वझीरएक्सने लाँच केले नावीन्यपूर्ण एनएफटी मार्केटप्लेस

 

वझीरएक्सने लाँच केले नावीन्यपूर्ण एनएफटी मार्केटप्लेस

मुंबई, ५ एप्रिल २०२१: भारतातील सर्वात मोठ्या क्रिप्टो एक्सचेंज वझीरएक्सने पहिल्यांदाच एक मोठा बदल घडवत नॉन-फंगीबल टोकन (NFT) साठी भारतातील पहिल्या बाजारपेठांपैकी एक अशी बाजारपेठ सुरु केली आहे. या घटनेमुळे डिजिटल मालमत्ता आणि आर्ट पीस, ऑडिओ फाइल्स, व्हिडिओ, प्रोग्राम या बौद्धिक संपत्तीसह अगदी ट्वीट, डिजिटल गोष्टी व सेवांचाही अखंड विनिमय करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. या लाँचिंगद्वारे भारतीय निर्माते त्यांच्या डिजिटल संपत्तीचा लिलाव ब्लॉकचेन आधारीत एनएफटी बाजारात करू शकतात आणि त्यानंतर रॉयल्टी मिळवू शकतात.

वझीर एक्स ग्राहकांना प्लॅटफॉर्मवर निर्मिती आणि एनएफटी लिस्टिंगसाठी शुल्क आकारणार नाही. तथापि, एनएफटी इथेरियम ब्लॉकचेनवर आधारीत असल्याने इथर(ETH). मधील इथेरियम मायनर्सना गॅस फी द्यावी लागते. व्यवहार पडताळणीसाठी कंप्यूटरची जेवढी पॉवर वापरली जाते, त्यावर हे शुल्क अवलंबून असेल. वझीरएक्स अजूनही हे शुल्क रद्द करण्याच्या दिशेने काम करत असून कलाकार व निर्मात्यांसाठी एनएफटी किफायतशीर ठरण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

वझीरएक्सचे संस्थापक, निश्चल शेट्‌टी म्हणाले, “ भारतातील पहिल्यापैकी एक अशी एनएफटी बाजारपेठ सुरु करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. स्थापनेपासूनच, आम्ही नूतनाविष्कारात आघाडीवर आहोत तसेच ग्राहकांना मूल्याधारीत सेवा देऊन सक्षम केले आहे. वझीर एक्सच्या पोर्टफोलिओमध्ये आता आणखी एक भर पडली आहे. वेगाने डिजिटाइज होणाऱ्या जगात आणि जगभरात एनएफटीची पसंती वाढत असताना याद्वारे बाजारपेठेचे स्वरुपच बदलले जाईल. डिजिटल निर्माते आणि संग्राहक या दोघांनाही वझीरएक्स मार्केटमधून लाभ मिळेल. सध्या आम्ही हे व्यवहार ग्राहकांना अधिक किफायतशीर होण्यासाठी प्रयत्न करत आहोत.”

एनएफटी ही एक पहिलीच अशी मालमत्ता आहे, जी निसर्गात नॉन-फंगल आहे. म्हणजे, एनएफटी दुसऱ्या ‘आयडेंटीकल’ (यासारख्या) गोष्टीद्वारे बदलता येणार नाही. याच्या कॉपी खरेदी केल्यानंतर त्या तयार केल्या जाऊ शकत नाहीत. याद्वारे खरेदीदारांसाठी ती एक युनिक मालमत्ता ठरेल. थोडक्यात, ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून एनएफटी मालमत्तांचे वर्गीकरण करत आहे. नुकतेच डिजिटल आर्टिस्ट बीपलचे ‘एव्हरीडेज: द फर्स्ट ५००० डेज’ या पहिल्या एनएफटी आर्टवर्कचा लिलाव झाला. प्रसिद्ध ऑक्शन हाऊस क्रिस्टीजमध्ये ते ६९.३ दशलक्ष डॉलरला विकले गेले. ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सी यांनीही एनएफटी आधारीत व्यवहारात पहिले ट्विट २.९ दशलक्ष डॉलर्सला विकले. तसेच न्यूलेयासारखे लोकप्रिय संगीतकार त्यांचे एनएफटी म्युझिक लाँच करण्याच्या विचारात आहेत. एनएफटी हा संग्राहकांपासून निर्मात्यांपर्यंत तसेच व्यावसायिकांसाठी, ज्यांना नक्कल करता न येणाऱ्या तसेच बौद्धिक संपत्तीत रस आहे त्यांच्यासाठी पुढील लॉजिकल पायरी आहे. तसेच कलाकार, वितरक आणि इतर भागधारक, ज्यांना त्यांचे कॉपीराइट्स अबाधित ठेवून डिजिटल विक्री करायची आहे, त्यांच्यासाठीही हे उत्तम व्यासपीठ आहे.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202