोष्टी हव्या असतात. शाश्वत व पर्यावरणास अनुकूल अशा गोष्टींची खरेदी करण्याकडे लोकांचा कल झुकू लागला आहे. खास भारतीय बनावटीच्या वस्तूच घ्यायला हव्यात, ही जाणीवही त्यांच्यात निर्माण होऊ लागली आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनातूनही, कोरोना साथीच्या निमित्ताने पुरवठा साखळी जोडण्याचे व स्वयंपूर्ण असण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. स्वदेशात उत्पादन करणे, कुशल कामगारांचा एक मोठा समुदाय विकसीत करणे आणि सुट्या भागांच्या उत्पादनाची देशात परिसंस्था निर्माण करणे या सर्व बाबी सरकारच्या आत्मनिर्भर धोरणाला अनुसरूनच आहेत.

वस्तूंचे थेट उत्पादन हे गोदरेज अप्लायन्सचे एक अंगभूत सामर्थ्य आहे. बॅकवर्ड इंटिग्रेशनच्या माध्यमातून या ब्रॅंडने गेली अनेक वर्षे स्वदेशी उत्पादनाच्या क्षमता विकसीत करण्याच्या दृष्टीने काम केलेले आहे. आपली उत्पादने आपण स्वतःच स्थानिक पातळीवर बनविण्याचे धोरण त्यामागे आहे. गेल्या 7 वर्षांत या ब्रॅंडने उत्पादन क्षमता, संशोधन व विकास आणि तंत्रज्ञानाचा विस्तार या कामी 1100 कोटी रुपये गुंतवले आहेत. मेक इन इंडिया या धोरणाला आपला पाठिंबा असल्याचे यातून या ब्रॅंडने प्रतीत केले आहे. महाराष्ट्रातील शिरवळ येथे या ब्रॅंडतर्फे उभारण्यात आलेल्या नव्या एअर कंडिशनर कारखान्याचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी गोदरेज अॅंड बॉयसच्या कार्यकारी संचालिका नायरिका होळकर व गोदरेज अप्लायन्सेसचे कार्यकारी उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख कमल नंदी हे उपस्थित होते.

शिरवळ येथील एसीचा हा नवीन प्रकल्प सुमारे दीड लाख चौरस फूट जागेवर पसरलेला आहे. यामध्ये यंत्रसामग्री, साधनांच्या मूलभूत सुविधा आणि एअर कंडिशनर श्रेणीतील एसी हीट एक्सचेंजर कॉईल व इनडोअर या युनिट्ससाठी 50 कोटींची गुंतवणूक झाली आहे. यातून शिरवळमध्ये 2021 मध्ये 4 लाख इतक्या संख्येने एसींचे उत्पादन करण्याची क्षमता उभी राहणार आहे. आणखी 4 लाख युनिट इतकी एसी उत्पादनाची क्षमता 2025 पर्यंत मोहाली येथे उभी केली जाणार आहे. त्याकरीता अतिरिक्त गुंतवणूक करावी लागणार असून ही एकूण गुंतवणूक 100 कोटी रुपयांची असणार आहे. बॅकवर्ड इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग युनिटमुळे या ब्रॅंडला विविध वैशिष्ट्ये व सौंदर्यशास्त्र यांच्या बाबतीत अधिक सामर्थ्य व लवचिकता मिळणार आहे. ग्राहकांच्या गरजा बदलत असताना त्यांस जलद प्रतिसाद देण्यास त्यामुळे ब्रॅंड सक्षम होईल.

नव्या असेम्ब्ली लाईनबद्दल बोलताना गोदरेज अप्लायन्सेसचे कार्यकारी उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख कमल नंदी म्हणाले, आमच्या उत्पादन क्षमतांबद्दल आम्हाला अभिमान आहे. शिरवळ व मोहाली या दोन्ही ठिकाणी असलेल्या आमच्या कारखान्यांना शाश्वत व हरित उत्पादन सुविधांसाठी सीआयआयचे ग्रीनको प्लॅटिनम प्लस हे मानांकन मिळणार असून, ते मिळवणारे भारतातील ते पहिले कारखाने ठरणार आहेत. बॅकवर्ड इंटिग्रेशन्सच्या माध्यमातून आम्ही आमच्या स्वदेशी उत्पादन क्षमता वाढवीत आहोत आणि त्यातून आमच्या बहुसंख्य उत्पादनांच्या श्रेणी स्वतःच बनविण्याकडे वाटचाल करीत आहोत. एअर कंडिशनर उत्पादनासाठी नवीन प्रकल्प उभारणी करीत व त्याचवेळी पर्यावरणाची काळजी घेत, स्वयंपूर्ण भारत निर्माण करण्याचे आमच्या संस्थापकांचे धोरण राबविण्याकडे आम्ही एक मोठे पाऊल टाकले आहे. शिरवळ व मोहाली येथे 2025 पर्यंत इको-फ्रेंडली एसींचे उत्पादन 100 टक्के इन-हाऊस पद्धतीने करण्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद आम्ही केली आहे व त्यांतून 8 लाख युनिट इतके उत्पादन घेतले जाणार आहे. अॅंटी-व्हायरल नॅनो-कोटेड फिल्ट्रेशन तंत्रज्ञानाच्या आधारे 99.9 टक्क्यांहून अधिक प्रमाणात विषाणूंचा नाश करून, नवीन एसी हेवी-ड्यूटी कूलिंग देऊ शकतील आणि त्यामुळे घरांमध्ये स्वच्छता काटेकोरपणे राखली जाईल.

नॅनो-कोटेड अॅंटी-व्हायरल फिल्टरमध्ये विशेष प्रकारची रासायनिक कोटिंग असतात. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणाऱ्या विषाणू व जीवाणूंचा 99.9 टक्क्यांहून अधिक प्रमाणात नाश होतो. नियमित देखभाल करताना 50 वेळा वॉश केल्यानंतरही या फिल्टरची कार्यक्षमता टिकून राहते. त्यामुळे एअर कंडिशनरच्या संपूर्ण आयुष्यात हा फिल्टर आपले संरक्षण करण्यास सक्षम आहे, याची खात्री निर्माण होते.

गोदरेज एअर कंडिशनर्समध्ये ग्राहकांच्या लाभांसाठी पुढील वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत –

1. हेवी-ट्यूटी चिरंतन गारवा

a)      दुहेरी रोटरी कॉम्प्रेसर्समुळे जास्त गारवा.

b)      दीर्घकालीन विश्वासार्हता व टिकाऊपणासाठी 100 टक्के कॉपर कंडेन्सर व कनेक्टिंग पाईप्स.

c)      अधिक वजनासह हेवी-ड्यूटी आऊटडोअर युनिट्स, त्यातून चांगली बांधणी व गुणवत्ता निदर्शनास.

d)      इव्हॅपोरेटरकंडेन्सरमध्ये गंजप्रतिरोधक ब्ल्यू फिन तंत्रज्ञान.

2. आरोग्य, स्वच्छता व आराम

a)      अॅंटी-व्हायरल नॅनो-कोटेड फिल्टर तंत्रज्ञानामुळे विषाणू व जीवाणूंचा 99.9 टक्क्यांहून अधिक प्रमाणात नाश.

b)      सेल्फ-क्लीनिंग तंत्रज्ञानामुळे एअर कंडिशनरमध्ये जीवाणूंची वाढ व गंज यांना प्रतिरोध.

c)      बाहेरील युनिटवरील आवाजप्रतिबंधक आवरण व आयडीयूला बसविण्यात आलेली बीएलडीसी मोटर यांमुळे शांत, ध्वनिविरहीत कार्यचालन.

d)      रात्रीच्यावेळी जास्त आराम मिळण्यासाठी स्लीप मोड.

3. पर्यावरण-अनुकूल व ऊर्जा कार्यक्षम

a)      संपूर्ण श्रेणीमध्ये सर्वाधिक हरित वैशिष्ट्य असलेल्या आर290आर32 या रेफ्रिजरंट्सचा वापर.

b)      जगातील सर्वाधिक हरित अशा आर290 रेफ्रिजरंटचा उपयोग करून ओझोन घटविण्याची क्षमता शून्य असणारा व जागतिक तपमानवाढीची क्षमता अगदी नगण्य असणारा हा एकमेव ब्रॅंड आहे.

c)      अति कार्यक्षम पंच-तारांकित उर्जा मानांकनासह उपलब्ध.

