सेन्सेक्स, निफ्टी मंदीतून सावरले

 


सेन्सेक्स, निफ्टी मंदीतून सावरले

मुबई, १५ एप्रिल २०२१: सेन्सेक्स आणि निफ्टी आज बिअर स्थितीतून बचावले आणि अखेरीस हिरव्या रंगात स्थिरावले. सकाळी उच्चांकी स्थितीत सुरु झालेले ट्रेडिंग सत्र खूप अस्थिर राहून आज बहुतांश वेळ लाल रंगात दिसून आलेल. दरम्यान, आजच्या सत्रात मेटल, बँकिंग आणि फार्मास्युटिकल स्टॉक्समध्ये प्रामुख्याने गती दिसून आली तर आयटी सेगमेंटमध्येही सुधारणा दिसली. सेन्सेक्सने २५९.६२ अंकांची वृद्धी घेतली व तो ४८,८०३.६९ अंकांवर स्थिरावला. तर निफ्टी ७६.६५ अंकांनी वधारला व तो १४,५८१.४५ अंकांवर स्थिरावला.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात सेन्सेक्समध्ये नफ्याचे नेतृत्व टीसीएस (३.६७%) ने केले. त्यानंतर ओएनजीसी (2.८९%) होते. तर आयसीआयसीआय बँक (२.६९%) आणि एचडीएफसी बँक (२.१३%) यांनीही नफा कमावला. ३०-स्टॉक बॉरोमीटर खाली आले ते इन्फोसिस (२.६५%), इंडसइंड बँक( २.५४%) आणि मारुती सुझुकी (२.४४%) या स्टॉकमुळे.  आज एकूण १८ स्टॉकनी नफा कमावला तर १२ स्टॉक घसरले. तर दुसरीकडे निफ्टीतील नफ्याचे नेतृत्व टीसीएस (३.७%), सिपला (३.२८%) आणि ओएनजीसी (२.९९%) या स्टॉकनी केले. तर घसरणीच्या दिशेने, आयशर मोटर्स (३.२६%), ग्रासीम इंडस्ट्रीज (३.०९%) आणि इन्फोसिस (२.४२%) यांनी कामगिरी केली. हे स्टॉक लाल रंगात स्थिरावले. ५० स्टॉकच्या इंडेक्समध्ये २८ स्टॉक्सनी नफा कमावला तर २२ स्टॉक घसरले.

इन्फोसिस: चौथ्या तिमाहीत निव्वळ नफा ५,०७६ कोटी रुपये नोंदवला आणि कंपनीकडून बायबॅकची घोषणा झाल्यानंतरही इन्फोसिसच्या स्टॉकची किंमत घसरली व त्याच्या सर्वोच्च पातळीवरील खाली आली. एनएसईमध्ये, हा स्टॉक ३३.८५ अंकांनी घसरला व १,३६३.३० रुपयांवर स्थिरावला. कंपनीने काल प्रति शेअर १,७५० रुपये याप्रमाणे ९,२०० रुपये बायबॅकची घोषणा केली. वित्तवर्ष २०२२ मध्ये उत्पन्न १२ व १४ % दरम्यान राहील, अशी कंपनीला अपेक्षा आहे.

व्हीआयपी इंडस्ट्रीज: सुरुवातीच्या व्यापारी सत्रात, व्हीआयपी इंडस्ट्रीजने ६ टक्क्यांपर्यंत घसरण घेतली. कारण दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी वित्तवर्ष २०२१ मधील तिमाहीत मार्चमध्ये शेअर गुंतवणूक कमी केली. कंपनीतील शेअर्सचा वाटा मार्चच्या सुरुवातीपासूनच २०% पर्यंत घसरला. दरम्यान, अखेरच्या तासात ननुकसान कमी झाले. कारण शेअरचे मूल्य अखेरच्या तासांत सुधारले आणि मागील क्लोझिंगच्या तुलनेत ०.४८ नी कमी अंकांवरस्तिराव ले. राकेश झुनझुनवालांनी सध्या कंपनीत ०.७०% शेअर घेतलेले असून त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी १.६२% शेअर घेतले आहेत. डिसेंबर २०२० मध्ये ते ५.३१% तर मार्च २०२० मध्ये २.३२% होते.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज: फिनोलेक्स इंडस्ट्रीजने ५२ आठवड्यांतील उच्चांकी पातळी गाठली. कारण कंपनीने स्टॉक स्प्लीट १:५ च्या गुणोत्तरात जाहीर केले. १६ एप्रिल शुक्रवार ही सबव्हिजनसाठीची रेकॉर्ड डेट जाहीर झाली. गेल्या महिन्यात सेन्सेक्समध्ये ५% घसरणीच्या तुलनेत या स्टॉकने शेअर बाजारात १२ टक्क्यांची तेजी नोंदवली. हा स्टॉक आतापर्यंतचा सर्वाधिकचा उच्चांक गाठत असून सध्या १४७.८० रुपयांवर आहे.

फिलिप कार्बन ब्लॅक: बीएसईच्या आकडेवारीनुसार, गुंतवणूकदार आशीष कचोलिया यांनी फिलिप्स कार्बन ब्लॅकमध्ये २५,०२, ४९५ शेअर्स खरेदी केले. गुंतवणूकदाराने कंपनीत मार्च २०२१ पर्यंत १.४५% स्टेक घेतले. गुरुवारी फिलिप्स कार्बन ब्लॅकने १९९.८० रुपयांवर व्यापार केला.

Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy