इलेक्ट्रिक वाहनासंबंधित भारतात आढळणारी ५ मिथकं

 

इलेक्ट्रिक वाहनासंबंधित भारतात आढळणारी ५ मिथकं


 

गेल्या काही वर्षांत, रस्त्यावरून जाताना, पेट्रोल आणि डिझेलचे भाव अवाढव्य पद्धतीने वाढल्याची तक्रार कुणी केली नसेल, असे घडलेच नसेल. (विशेष म्हणजे, काही शहरांमधील पेट्रोलचे भाव प्रति लीटर ९६ रुपयांपर्यंत पोहोचले.) यासोबतच, टेस्ला भारतीय बाजारात उतरत असून इलेक्ट्रिक वाहने चांगली वाटतायत, असेही ऐकले असेल. मग असे काय आहे, की ज्यामुळे लोक दुसरा पर्याय स्वीकारत नाहीत? याठिकाणी आम्ही ईव्हीविषयीच्या ५ सामान्य मिथकांवर चर्चा करणार आहोत.

मिथक १: ईव्ही चार्ज करण्यासाठी खूप वेळ लागतो:

ईव्हीकडे वळण्याचा विचार करणाऱ्यांना सतावणारी सर्वसामान्य चिंता म्हणजे, दर काही मिनिटांनी वाहन चालवण्यासाठी इंधन भरावे लागू शकतते. ईव्ही चार्जिंगसाठी खूप तास लागू शकतात. ईव्ही मधील इंधन भरण्याच्या पद्धतींमध्ये झालेला बदल पाहता, हा युक्तीवाद विचारात घेतला जाणार नाही. आपल्यााकडे उत्तम पार्किंग झोन किंवा गॅरेज असेल तर बेसिक २४० व्ही पॉवर आउटलेटद्वारे ईव्ही बहुतांशवेळा एका रात्रीत किंवा काही रात्रींमध्ये चार्ज होतात. म्हणजेच, पेट्रोल पंप किंवा सीएनजी स्टेशनवर लांबलचक रांगा टाळता येतील. भारतीय महामार्गांवर चार्जिंगची सुविधा विकसित झाल्यावर लांब पल्ल्यावर गाडी चालवणे अधिक सोपे जाईल. सध्याचे सुपरचार्जर्स पूर्ण चार्ज होण्यासाठी ३० ते ६० मिनिटे घेतात. एखाद्या ठिकाणी थांबून जेवण करण्यासाठी एवढा वेळ लागततो. ईव्हीसाठी पुरेशी पायाभूत सुविधा निर्माण करणण्याच्या दृष्टीने जोरदार पावले उचलत, अनेक कंपन्या त्यांच्या पार्किंगच्या जागेत चार्जिंग स्टेशन बसवण्याचा विचार करीत आहेत.

एमजीचे फास्ट चार्जिंग झेडएस ईव्ही ला ५० मिनिटात ० %- ८० % टॉप अप करतात. एमजीच्या दिल्लीतील ईचार्जबेज सोबतच्या भागीदारीतून ग्राहकांना किंमतीतून सवलत देत, घर किंवा ऑफिसमध्ये एसी फास्ट चार्जर बसवता येऊ शकतो. एमजीने निवडक एमजी शोरुममध्ये १० डीसी ५० केडब्ल्यू सुपर फास्ट चार्जिंग स्टेशन सुरू करण्याकरिता फोर्टम चार्ज अँड ड्राइव्ह इंडियासोबतही भागीदारी केली आहे.

मिथक २: ईव्हीs किफायतशीर नाहीत:

नवीन तंत्रज्ञानाने जे परिवर्तन घडते, त्यानुसार पाहिले असता, हे फार आश्चर्यकारक नाही. आजच्या लक्झरी बाजारात बहुतांश ईव्ही उच्च किंमतीत आहेत. मात्र हे चित्र बदलत आहे. विशेषत: भारतात, सवलतींद्वारे त्यांची किंमती कमी केली जात आहे. ईव्ही जास्तीत जास्त किफायतशीर होत आहेत. अमेरिकेने केलेल्या एका तपासणीनुसार, पेट्रोलवर चालणाऱ्या कारच्या तुलनेत ईव्ही निम्म्या किंमतीत येतात. ईव्हीचे थोडेच पार्ट काढता येतात, प्रभावी कूलिंग सिस्टिम आणि ऑइल नसल्यामुळे देखभालीची किंमतही कमी असते.

मालकीचा सर्वात सोपा अनुभव देण्याकरिता, एमजीने एमजी ईशील्ड आणले आहे. यात खासगीरित्या नोंदणीकृत ग्राहकांना कारवरील अमर्याद किलोमीटरसाठी ५ वर्षांची मोफत मॅन्युफॅक्चरर वॉरंटी तसेच बॅटरीवर ८ वर्षे/ १५० किमी वॉरंटी दिली जाते. खासगी नोंदणीकृत कारसाठी ५ वर्षांची लेबर फ्री सर्व्हिससह, ५ वर्षे राउंड द क्लॉक रोडसाइड असिस्टन्सची सुविधा प्रदान केली जाते.

