पेटीएम मनीकडून पुण्‍यामध्‍ये नवीन टेक्‍नोलॉजी डेव्‍हलपमेंट सेंटरचे उद्घाटन; टीममध्‍ये २५० अभियंते व डेटा वैज्ञानिकांची भर करण्‍याचा मनसुबा


 


पेटीएम मनीकडून पुण्‍यामध्‍ये नवीन टेक्‍नोलॉजी डेव्‍हलपमेंट सेंटरचे उद्घाटन; टीममध्‍ये २५० अभियंते व डेटा

 वैज्ञानिकांची भर करण्‍याचा मनसुबा  


 

  • पुणे आरॲण्‍डडी सुविधा संपत्ती व्‍यवस्‍थापनामधील नवोन्‍मेष्‍कारी तंत्रज्ञानासाठी प्रमुख केंद्र बनणार  
  • २५० हून अधिक फ्रण्‍ट-एण्‍ड, बॅक-एण्‍ड अभियंते व डेटा वैज्ञानिकांची नियुक्‍त करण्‍याची योजना  
  • शहर प्रतिभावान कर्मचारीवर्ग, वैविध्‍यपूर्ण स्‍टार्ट-अप संस्‍कृती, प्रबळ पायाभूत सुविधा आणि अव्‍वल अभियांत्रिकी शाळांमुळे कंपनीसाठी महत्त्वाचे केंद्र 

भारताचे स्‍वदेशी डिजिटल फायनान्शियल सर्विसेस व्‍यासपीठ पेटीएमने आज घोषणा केली की, त्‍यांची पूर्णत: मालकीच्‍या उपकंपनी 'पेटीएम मनी'ने पुण्‍यामध्‍ये त्‍यांचे टेक्‍नोलॉजी डेव्‍हलपमेंट ॲण्‍ड इनोव्‍हेशन सेंटरचे उद्घाटन केले आहे. कंपनीची नवीन मालमत्ता उत्‍पादने व सेवा उभारणीसाठी २५० हून अधिक फ्रण्‍ट-एण्‍ड, बॅक-एण्‍ड अभियंते व डेटा वैज्ञानिक नियुक्‍त करण्‍याची देखील योजना आहे. पेटीएम मनीच्‍या यशाचे श्रेय एकसंधी, त्रासमुक्‍त तंत्रज्ञान, स्‍टॉक्‍स व एफएनओ ट्रेड्सचे कमी खर्चिक किंवा विना खर्चिक वितरण, तसेच दर्जात्‍मक ब्रोकर्ससाठी उद्योगक्षेत्रामध्‍ये कमी कमिशन या गोष्‍टींसाठी जाऊ शकते. 

पेटीएम मनी रिटेल गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूका व संपत्ती निर्माण सुलभ करण्‍याचा प्रयत्‍न करते. पुणे येथील नवीन केंद्र विशेषत: इक्विटी, म्‍युच्‍युअल फंड्स व डिजिटल गोल्‍डसाठी नवोन्‍मेष्‍कारी उत्‍पादनाला चालना देण्‍यावर फोकस करेल. कंपनीचा नवीन कर्मचारीवर्ग नियुक्‍त करण्‍यावरील विस्‍तारित फोकस प्रबळ कार्यसंचालन क्षमता, चपळ तंत्रज्ञान पायाभूत सुविधा आणि विविध क्षेत्रातील तज्ञांची टीम या आधारावर उच्‍च दर्जाचा युजर अनुभव देण्‍याच्‍या त्‍यांच्‍या कटिबद्धतेमधून दिसून येतो.  

पेटीएम मनीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी वरूण श्रीधर म्‍हणाले, ''आम्‍ही आमचे पुणे टेक आरॲण्‍डडी सेंटर लाच करण्‍यास आणि पुण्‍यामध्‍ये नवीन संपत्ती व्‍यवस्‍थापन उत्‍पादने व सेवा विकसित करण्‍यास उत्‍सुक आहोत. आम्‍ही तंत्रज्ञानाचा लाभ घेत आमच्‍या ग्राहकांसाठी खर्च कमी करण्‍याचा आणि प्रबळ, नाविन्‍यपूर्ण व स्थिर व्‍यासपीठ देण्‍याचा आमचा दृष्टिकोन कायम ठेवला आहे. आमच्‍या महत्त्वाकांक्षांची पूर्तता करण्‍याच्‍या खात्रीसाठी आम्‍हाला सक्षम अभियांत्रिकी प्रतिभांची गरज आहे. पुणे शहर दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे आणि शहरामध्‍ये उत्तम पायाभूत सुविधा व उत्तम वातावरणासह प्रतिभाशाली कर्मचारीवर्ग आहे. आमचा विश्‍वास आहे की, पुणे फिनटेकसाठी इनोव्‍हेशन हब बनण्‍याच्‍या स्थितीवर आहे. म्‍हणूनच, पेटीएम मनीच्‍या विस्‍तारीकरण योजनांसाठी या शहराची स्‍वाभाविकत: निवड करण्‍यात आली.''  

कंपनीने अनुभवी गुंतवणूकदार, तसेच गुंतवणूक क्षेत्रामध्‍ये नवीन असलेल्‍या युजर्सना सक्षम करण्‍याचा मनसुबा असलेली अनेक नवीन उत्‍पादने व सेवा सादर केल्या आहेत. कंपनीचा आर्थिक वर्ष २०२१ मध्‍ये १० दशलक्षहून अधिक युजर्स आणि ७५ दशलक्ष वार्षिक व्‍यवहार संपादित करण्‍याचा मनसुबा आहे, जेथे बहुतांश युजर्स लहान शहरे व नगरांमधून असतील. हे डिजिटल गोल्‍डसाठी सर्वात मोठे व्‍यासपीठ बनले आहे आणि ६००० किग्रॅ गोल्‍डचा टप्‍पा पार करण्‍यास सज्‍ज आहे. त्‍यांनी नुकतेच सादर केलेली उत्‍पादने जसे- इक्विटी ब्रोकिंग, आयपीओ, ईटीएफ आणि एफएनओ प्रबळ पोर्टफोलिओ निर्माण करण्‍यासाठी नवीन गुंतवणूक करणा-या युजर्सना प्रोत्‍साहित करत आहेत. देशातील संपत्ती उत्‍पादनांबाबत जागरूकता निर्माण करण्‍यासाठी त्‍यांची दशलक्षहून अधिक युजर्सना माहितीपूर्ण उपक्रमांच्‍या माध्‍यमातून विभिन्‍न सेवांबाबत माहिती देण्‍याची योजना आहे. 

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24