हाँगकाँग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजीतर्फे एआय ॲप्लिकेशनच्या दोन लोकप्रिय पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू

 


 

 हाँगकाँग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजीतर्फे एआय ॲप्लिकेशनच्या दोन लोकप्रिय पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू 

 


भारत, १४ एप्रिल, २०२१ : टाइम्स हायर एज्युकेशन यंग युनिव्हर्सिटी रँकिंग २०२० मध्ये पहिले मानांकन प्राप्त झालेल्या आणि क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२१ मध्ये २७ वे मानांकन प्राप्त झालेल्या हाँगकाँग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी (एचकेयूएसटी) या संस्थेतर्फे २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी त्यांच्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या प्रमुख विषयासह सायन्स (ग्रुप )* किंवा इंजिनीअरिं या दोन लोकप्रिय अभ्यासक्रमांसाठी आणि इतर अभ्यासक्रमांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 

 

एआय हा सध्याच्या काळातील लोकप्रिय विषय असला तरी नव्याने येऊ घातलेल्या ज्ञानाच्या आधारे नवीन अभ्यासक्रम शिकणे विद्यार्थ्यांसाठी खूप परिणामकारक ठरेलच असे नाही. कारण असे ज्ञान विद्यमान यंत्रणेमध्ये सामावून घ्यावे लागते जेणेकरून विद्यार्थ्यांना अशा नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानांचा प्रत्यक्ष आयुष्यात वापर कसा करता येईल, हे उमगेल. उदा. नवीन औषधे विकसित करण्यासाठी एआयचा कसा वापर करता येईल, सध्या अस्तित्वात असलेल्या औषधांचा नवा उपयोग शोधून काढणे, प्रकल्प उभारण्यासाठी सर्वोत्तम लोकेशन आणि मटेरिअल निश्चित करणे किंवा वेगाने दिसेनासा होणाऱ्या अब्जावधी डेटाचे विविध शास्त्रीय उद्दिष्टांसाठी विश्लेषण करणे. 

 

म्हणूनच एचकेयूएसटीने त्यांच्या सर्वोच्च मानांकन असलेल्या सायन्स आणि इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांची एआयशी सांगड घातली. हा अभ्यासक्रम या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांकडून शिकविण्यात येतो. या दोन अभ्यासक्रमांसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा मेजर म्हणजेच प्रमुख विषय निवडता येईल. भौतिकशास्त्र, कम्प्युटर सायन्स, गणित, सिव्हिल इंजिनीअरिंग किंवा ओशन सायन्स अँड टेक्नोलॉजी हे विषय सायन्स (ग्रुप ) किंवा इंजिनीअरिंगचे दुसरे वर्ष सुरू होण्याआधी निवडता येतील आणि एआय अभ्यासक्रम हा विस्तारीत प्रमुख विषय म्हणून निवडता येईल. त्यांच्या प्रमुख अभ्यासाच्या क्षेत्रात एआयचा वापर करणारा सर्वांगीण प्रकल्प विद्यार्थ्यांना पूर्ण करावा लागेल. 

 

या दोन अभ्यासक्रमांचा कालावधी चार वर्षांचा आहे. त्यांचा मार्ग सुनिश्चित केलेला आहे. पदवीधरांना त्यांनी निवडलेल्या दोन्ही प्रमुख पारंपरिक विषयांची पदवी आणि विस्तारीत प्रमुक विषयाची पदवी मिळेल. हा विस्तारीत विषय सध्या एआयपुरत सीमीत असला तरी नजीकच्या भविष्यात डेटा सायन्स, फिनटेक आणि डिजिटल मीडिया हे विषय समाविष्ट होणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

Piramal Capital & Housing Finance Limited Secured NCD Public Tranche I - Issue Opens on July 12, Coupon Rate Upto 9.00% p.a.#

54 School Principals from across India get the prestigious Change Maker Award for digital transformation & holistic learning

Samco Launches ‘KyaTrade’ - India’s First Real-time Stock Trading & Recommendation App