एमजी झेडएस ईव्ही च्या ग्राहकांसाठी वन स्टॉप सोल्युशनद्वारे एमजी ईशील्ड प्रदान करत, एमजीने कारदेखो.कॉमसोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. याद्वारे प्रथमच, ३-५० योजनेची सुविधा मिळेल. त्याअंतर्गत, निश्चित पुनर्विक्री मूल्य मिळेल व झेडएस ईव्ही खरेदीच्या वेळी निश्चित रक्कम देऊन ही सुविधा घेता येईल. कारदेखो.कॉम झेडएस ईव्ही ग्राहकांना मालकीची तीन वर्षए पूर्ण झाल्यावर ५० % च्या अवशिष्ट किंमतीवर गॅरेंटीयुक्त बायबॅक प्रदान करेल.

मिथक ३: ईव्ही बॅटरी खूप महाग असून त्या वारंवार बदलाव्या लागतात:

इलेक्ट्रिक वाहन आणि अनेक पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक्समध्ये वापरण्यात येणाऱ्या बॅटरीचा एक प्रकार म्हणजे लिथियम-आयन बॅटरी. लिथियम- आयन बॅटरी इतर पर्यायांपेक्षा अधिक सुरक्षित आहे. बॅटरी उत्पादकांना ग्राहकांच्या सुरक्षेकरिता बॅटरीत बिघाड झाल्यास, उपायांबद्दल हमी देणे आवश्यक असते.

लिथियम-आयन बॅटरीची किंमतीही वेगाने कमी होत आहे आणि भारतात उच्च कामगिरी करणाऱ्या बॅटरींमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. सध्या, ईव्ही बॅटरी २४१,००० किमी धावल्यानंतरही ९० % पर्यंत क्षमता देतात. सामान्य भारतीय ड्रायव्हर वरीलप्रमाणे अंतर पार करत नाही. जे एवढे अंतर पार करतात त्यांच्यासाठी ईव्ही कंपन्या बॅटरीवर ८ वर्षाची गॅरेंटी देतात. बॅॅटरी पॅकवरील वॉरंटीसाठी, वैयक्तिक ग्राहकांना एमजी झेडएस ईव्ही ८ वर्षे/ १,५०,००० किमी वॉरंटी देईल.

मिथक ४: लांब प्रवासासाठी ईव्ही अयोग्य असतात:

ईव्ही विकत घेण्याचे प्रमाण कमी आहे, यामागील आणखी एक ससमज म्हणजे, एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा शहराबाहेर जाण्यासाठी ही वाहने योग्य नाहीत. मात्र नव्या काळातील, जागतिक पातळीवरील इलेक्ट्रिक वाहने प्रचंड सक्षम बॅटरीयुक्त असून ते ३०० किमी अंतरावर प्रवास करण्याची हमी देतात. आघाडीच्या जागतिक ईव्ही कंपन्या बाजारात प्रवेश करत असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध झालेल्या ईव्ही सुविधांचे स्थानिकीकरण करून ते बाजारात परिवर्तन घडवत आहेत. त्यामुळे भारतातील ग्राहकांची चिंता यातून अधिक उत्तम प्रकारे दूर होईल. चार्जिंग स्टेशनवर सरकारचा भर वाढत असताना, लवकरच अशी वेळ येईल की, आपण खासगीरित्या दिल्लीतून चंदीगडपर्यंत जास्तीत जास्त चार्जिंग स्टेशनची मदत घेऊन सहज प्रवास करता येईल. दरम्यान, एमजी झेडएस ईव्ही एकदा चार्ज केल्यावर ३४० किमी अंतर पार करू शकते. सर्व इलेक्ट्रिक एमजी सायबरस्टर संकल्पनेत ८०० किमी रेंजचा दावा केला आहे.

मिथक ५: ईव्हीचा वेग कमी असतो:

पूर्वी बहुतेक इलेक्ट्रिक वाहनांविषयी हा समज होता. पण ईलेक्ट्रिक रेसकारसुद्धा अस्तित्वात आहेत, हे कळाल्यास आपल्याला आश्चर्य वाटेल. बॅटरीतील चार्जिंग जपून ठेवण्यासाठी बहुतांश कारचे निर्माते टॉप स्पीडला मर्यादा ठेवतात. त्यामुळे बहुतांश ईव्ही इलेक्ट्रिक मोटर स्पीड कमी करण्याच्या उद्देशाने ठराविक प्रमाणात डिझाइन केलेल्या असतात. हे प्रमाण चाकांपर्यंत प्रसारीत होण्यापूर्वी सामान्यत: ८००० ते १०,००० आरपीएम दरम्यान असते. ईव्हीमध्ये त्वरीत शक्ती निर्माण करण्याची क्षमता असते. यात वेगाने सुधारणाही होत आहेत. कंझ्युमर वाहनांमध्येसुद्धा, ईव्ही २.५ सेकंदात ०-९६ केएमपीएच वेग धारण करू शकतात! उदाहरणार्थ, एमजी झेडएस ईव्ही ८.५ सेकंदात ०-१०० किमी/तास वेग घेते. हा प्रचंड वेग आहे. एमजी ऑल इलेक्ट्रिक एमजी सायबरस्टरमध्येही ३ सेकंदात ०-१०० किमी/तास वेगाचा दावा करते.

२०२१ मध्ये अनेक इलेक्ट्रिक वाहने लाँच होत आहेत. यात बहुप्रतीक्षित ऑडी ई-ट्रॉन, वोल्वो एक्ससी४० रिचार्ज, मर्सिडीज-बेंझ ईक्यूएस, महिंद्रा ईकेयूव्ही१०० आणि टाटा अल्ट्रॉझ ईव्ही यांचा समावेश असून ते किफायतशीर व लक्झरी अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध असतील.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24