कोविड-१९च्या दुसऱ्या लाटेच्या आव्हानात्मक काळात बेडच्या कमतरतेवर मात करण्यासाठी भारतातील रुग्णालयांनी दिला दूरस्थ रुग्ण देखभाल सेवेवर भर



 कोविड-१९च्या दुसऱ्या लाटेच्या आव्हानात्मक काळात बेडच्या कमतरतेवर मात करण्यासाठी भारतातील रुग्णालयांनी दिला दूरस्थ रुग्ण देखभाल सेवेवर भर

 

*दोन आठवड्यांमध्ये कोविड-१९ वॉर्डमध्ये ‘आरपीएम’ साध्य करण्यासाठी ‘डोझी’बरोबर ३०हूनही अधिक रुग्णालयांचा सहकार्य करार

*कोविड-१९ वॉर्डमध्ये सर्वसमावेशक सेवा देण्यासाठी ‘डोझी’ने उभारले रात्रंदिन चालणारे कमांड सेंटर




मुंबई, १४ एप्रिल २०२१ : महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल यांसारखी जी राज्ये सध्या कोविड-१९च्या वाढलेल्या रुग्णसंख्येचा सामना करत आहेत त्यांनी गरजू रुग्णांच्या सेवेसाठी संपर्करहित दूरस्थ रुग्ण देखभाल (कॉन्टॅक्टलेस रिमोट पेशंट मॉनिटरिंग-आरपीएम) सेवा प्रणालीचा अवलंब केला आहे. संपर्करहित दूरस्थ रुग्ण देखभाल सेवेतील अग्रणी कंपनी ‘डोझीने भारतातील १५०हूनही अधिक रुग्णालयांना केवळ २ मिनिटांमध्ये कोणताही बेड निम्नस्तरीय आयसीयूमध्ये रुपांतरीत करण्याची किमया साधली असून आयसीयूबाहेरील रुग्णांची दूरवरून देखभाल करण्यासाठीसुद्धा मदत केली आहे. गेल्या केवळ दोन आठवड्यांमध्ये देशभरातील ३० पेक्षाही अधिक रुग्णालयांनी ‘डोझी’बरोबर सहकार्य करार केला असून सध्या रुग्णालयांमधील तब्बल ४००० हूनही अधिक कोविड -१९ ‘हाय डिपेंडन्सी युनिट’ (एचडीयू) बेड कंपनीकडून देखभालीखाली आहेत. डोझी’ने रुग्णालयांमधून ‘पेशंट मॉनिटरिंग सेल’ (रुग्ण देखभाल विभाग) स्थापन केले असून त्या मध्यामातून दिवसरात्र रुग्णसेवा केली जाते आणि त्याद्वारे रुग्णांना अतिदक्षता सेवा दिली जाते. आयजीएमसी नागपूर आणि एसिक बेंगलुरू येथे ही केंद्रे असून इतरही अनेक रुग्णालयांमध्ये ती येत्या आठवड्यात सुरु होण्यास सज्ज आहेत.

 

पेशंट मॉनिटरिंग सेल’च्या माध्यमातूनडोझी’ने सर्व रुग्णांवर लक्ष ठेवणे शक्य केले असून कोणत्याही प्रकारे रुग्णाच्या तब्बेतीमध्ये बदल आढळला तर त्याद्वारे डॉक्टर आणि नर्सला तशा तत्काळ सूचना दिल्या जातात. सध्या वाढलेल्या रुग्णांमुळे रुग्णालयांवरील ताण खूप मोठ्या प्रमाणावर वाढला असून वैद्यकीय कर्मचारी आणि बेड यांचा मोठ्या प्रमाणवर सामना या रुग्णालयांना करावा लागत आहे. ‘डोझी’ने आपली समर्पित असे स्त्रोत या सर्व रुग्णालयांमध्ये ठेवले असून त्याद्वारे डॉक्टरांना मदत केली जाते. त्यासाठी योग्यवेळी त्यांना रूग्णाबद्दलचे अॅलर्ट दिले जातात आणि गंभीर असलेल्या रुग्णांची देखभाल केली जाते. त्यामुळे प्रत्येक रुग्णाच्याबद्दलची अचूक आणि आवश्यक माहिती मिळते आणि त्याद्वारे त्या रुग्णासंबंधी जी कारवाई करणे गरजेचे आहे, ती केली जाते.   

