एनआययूए व बीव्‍हीएलएफकडून तान्‍ही बालके, किशोरवयीन व केअरगिव्‍हरसाठी अनुकूल नेबरहूड्स ट्रेनिंग अॅण्‍ड कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम सादर

 

एनआययूए व बीव्‍हीएलएफकडून तान्‍ही बालके, किशोरवयीन व केअरगिव्‍हरसाठी अनुकूल नेबरहूड्स ट्रेनिंग अॅण्‍ड कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम सादर

मुंबई,एप्रिल 2021: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्सने (एनआययूए) बर्नार्ड वॅन लीअर फाऊंडेशनसोबत (बीव्‍हीएलएफ) सहयोगाने १३ एप्रिल २०२१ रोजी व्‍हर्च्‍युअली 'इन्‍फॅण्‍ट टॉडलर अॅण्‍ड केअरगिव्‍ह-फ्रेण्‍डली नेबरहूड्स (आयटीसीएन) ट्रेनिंग अॅण्‍ड कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम' सादर केला आहे. भारतातील शहरांमध्‍ये किशोवयीन व कुटुंब-अनुकूल नेबरहूड्स विकसित करण्‍यासाठी शहरी अधिकारी व तरूण व्‍यावसायिकांच्‍या क्षमता निर्माण करण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी हा प्रोग्राम डिझाइन करण्‍यात आला आहे.

शहरपातळीवरील उपक्रमांतर्गत प्रयत्‍नांमध्‍ये वाढ करण्‍यासाठी आणि नेबरहूड पातळीवर तान्‍ही बालके, किशोरवयीन, केअरगिव्‍हरच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी एनआययूए व बीव्‍हीएलएफ यांच्‍यामधील असलेल्‍या दीर्घकालीन सहयोगाला कायम राखत हा उपक्रम सादर करण्‍यात आला आहे. या उपक्रमांतर्गत शहरी अधिकारी व तरूण व्‍यावसायिकांना प्रमाणित प्रशिक्षण व क्षमता निर्माण मॉड्यूल्‍सच्‍या माध्‍यमातून कौशल्‍यपूर्ण बनवण्‍यात येईल. प्रशिक्षण उत्तमरित्‍या संरचित प्रशिक्षण मॉड्यूल्‍सच्‍या माध्‍यमातून, तसेच एनआययूए आणि गृहनिर्माण व शहरी व्‍यवहार मंत्रालय (एमओएचयूए) यांनी ज्ञान प्रसारासाठी विकसित केलेले व्‍यासपीठ नॅशनल अर्बन लर्निंग प्‍लॅटफॉर्मच्‍या (एनयूएलपी) माध्‍यमातून देण्‍यात येणार आहे.

या उपक्रमाची दोन उद्दिष्‍टे आहेत, पहिले उद्दिष्‍ट म्‍हणजे नेबरहूड व शहरी पातळीवरील सुरू असलेल्‍या व प्रस्‍ताव मांडण्‍यात आलेल्‍या शहरी विकास उपक्रमांमध्‍ये एनआययूए व बीव्‍हीएलएफने विकसित केलेल्‍या ज्ञानाच्‍या यादीमधून अध्‍ययन रूजवणे आणि दुसरे उद्दिष्‍ट म्‍हणजे किशोरवयीन व केअरगिव्‍हर्सच्‍या रोजच्‍या गरजा लक्षात घेत शहरांच्‍या विविध उपक्रमांमध्‍ये अध्‍ययनाचा समावेश करण्‍यासाठी सहभागींना सामावून घेणे. तसेच, तरूण व्‍यावसायिकांसाठी शैक्षणिक प्रमाणित कोर्सचे देखील नियोजन करण्‍यात आले आहे, ज्‍यामधून त्‍यांना शहरातील लहान बालकांच्‍या (० – ५ वर्षे) गरजांबाबत जागरूक करण्‍यात येईल आणि उद्देशासाठी पुरेशा साधनांसह सक्षम करण्‍यात येईल.

गृहनिर्माण व शहरी व्‍यवहार मंत्रलाय, भारत सरकारचे संयुक्‍त सचिव व मिशन संचालक (स्‍मार्ट सिटीज) श्री. कुणाल कुमार यांच्‍या हस्‍ते व्‍हर्च्‍युअली या उपक्रमाचे उद्घाटन करण्‍यात आले. या कार्यक्रमामध्‍ये इतर मान्‍यवरांनी देखील व्‍हर्च्‍युअली सहभाग घेतला, जसे एनआययूएचे संचालक श्री. हितेश वैद्य, बीव्‍हीएलएफच्‍या भारतीय प्रतिनिधी श्रीमती रूशदा माजीद, एनआययूएच्‍या सेंटर फॉर डिजिटल गव्‍हर्नन्‍सच्‍या नॅशनल प्रोग्राम हेड श्रीमती काकुल मिश्रा, एनआययूएच्‍या इन्‍क्‍लुसिव्‍ह डेव्‍हलपमेंटचे वरिष्‍ठ सल्‍लागार श्री. अजय सुरी. स्‍मार्ट सिटीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्‍त आणि तरूण व्‍यावसायिक यांनी देखील व्‍हर्च्‍युअली या कार्यक्रमामध्‍ये सहभाग घेतला.

गृहनिर्माण व शहरी व्‍यवहार मंत्रलाय, भारत सरकारचे संयुक्‍त सचिव व मिशन संचालक (स्‍मार्ट सिटीज) श्री. कुणाल कुमार म्‍हणाले, ''मुलांसाठी डिझाइन केलेले शहर सर्वांनुकूल असते. डेटा स्‍मार्ट, तान्‍ही बालके, किशोरवयीन व केअरगिव्‍हरसाठी अनुकूल नेबरहूड्सच्‍या खात्रीसाठी शहरांची क्षमता निर्मिती ही भावी उत्‍पादनक्षम अर्थव्‍यवस्‍थेमधील गूंतवणूक आहे.''

एनआययूएचे संचालक हितेश वैद्य म्‍हणाले, ''आम्‍ही मुलांच्‍या दृष्टिकोनामधून शहराचे नियोजन करतो तेव्‍हा विद्यमान पिढीसोबत भावी पिढ्यांना देखील विकासाच्‍या लाभांचा आनंद देण्‍यासाठी गुंतवणूक करतो. हे ध्‍येय सत्‍यात आणण्‍यासाठी मुलांच्‍या दृष्टिकोनामधून नेबरहूड/स्‍थानिक पातळीवरील नियोजन महत्त्वाचे आहे.''

बर्नार्ड वॅन लीअर फाऊंडेशनच्‍या भारतीय प्रतिनिधी रूशदा माजीद म्‍हणाल्‍या, ''कोणत्‍याही शहरी नियोजनासाठी शहरामधील निवासींच्‍या गरजा महत्त्वाच्‍या असतात. कधी-कधी तरूण पिढी सर्व लोकांसाठी काय उपयुक्‍त ठरू शकते याचे सर्वोत्तम संकेतक असते. एनआययूएसोबतच्‍या सहयोगाने आमचा शहरी अधिकारी व तरूण शहरी नियोजकांना त्‍यांची शहरे किशोरवयीन व त्‍यांच्‍या कुटुंबांसाठी अधिक सुसंगत, सर्वसमावेशक व अनुकूल बनवण्‍याकरिता योग्‍य प्रशिक्षण, साधने व संसाधने देण्‍याचा मनसुबा आहे.''

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24