भारतीय निर्देशांक मजबूत नफ्यात; निफ्टी १४,८०० च्या पुढे स्थिरावला तर सेन्सेक्सची ५२० अंकांची वधारला

 

भारतीय निर्देशांक मजबूत नफ्यात; निफ्टी १४,८०० च्या पुढे स्थिरावला तर सेन्सेक्सची ५२० अंकांची वधारला

मुंबई, १ एप्रिल २०२१: भारतीय निर्देशांक आज मजबूत नफ्यासह हिरव्या रंगात स्थिरावला. या नफ्याचे नेतृत्व मेटल्स, बँक आणि ऑटो स्टॉक्सनी केले. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की, निफ्टीने १.२०% किंवा १७६.६५ अंकांनी वृद्धी घेतली व तो  १४,८००च्या पातळीपुढे म्हणजेच १४,८६७.३५अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स १.०५% किंवा ५२०.६८अंकांनी वाढला व ५०,०२९.८३ अंकांवर स्थिरावला. आज जवळपास २१२० शेअर्सनी नफा कमावला, ७२७ शेअर्स घसरले तर १४३ शेअर्स स्थिर राहिले.

JSW स्टील (७. ९१%), हिंडाल्को (६. ५६%), टाटा स्टील (५. ८०%), अदानी पोर्ट्स (४. ४३%), आणि इंडसइंड बँक   (४. ४३%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर दुसरीकडे, HUL (१. ३४%), नेस्ले (०. ६७%), HDFC लाइफ (०.५५%), डिव्हीज लॅब (०.३५%), आणि TCS (०.३४%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले..

सेक्टर्सच्या आघाडीवर, निफ्टी मेटलने ५% ची बढत घेतली तर निफ्टी ऑटो, निफ्टी बँकिंग आणि वित्तीय सेवांनी १ ते २% ची वृद्धी दर्शवली. बीएसई मिडकॅप व बीएसई स्मॉलकॅपने अनुक्रमे १.६६% आणि २.०५% ची वाढ दर्शवली.

अशोक लेलँड लि.: अशोक लेलँडचे स्टॉक ३.७९%नी वाढले व त्यांनी ११७.८० रुपयांवर व्यापार केला. कंपनीने मार्च महिन्यात एकूण १७,२३१ युनिट्सची विक्री दर्शवल्यावर हे परिणाम दिसून आले. फर्मने वार्षिक स्तरावर २,१२६ युनिट्सची विक्री दर्शवली तर मासिक वृद्धी १३,७०३ एवढी नोंदवली.

व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स लिमिटेड: फर्मने मार्च महिन्यात पॉवर टिलर्सची ३०५६ युनिट आणि ट्रॅक्टर्सची ७३१ युनिट विक्री दर्शवली. मागील २०२० या वर्षी याच कालावधीत हा आकडा अनुक्रमे १५८५ युनिट आणि ३९० युनिट एवढा होता. या घोषणेनंतर फर्मचे स्टॉक २. ०७% नी वाढले व त्यांनी १८३०.१५ रुपयांवर व्यापार केला.

स्टील स्ट्रिप व्हील्स लि.:स्टील स्ट्रिप व्हिल्सने मार्च २०२१ मध्ये आतापर्यंतची १६.७३ लाख एवढी सर्वाधिक व्हील रिम विक्री नोंदवली. मार्च २०२० मध्ये ती ७.८८ लाख होती. यामुळे वार्षिक वृद्धी ११.४४% एवढी दिसून आली. परिणामी कंपनीचे शेअर्स ३.१३% नी वाढले व त्यांनी ७२०.०० रुपयांवर व्यापार केला.

एपिएल अपोलो ट्यूब्स लि.: फर्मने २०२१ या वित्तवर्षातील चौथ्या तिमाहीत ४३५,३४८ टन विक्रीची नोंद केली. वित्तवर्ष २०२० मधील या तिमाहीत ती ४००,६१६ टन एवढी होती. कोव्हिडच्या अडथळ्यानंतरही कंपनीची विक्री वाढली. दरम्यान, कंपनीचे स्टॉक्स ५.३४%  नी वाढले व त्यांनी १,३२६ रुपयांवर व्यापार केला. 

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.: रिलायन्स इन्फ्राने मुंबईतील सांताक्रूझ येथील रिलायन्स सेंटर येस बँकेला कर्जवसुलीपोटी १२०० कोटी रुपयांना विकले. त्यानंतर रिलायन्स इन्फ्राचे स्टॉक्स ९.२६% नी वाढले व त्यांनी ३८.३५ रुपयांवर व्यापार केला.

जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड: जेएसडब्ल्यू स्टीलचे स्टॉक ७.९१% नी वाढले व त्यांनी ५०५.५० रुपयांवर व्यापार केला. कंपनीने दोळवी वर्क्स फॅसिलिटीमध्ये उत्पादन सुरु करण्याची घोषणा केल्यानंतर हे परिणाम दिसून आले.

भारतीय रुपया: वार्षिक बँक क्लोजिंगमुळे आज भारतीय रुपयाचे मूल्य स्थिर होते. देशांतर्गत इक्विटी बाजारात सकारात्मक संकेत दिसून आल्याने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाने ७३.११ रुपयांचे मूल्य गाठले.

जागतिक बाजारातील संकेत: अमेरिकेच्या आर्थिक संतुलित धोरणांमुळे युरोप तसेच काही भागात कोव्हिड लॉकडाऊनच्या उपाययोजना असूनही जागतिक बाजार उच्चांकी स्थितीत राहिला. नॅसडॅकने काल १.५४% वृद्धी घेतली. तर एफटीएसई १०० चे शेअर्स ०.५१%, एफटीएसई एमआयबीचे शेअर्स ०.२३% नी वाढले. निक्केई २२५ चे शेअर्स ०.७२% आणि हँगसेंगचे शेअर्स १.९८% नी वाढले.

Comments

Popular posts from this blog

Piramal Capital & Housing Finance Limited Secured NCD Public Tranche I - Issue Opens on July 12, Coupon Rate Upto 9.00% p.a.#

54 School Principals from across India get the prestigious Change Maker Award for digital transformation & holistic learning

Samco Launches ‘KyaTrade’ - India’s First Real-time Stock Trading & Recommendation App