 

भारतामध्ये आरोग्याच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणावरील समस्या सध्या समोर येत आहेत. या साथरोगाच्या दुसऱ्या लाटेमध्ये दररोज सर्वाधिक रुग्ण नोंदविले जाते असून त्यामुळे देशभरातील रुग्णालयांवर अनन्वित असा ताण आला आहे. त्यामुळे आयसीयू बेडची कमतरता जाणवू लागली आहे. योग्य देखभाल आणि उपचार यांची गरज असलेल्या रुग्णांना सध्या बेडची कमतरता जाणवत आहे. त्यावर मात करण्यासाठी आणि रुग्णांवर योग्य प्रकारे उपचार करण्यासाठी सर्वच रुग्णालये दूरस्थ रुग्ण देखभाल (आरपीएम) सेवेचा अवलंब करत आहेत. त्या माध्यमातून कोरोना साथरोगाच्या दुसऱ्या लाटेवर मात करण्याचा या रुग्णालयांचा प्रयत्न आहे.

 

डोझी प्रो’ ही संपर्करहित विशेष देखभाल अशी रुग्णालय पद्धती असून त्यामध्ये आर्टीफीशीयल इंटेलीजन्सने युक्त अतिदक्षता पद्धती आहे. ‘डोझी प्रो’च्या माध्यमातून निरंतर आणि अचूक असे रुग्णांची हृदयदर, श्वसन दर आणि इतर वैद्यकीय मापदंड (प्रतितास १०० पेक्षाही अधिक वेळा) तपासले जातात. त्यात स्लीप ॲप्निया, मायो कार्डीयल परफॉर्मन्स मॅट्रिक्स यांचा समावेश होतो आणि त्यासाठी रुग्णाच्या संपर्कात येण्याची गरजही पडत नाही. या उत्पादनामध्ये औद्योगिक दर्जाचा संपर्करहित सेंसर, कम्युनिकेशन पॉड आणि क्लाऊडआधारित रुग्ण देखरेख माध्यम आहे. त्याला आर्टिफिशिअल इंटेलिजन्सआधारित अतिदक्षता पद्धती असून त्यातून शरीराची महत्वाच्या मापदंडावर तत्कालीन तपासणी केली जाते. त्याद्वारे रुग्णाची रात्रंदिवस देखरेख करणे शक्य होते. पूर्वी हे काम प्रत्यक्षपणे दोन तासाने एकदाच केले जाणे शक्य होत असे. ‘डोझी प्रो’मध्ये एक विस्तारणीय असे व्यासपीठ असून त्याद्वारे एसपीओ2 सेंसर यांसारख्या इतर महत्वपूर्ण मापदंडांची माहिती प्राप्त होते.

 

‘डोझी प्रो’ दर सेकंदाला 250 डेटा नमुने घेऊ शकते आणि त्यांचे निदान प्रत्येक ३० सेकंदाला होते. पेशंटच्या तब्बेतीची आकडेवारी सातत्यपूर्णपणे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मिळते. रुग्णाच्या तब्येतमध्ये बिघाड दिसून आला तर त्यासाठी ही यंत्रणा मदतीची ठरते. त्याद्वारे रुग्ण अधिक गंभीर होण्याआधी वैद्यकीय सेवा चमूला योग्य ती पावले उचलणे शक्य होते. डॉक्टरने आरोग्यनिगा चामुंना दूरस्थ पद्धतीने रुग्णाच्या आरोग्याचे नियंत्रण केंद्रीय रुग्ण यंत्रणेद्वारा करता येते. त्याद्वारे एकाच वेळी शेकडो रुग्णांची देखभाल वेब-डॅशबोर्डद्वारे करता येते किंवा मोबाईल फोन ॲपद्वारे करता येते. प्रत्येक रुग्णावर समर्पित अॅलर्ट लावता येतात आणि त्याद्वारे डॉक्टरांना रुग्णाच्या उपचारांची योजना अधिक चांगल्या पद्धतीने करता येते. डॉक्टरांना तब्येत खालावत असलेल्या रुग्णांवर अधिक लक्ष केंद्रित करता येते आणि त्यामुळे त्यांना सुधारित स्वयंस्फूर्त सेवा देता येते.

