पुण्यात 'कोविड-१९' विरोधाच्या लढ्यात 'पीएनजी ज्वेलर्स'चा हातभार

पुण्यात 'कोविड-१९' विरोधाच्या लढ्यात 'पीएनजी ज्वेलर्स'चा हातभार

*'पीएनजी ज्वेलर्स'ने केलेल्या योगदानातून पुणे महानगरपालिकेने घेतले रेमेडिसविरचे ६०० वायल्स
 

 

पुणे, ५  मे २०२१ : सराफी व्यवसायाची समृद्ध परंपरा असलेल्या 'पीएनजी ज्वेलर्स'ने रेमेडिसविर वायल्सच्या खरेदीकरिता पुणे महानगरपालिकेला योगदान दिले आहे.  'पीएनजी ज्वेलर्स'च्या वतीने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांनी रेमेडिसविर वायल्स खरेदीसाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांना धनादेश आज सुपूर्द केला. यावेळी उपमहापौर सुनिता वाडेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, अतिरिक्त आयुक्त रूबल अगरवाल, नगरसेवक दीपक पोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
या योगदानामुळे पुणे महानगरपालिकेला गरजू रूग्णांकरिता रेमेडिसविरच्या ६०० वायल्सची खरेदी करता येणार आहे.
याबाबत बोलताना 'पीएनजी ज्वेलर्स'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले की, कोरोना विषाणूने आपल्या राज्यात आणि देशात ज्या पद्धतीने हाहाकार माजवला आहे, हे सारे दृश्य आम्ही नुसते बघत राहू शकलो नाही. शक्य होईल त्याप्रकारे आम्हाला लोकांची मदत करायची होती. आमच्याकडील कर्मचारी, कारागीर व त्यांचे कुटुंबीय असो वा बेड मिळवून देण्याची विनंती करणारे लोक असोत, या सर्वांसाठी
पुण्यातील एक महत्त्वाचा उद्योगसमूह म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून आम्ही रेमेडिसविर वायल्सच्या खरेदीत पुणे महापालिकेला योगदान द्यायचे ठरवले. सध्या पुण्यामध्ये औषधे, ऑक्सिजन, ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स आणि इतर महत्त्वाच्या वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा जाणवत आहे. अशा कठीण काळात आम्ही पुणे महानगरपालिकेला चांगल्या कामात साहाय्य करू शकलो, याचे आम्हाला समाधान आहे. आम्ही मदतकार्यामध्ये आम्ही यापुढेही आमचे योगदान देत राहू. गरजेच्या वेळी लोकांना आधार देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202