वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यासाठी 'एमजी मोटर इंडिया'चा पुढाकार ~ देवनंदन गॅसेस सोबत केली भागीदारी ~

 

वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यासाठी 'एमजी मोटर इंडिया'चा पुढाकार

~ देवनंदन गॅसेस सोबत केली भागीदारी ~


 

मुंबई, २१ एप्रिल २०२१: एमजी मोटर इंडियाने मोक्सी येथील देवनंदन गॅसेस प्रा. लि. सोबत भागीदारी केली असून याद्वारे देवनंदन कंपनीतील निर्मिती प्रक्रियेद्वारे जास्तीत जास्त वैद्यकीय ऑक्सिजन तयार केला जाईल. २०११ मध्ये स्थापन झालेली देवनंदन गॅसेस प्रा. लि. ही वडोदरा आणि अहमदाबादमधील एक प्रमुख वैद्यकीय ऑक्सिजन वायू उत्पादक कंपनी आहे.

एमजी मोटर इंडिया, ठराविक उत्पादन सेट-अपवर लक्ष केंद्रीत करून एकूणच ऑक्सिजन वायू निर्मितीसाठी सहाय्य करणार आहे. यात सध्याच्या उपकरणांतील एकूण सुधारणा तसेच उत्पादनातील काही उणीवा भरून काढल्या जातील. तसेच इतर गोष्टींसाठीही योग्य तत्त्वांनुसार पाठबळ दिले जाईल. यामुळे पुढील दोन आठवड्यात उत्पादन क्षमता २५% पर्यंत वाढेल तसेच भविष्यात ती ५०% पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व एमडी राजीव छाबा म्हणाले की, “एमजीमध्ये आम्ही कोव्हिड-१९ विरुद्ध लढ्यास पाठींबा देण्यासाठी वचनबद्ध आहोत. आपण ज्या ठिकाणी काम करतो, तेथील सभोवतालच्या समाजाची काळजी घेण्याचा एक भाग म्हणून, आम्ही ऑक्सिजनच्या उत्पादनास चालना देण्याकरिता शक्य तेवढे प्रयत्न करीत आहोत. मागील वर्षी आम्ही हाच दृष्टीकोन ठेवून वडोदरा येथील मॅक्स व्हेंटीलेटर्स प्लांटमध्ये व्हेंटिलेटरचे उत्पादन वाढवले होते. आता ऑक्सिजन ही काळाची गरज असल्यामुळे आम्ही या प्रदेशातील ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. आम्ही नियोजित केलेली उद्दिष्टे साध्य करू, अशी खात्री आहे. या उपक्रमात स्थानिक प्रशासनाने सहकार्य व मार्गदर्शन केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानू इच्छितो”.

“या महान कार्यासाठी एमजीने भागीदारी केल्याबद्दल आम्ही आभार मानतो. आमची टीम दैनंदिन उत्पादनाला चालना देण्यासाठी एकजुटीने कार्यरत असून या भागीदारीमुळे उत्पादन आणखी वाढवण्यास मदत मिळेल. उत्पादन वृद्धीसाठी एमजी मोटर इंडियाचे पाठबळ मिळाल्याने, या उपक्रमाद्वारे या भागातील तसेच परिसरातील जास्तीत जास्त प्राण वाचवण्यास मदत मिळेल,” असे देवनंदन गॅसेस प्रा. लिमिटेडचे मालक विजयभाई ठक्कर म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24