 

‘डोझी प्रो’ भारतात तयार झालेली यंत्रणा असून त्याची वैद्यकीय श्रेणी अचूकता ९८.४ टक्के एवढी आहे. अचूकता स्थापित होण्यासाठी या यांत्रणेची तपासणी ‘एनआयएएचएएनएस’ आणि ‘श्री जयदेव इन्स्टिट्यूट’ येथे एक हजार रुग्णांवर केली गेली. रुग्णालयांमधील या यंत्रणेच्या वापराबरोबरच ‘डोझी प्रो’ आरोग्य निगा देणाऱ्या संस्थांना पेशंटच्या महत्वपूर्ण अशी माहिती दूरस्थपणे मिळवण्यासाठी आणि खालावलेल्या तब्बेतीचा अॅलर्ट मिळण्यासाठी उपयोगात येतात. ही आकडेवारी रुग्णालयाच्या बाहेर अगदी घरातूनही घेता येते. या सेवेमध्ये रुग्णाला रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतरही एकात्मिक अशा योग्य वेळेच्या इशाराद्वारे सेवा दिली जाते. त्यासाठी बाह्य रूग सेटिंग आणि रुग्णालय स्तरीय गृह निगा सेटिंगद्वारे ‘डोझी प्रो’ यंत्रणा रुग्ण, त्यांचे कुटुंब सदस्य आणि आरोग्यनिगा पुरवठादार यांना तत्कालीन आकडेवारी आणि अॅलर्ट पुरविते. त्याद्वारे रुग्णांची परिस्थिती बिघडल्यास त्याची माहिती घेतली जाते. 

 

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथील अॅनेस्थेशिया विभागाच्या विभागप्रमुख आणि सह-प्राध्यापक डॉक्टर वैशाली शेळगावकर म्हणाल्या, “कोविड-१९ च्या केसेस झपाट्याने वाढत आहेत आणि यावेळी ही रुग्णवाढ ही पहिल्या लातेपेक्षा कितीतरी अधिक आहे. त्यामुळे संपूर्ण आरोग्यव्यवस्थेवरच प्रचंड ताण आहे. देशात आज २० लाख रुग्णालय बेड आहेत आणि त्यातील केवळ १ लाख हे आयसीयू बेड आहेत. त्याशिवाय प्रशिक्षित नर्सिंग कर्मचाऱ्यांची येथे वानवा असून त्यामुळे रुग्णांच्या तब्बेतीवर सातत्याने सक्रीय लक्ष ठेवणे कठीण होवून जाते. आयसीयूच्या बाहेर असलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवणे या आव्हानात्मक अशा काळात अगदीच जिकरीचे होवून जाते. आम्ही ‘डोझी आरपीएम पद्धती अवलंबिली असून त्याद्वारे सातत्याने देखभाल ठेवण्याची गरज असलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवणे शक्य होते. त्याचवेळी आमच्या कर्मचार्यांवरील ताणही कमी होतो. ‘डोझी’च्या माध्यमातून एकाचवेळी दूरस्थपणे १५० रुग्णांची निगा राखणे शक्य होते. त्याचवेळी २०० हूनही अधिक रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करणे शक्य झाले आहे.”

 

‘डोझी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक मुदित दंडवते म्हणाले,कोविडची दुसरी लाट ही झपाट्याने पसरते आहे. त्या पार्श्वभूमीवर रुग्णालये कोरोना साथरोगावर मात करण्यासाठी आरपीएम आणि नवीन आर्तटीफीशीयल इंटेलीजन्स तंत्रज्ञान अवलंबत आहेत. ‘रिमोट पेशंट मॉनिटरिंग हे तंत्रज्ञान प्रत्यक्ष संपर्काचा धोका फार मोठ्या प्रमाणावर कमी करते, कर्मचाऱ्यांशी कमतरता असेल तर त्यावर मात करते आणि त्याचवेळी वैद्यकीय सल्लासेवेतील पारंपारिक अशा पद्धतीला पर्याय मिळवून देते. कोविडच्या या काळात या गोष्टी महत्वाच्या आहेत. कोविड-१९ च्या विरोधातील या जागतिक अशा लढ्यामध्ये आम्ही आरोग्य निगा कर्मचारी आणि रूग यांच्या रक्षणासाठी आमच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आणि त्यासाठी रुग्नालायांबरोबर काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy