फिनटेकचे नूतनाविष्कार आणि भांडवली बाजारावर त्याचा परिणाम

फिनटेकचे नूतनाविष्कार आणि भांडवली बाजारावर त्याचा परिणाम

भारत हा सध्या सर्वात मोठा स्मार्टफोन व सक्रिय इंटरनेट यूझर्सचा देश आहे. मोबाइल आणि संवाद तंत्रज्ञानातील आधुनिकीकरणामुळे हे शक्य झाले. तसेच देशातील डिजिटल पायाभूत सुविधा विकसित करण्यावर व्यापक परिणाम झाला. २०२१ मध्ये जवळपास ७०० दशलक्ष सक्रिय इंटरटेन यूझर्स असल्याने भारतातील तरुण यूझर्स मोठ्या प्रमाणावर टेक सॅव्ही म्हणून ओळखले जातील. कारण कोट्यवधी लोक मोबाइल अॅपद्वारे डिजिटल पेमेंटचा पर्याय वापरत ऑनलाइन व्यवहार करत आहेत. डिजिटल एकिकरणाचा अजेंडा पुढे नेण्याची फिनटेकची भूमिका पाहता, अनेक बीएफएसआय कंपन्यांनी त्यांच्या सेवांमध्ये हे तंत्रज्ञान रुजवण्यासाठी गुंतवणूक केली आहे. फिनटेकचे नूतनाविष्कार आणि भांडवली बाजारावर त्याचा होणारा परिणाम याबद्दल सांगताहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री प्रभाकर तिवारी.

ब्रोकरेज हाऊस आणि ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स यांना फिनटेक नूतनाविष्कारांचा सर्वाधिक लाभ झाला. जे टेक सोल्युशन्स या सेवांसह आले, त्यांना भारतातील अगदी दुर्गम भागातील गुंतवणूकदारांकडूनही भांडवली बाजारपेठ उपलब्ध होत आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत, बहुतांश भारतीयांना ब्रोकरेज सेवा परवडत नव्हत्या

तसेच बाजारात दूर अंतरावरून ट्रेडिंग करणे सोपेही नव्हते. मात्र, मोबाइल-अॅप-आधारीत सेवांमुळे ते काही मिनिटातच स्टॉक्स आणि कमोडिटिजमध्ये खरेदी, विक्री किंवा व्यापार करू शकतात. म्हणूनच, फिनटेक अॅप्स आणि डिजिटल ब्रोकरेज सेवा आता सामान्य बनल्या आहेत. दर तिमाहीत कोणताही डीलर, अधिकृत ब्रोकरला भेट न देता लाखो लोक यात सहभागी होत आहेत.

या प्रक्रियेमागील तंत्रज्ञान आणि त्याचा इंडस्ट्रीवरील परिणाम:

हा नूतनाविष्कार केवळ मोबाइल अॅपपुरता मर्यादित राहिला नाही तर ग्राहकांसाठी अनेक सेवाही उपलब्ध झाल्या. एआय, डाटा अॅनलिटिक्स आणि मशीन लर्निग आधारीत प्रक्रियांमुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे. यामुळे कंपन्यांनाही अनेक प्रकारे फायदा होत आहे. या सर्वांचा कामाच्या वेगावर, सार्वजनिक स्तरावर सादर केलेल्या डाटाच्या अचूकतेवर सकारात्मक परिणाम होत आहे. तसेच डेटा चोरी किंवा फसवणुकीच्या प्रकारांबाबतची सुरक्षितता मिळते. यासह, एआय आणि फेशिअल रिकग्निशन सॉफ्टवेअरचा आधार असलेल्या टू-फॅक्टर प्रमाणीकरणामुळे नव्या ग्राहकांना दूर राहून हजेरी लावणे शक्य झाले आहे. पारंपरिक प्रमाणीकरण व पडताळणी पद्धतींची जागा डिजिटल केवायसी प्रक्रियांनी घेतली आहे. यातील पडताळणीसाठी एजंट्सनी वैयक्तिकरित्या उपस्थित राहणे आवश्यक आहे.

आज महत्त्वाकांक्षी ग्राहक, कागदपत्रांच्या डिजिटल प्रत आणि लाइव्ह ट्रॅकिंगच्या माध्यमातून सेवांचा लाभ घेऊ शकतो. अशा प्रक्रियांमध्ये, काबी बीएफएसआय कंपन्या अर्जदाराची ओळख तपासण्यासाठी त्याचे लोकेशन जिओटॅग करतात. त्यांनी नमूद केलेले ठिकाण तंत्रज्ञानातील डेटाशी मिळते-जुळते आहे का, हे पाहिले जाते. तसेच फेशिअल रिकग्निशन आणि डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन सॉफ्टवेअरद्वारे, सेवा प्रदात्यांना ग्राहकाने पुरवलेली कागदपत्रे व माहिती पडताळण्यासाठी मदत होते. साहजिकच, तंत्रज्ञानातील या प्रगतीमुळे केवळ स्टॉक मार्केट इकोसिस्टिमवर प्रभावच पडला नाही तर इन्शुरन्स, डीटूसी ब्रँड्स, ई-कॉमर्स इत्यादी बीएफएसआय कंपन्या व इतर इंडस्ट्रीदेखील ग्राहकांचे प्रोफाइल तपासण्यासाठी याचा सक्रियतेने वापर करत आहेत.

शेअर बाजाराच्या क्षेत्रात फिनटेकची विविध अॅप्लिकेशन्स:

भांडवली बाजाराच्या व्यापक जगात, सायबर सिक्युरिटी, अल्गोरिदमिक ट्रेडिंग, मोबाइलद्वारे ट्रेडिंग व सल्ला इत्यादी पैलूंबाबत फिनटेकनी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. ब्लॉकचेनवर चालणारे फीचर्सद्वारे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स आधुनिक व प्रभावी उपक्रम राबवू शकतात. याद्वारे संवेदनशील माहितीच्या सुरक्षेची हमीदेखील मिळते. यात अनेक बारीक डिटेल्स असतात. उदा. व्यापार केलेले स्टॉक्स, कमोडिटीज, फ्युचर्स इत्यादींची माहिती. फिनटेक फर्म्स वेगवान व्यवहार, गुंतवणूकदारांच्या विनंत्यांनुसार अचूक प्रक्रियेची हमी देत, हाय-युटिलिटीची साधने विकसित करत आहेत.

यासह, २०१६ मध्ये भारताचा निश्चलनीकरणाच्या निर्णयामुळे, डिजिटल पेमेंट पर्यायांमध्ये अनेक पटींनी वाढ झाली. विशेष म्हणजे डिजिटल व्यवहार सर्वव्यापी झाले. यात कोपऱ्यावरील दुकानापासून मिलेनिअल गुंतवणूकदारांपर्यंत, सर्वचजण एकाच वित्तीय सेवा अॅपवर सहभागी होतात. स्मार्टफोन सुलभ पिढी जी वित्तीय व्यवहार डिजिटल पद्धतीने करते, तिच्या आवडी लक्षात घेता, डिजिटल ब्रोकर्स आणि फिनटेक कंपन्या त्याप्रकारचे अॅप तयार करत आहेत. डिजिटल पेमेंट पर्याय आणि डिजिटल ब्रोकर्स विविध प्रकारे त्यांच्या पैशाला गती देण्यासाठी पारंपरिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहेत. प्रथमच, हे प्रमाण एवढे वाढले आहे की, कमिशनचा दर शून्यावर आला आहे. तर इन्ट्राडे ट्रेडदेखील कमी शुल्कात होतात. तसेच अनेक सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

एक गुंतवणूकदार, फक्त एकाच मोबाइल अॅपच्या माध्यमातून, शेअर्समध्ये व्यवहार करू शकतो, पेंशन योजना व म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करू शकतो, आयपीओसाठी अर्ज करू शकतो, कमोडिटी एक्सचेंजमध्ये ट्रेडिंग करू शकतो, स्टॉक मार्केटमध्ये खरेदी व विक्री करू शकतो, गुंतवणुकीविषयी शिकू शकतो, इतरांकडून प्रोफेशनल सल्लाही मिळवू शकतो. अगदी सोन्यासारख्या पारंपरिक वस्तूही, ज्या प्रत्यक्ष मालमत्ता मानल्या जातात, त्यांचा इलेक्ट्रॉनिक स्वरुपात अर्थात गोल्ड ईटीएफच्या स्वरुपात अनेक पेमेंटच्या पर्यायांद्वारे व्यापार करता येत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेतील विकासाची पातळी आणि वित्तीय बाजारात अतिसामान्य ग्राहकाचा सहभाग यामुळे फिनटेक नूतनाविष्कार शक्य झाला आहे. याआधारेच, भारताला भविष्यात आणखी प्रगती करता येईल.

Comments

Popular posts from this blog

Piramal Capital & Housing Finance Limited Secured NCD Public Tranche I - Issue Opens on July 12, Coupon Rate Upto 9.00% p.a.#

54 School Principals from across India get the prestigious Change Maker Award for digital transformation & holistic learning

Samco Launches ‘KyaTrade’ - India’s First Real-time Stock Trading & Recommendation App