या एसींवर 10 वर्षांची इनव्हर्टर कॉम्प्रेसर वॉरंटी देण्यात आली आहे, त्यामुळे ग्राहकांना मानसिक शांती लाभते. हंगामामध्ये आपली विक्री वाढविण्याकरीता, प्रमुख शहरांमध्ये खरेदीच्या दिवशीच एसी बसवून देण्याची सुविधा, बसविण्याच्या खर्चात सूट, तसेच विस्तारीत वॉरंटीच्या लाभांसह संपूर्ण श्रेणीवर आकर्षक वित्तपुरवठा योजना यांसारख्या मर्यादीत मुदतीच्या ऑफर गोदरेजने देऊ केल्या आहेत.

गोदरेज अप्लायन्सेसचे एअर कंडिशनर विभागाचे प्रॉडक्ट ग्रुप हेड संतोष सलिआन म्हणाले, “दरवर्षी उन्हाळा अधिक क़डक होत चालला आहे. यंदा तर एप्रिलमध्येच तपमान वाढू लागले आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्यात एसी उद्योगाला फार मोठा फटका बसला होता. या वर्षी मात्र व्यवसायाबाबत आम्ही उत्सुक आहोत आणि उन्हाळ्याच्या हंगामात एसीला चांगली मागणी असेल, अशी अपेक्षा बाळगून आहोत. आता सर्वत्र कामकाज सुरू झालेले आहे, तसेच घरातून का होईना शिक्षण सुरळीत सुरू आहे. या परिस्थितीचा काही अंशी फायदा आमच्या उद्योगाला होणार आहे. लिव्हिंग रूम एसी अशी ओळख असलेल्या 2 टन क्षमतेच्या स्प्लिट एसीची श्रेणी आम्ही सादर करीत आहोत. गोदरेज एअर कंडिशनर्स हे हेवी ड्यूटी, ऊर्जा कार्यक्षम व पर्यावरणास अनुकूल शीतलता देणारे म्हणून ओळखले जातात. ही सर्व वैशिष्ट्ये आम्ही कायम ठेवली आहेतच, त्याचवेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढती स्वच्छता व चांगले आरोग्य या लोकांच्या प्रमुख गरजा बनल्या असल्याने, आम्ही विषाणू व जीवाणूंचा 99.9 टक्क्यांहून अधिक प्रमाणात नाश करणारे नवीन एसी बाजारात आणले आहेत. या इको-फ्रेंडली उत्पादनांची विस्तृत श्रृंखला विक्रीच्या सर्व माध्यमांमध्ये व अग्रगण्य दुकानांमध्ये उपलब्ध असेल. या 100 टक्के मेड इन इंडिया आणि सर्वाधिक हरीत अशा एसीच्या श्रेणीमुळे पुढील 3 वर्षांत आमचा बाजारपेठेतील हिस्सा 10 टक्क्यांपर्यंत वाढवून आपली स्थिती मजबूत करता येईल, असा आमचा विश्वास आहे.

उपकरणांच्या क्षेत्रात, विशेषतः एसींमध्ये, सर्व्हिस या बाबीला अतिशय महत्त्व असते. गोदरेज अप्लायन्सेसचा सर्व्हिस ब्रॅंड असलेल्या गोदरेज स्मार्टकेअरला मोठ्या ग्राहक संशोधनाच्या माध्यमातून सलग दोन वर्षे प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे. गोदरेज स्मार्टकेअरमध्ये 680 सेवा केंद्रे, 4500हून अधिक स्मार्टबडी तंत्रज्ञ यांचे विस्तृत नेटवर्क आहे. त्यांच्याशी अॅपच्या माध्यमातून ग्राहक संपर्क साधू शकतात. तसेच 14 भाषांमध्ये 24x7 चालणाऱे कॉल सेंटर, व्हॉट्सअप सेवा पर्याय आणि सहजपणे पोहोचू शकणाऱ्या व जलद सेवा देणाऱ्या 185 स्मार्ट मोबाईल व्हॅन यांतूनही ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यात येते.

इको-फ्रेंडली आणि आरोग्यदायी गोदरेज एसीची नवीन श्रेणी ही इन्व्हर्टर व फिक्स्ड स्पीड तंत्रज्ञान या दोन्ही प्रकारांत, 5-स्टार व 3-स्टार ऊर्जा रेटिंगमध्ये स्प्लिट एसीच्या स्वरुपात उपलब्ध आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24