यावर्षी ६०% भारतीय सीएमओनी इन्फ्लूएंसर मार्केटिंगसाठी बजेट राखून ठेवले: क्लॅनकनेक्ट.एआय

 यावर्षी ६०% भारतीय सीएमओनी इन्फ्लूएंसर मार्केटिंगसाठी बजेट राखून ठेवले: क्लॅनकनेक्ट.एआय


मुंबई, १८ एप्रिल २०२१: ब्रँड्ससोबत जोडले जाण्यासाठी ग्राहकांचा डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वाढता ओढा लक्षात घेता, भारतातल इन्फ्लूएंसर क्रियाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. २०२० मध्ये, कोव्हिड-१९ च्या उद्रेकामुळे ब्रँडने ऑनलाइन अस्तित्व अधिक भक्कम केल्याने, मेनस्ट्रीम मार्केटिंग प्लॅनमध्ये इन्फ्लूएंसर हे प्रमुख घटक बनले. या पार्श्वभूमीवर, भारताचे पहिले व एकमेव एआय आधारीत इन्फ्लूएंसर प्लॅटफॉर्म क्लॅनकनेक्ट.एआय (ClanConnect.ai)ने नुकतेच भारतातील इन्फ्लूएंसर मार्केटिंगच्या स्थितीवर एक संशोधन केले.

देशातील इन्फ्लूएंसर मार्केटिंग क्षेत्रातील प्रभावी संशोधनात, क्लॅनकनेक्ट.एआयने एफएमसीजी, इन्फ्रास्ट्रक्चर, फॅशन आणि टेक्स्टाइल, मीडिया व मनोरंजन, बीएफएसआय, फार्मास्युटिकल्स क्षेत्रातील अग्रगण्य ब्रँडच्या सीएमओकडून माहिती मिळवली. आकडेवारीनुसार, २०२० मध्ये मार्केटिंग लीडर्सपैकी ७८% लोकांनी इन्फ्लूएंसर मार्केटिंगचा लाभ घेतला. तर त्यापैकी फक्त १३% पेक्षा जास्त कंपन्यांनी इन्फ्लूएंसर क्रियांचा पहिल्यांदाच वापर सुरु केला. ५२% ब्रँडनी १० पेक्षा अधिक इन्फ्लूएंसर्सचा लाभ घेतला. मागील वर्षात या क्षेत्रात यामुळे वेगवान वृद्धी दिसून आली.

मार्केटिंगवरील खर्चासंदर्भात, क्लॅनकनेक्ट.एआयला आढळले की, २०१९ च्या तुलनेत इन्फ्लूएंसर मार्केटिंगला वितरीत केलेले बजेट २०२० मध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. खरं तर, सीएमओ पैकी ३९.१३% नी सांगितले की, इन्फ्लूएंसर मार्केटिंगवरील खर्चात वाढ झाली. उर्वरीत ६०.८७% लोकांनी सांगितले की, २०१९ व २०२० च्या खर्चात फार बदल नव्हता. तसेच २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये मार्केटिंगवरील खर्चात वाढ झाल्याचे ५०% सहभागींनी सांगितले. यावरून असे लक्षात येते की, लक्ष्यित ग्राहकांपर्यंत ब्रँडस मेसेज पोहोचवण्याकरिता इंडस्ट्रीतील आघाडीचे ब्रँड्स इन्फ्लूएंसरवर दिवसेंदिवस जास्त विश्वास ठेवत आहेत.

सध्या, इनफ्लूएंसर मार्केटिंग मुख्य प्रवाहस्थानी असून, २०२१ च्या मार्केटिंग प्लॅनमध्ये ५८.७० टक्के सीएमओनी इन्फ्लूएंसरसाठी स्वतंत्र बजेट राखून ठेवले आहे. तसेच ५२.१७% नी २०२० च्या तुलनेत २०२१ मधील यावरील खर्च वाढवण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे, ९० टक्के सीएमओनी सध्याच्या वर्षात एकूण मार्केटिंग बजेटपैकी २५% निधी इन्फ्लूएंसर आधारीत क्रियांसाठी गृहित धरला आहे.

क्लॅनकनेक्ट.एआयचे सहसंस्थापक आणि सीओओ कुणाल किशोर सिन्हा म्हणाले, “ इन्फ्लूएंसर मार्केटिंग मोठ्या प्रमाणात वाढीच्या स्थितीत आहे. मार्केटिंगचे हे वास्तविक भविष्य आहे. अशा प्रकारच्या पहिल्याच सर्वेक्षण अहवालातून हे दिसून आले आहे. क्लॅनकनेक्ट.एआयमध्ये आम्ही अशा वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रात आघाडीवर असल्याने उत्साही आहोत. तसेच पुढील काही महिन्यात अधिक प्रगती करण्यासाठी सज्ज आहोत.”

ब्रँड्सना आजच्या घडीला इन्फ्लूएंसर मोहिमांचा लाभ घेण्यासाठी सोशल मीडिया चॅनल्सची अजिबात कमतरता नाही. अशा कँपेनसाठी ५० टक्के सीएमओना वाटते की, इन्स्टाग्राम सर्वात प्रभावी प्लॅटफॉर्म आहे तर २३.९१% नी लिंक्डइन ला पसंती दिली. तर १५.२२ टक्के लोकांना युट्यूब हा सोपा प्लॅटफॉर्म वाटला.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth