५०० बेड्सची क्षमता असलेले कोव्हिड रुग्णालय स्थापन करण्यासाठी अर्जस स्टीलची अनंतपूर जिल्हा प्रशासनाशी भागीदारी
५०० बेड्सची क्षमता असलेले कोव्हिड रुग्णालय स्थापन करण्यासाठी अर्जस स्टीलची अनंतपूर जिल्हा प्रशासनाशी भागीदारी
स्टीलच्या कारखान्यापासून कोव्हिड आरोग्य सुविधा केंद्रापर्यंत पाइपलाईनच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा करणार
मुंबई 31 मे २०२१ : स्पेशालिटी स्टील उत्पादक अर्जस स्टील यांनी अनंतपूर जिल्हा प्रशासनाच्या भागीदारीने आंध्रप्रदेशमधील अनंतपूर जिल्ह्यातील ताडीपत्री येथे ५०० बेड्सची क्षमता असलेले कोव्हिड आरोग्य सेवा रुग्णालय सुरू केले आहे. अर्जस स्टीलने ५०० बेड्सच्या कोव्हिड आरोग्यसेवा रुग्णालयापर्यंत ऑक्सिजन पाइपलाईन टाकली आहे आणि त्यामुळे अखंडित ऑक्सिजन पुरवठ्याची खातरजमा झाली आहे.
या संयुक्त उपक्रमामुळे हॉस्पिटलमध्ये अत्यंत महत्त्वाची गरज असलेल्या ऑक्सिजनची समस्या हाताळण्यात आली आहे. परिणामी, आधीच कमतरता असलेल्या ऑक्सिजन सिलिंडर आणि टँकर यंत्रणेवरील ओझे कमी झाले असून आता हे स्रोत राज्यातील इतर भागांमध्ये उपयोगात आणता येणार आहेत. कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेचा भाग म्हणून त्यांच्याकडे ऑक्सिजन प्लांट आहे, पण यात तयार होणारा ऑक्सिजन औद्योगिक श्रेणीचा आहे. आंध्रप्रदेश वैद्यकीय सेवा व पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या (एपीएमएसआयडीसी) देखरेखीखाली हा ऑक्सिजन वैद्यकीय उपयोगामध्ये परीवर्तीत करण्यात आला.
“अनंतपूर जिल्हा प्रशासन आणि अर्जस स्टील यांच्या संयुक्त सहयोगाने कोव्हिड रुग्णांसाठी पुरेशा खाटा आणि ऑक्सिजन उपलब्ध होईल याची खातरजमा करण्यात आली. अखंडित ऑक्सिजन पुरवठा ही प्रमुख समस्या होती. आमच्या कारखान्यातून रुग्णालयापर्यंत थेट ऑक्सिजन पाइपलाईन टाकून आम्ही वाहतुकीशी संबंधित अनेक समस्या टाळल्या. आमच्या टीमने दिवसरात्र मेहनत करून हे शक्य केले. या ५०० बेड्सची क्षमता असलेल्या रुग्णालयात रायलासीमा भागातील अनंतपूर, कडप्पा आणि कुर्नूल या तीन जिल्ह्यातील रुग्णांना सेवा उपलब्ध होणार आहे.”, असे एएसपीएलचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रीधर कृष्णमूर्ती म्हणाले.
अर्जस स्टीलचे शेअरहोल्डर्स (एडीव्ही भागीदार), संचालक आणि अर्जस स्टीलचे व्यवस्थापन यांचा आपल्या परिसरातील समुदायामध्ये गुंतवणूक करण्यावर विश्वास आहे आणि आमच्या सुमदायाचे आरोग्य हा आमच्या सीएसआर उपक्रमांचा महत्त्वाचा स्तंभ आहे. या व्यतिरिक्त, विषाणूशी लढा देण्यासाठी आणि त्यावर मात करण्यासाठी विविध मार्गांनी ताडीपत्री आणि अनंतपूरच्या परिसरात असलेल्या रुग्णालयांना आधार उपलब्ध करून देण्यासाठी अर्जस स्टील प्रयत्न करत आहे, अशी पुष्टी त्यांनी जोडली.
५०० बेड्सचे कोव्हिड केअर रुग्णालय सुरू केल्याच्या समाधानाबद्दल आपली प्रतिक्रिया देताना अनंतपूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी श्री. गंधम चंद्रुदू आय. ए. एस. म्हणाले, “चीनने १० दिवसांत ५०० खाटांचे कोव्हिड आरोग्यसुविधा रुग्णालय उभारून एक विक्रम प्रस्थापित केला. आंध्रप्रदेश सरकार आणि टीम अनंतपुरमुने जागतिक प्रमानकतेच्या जवळ जात केवळ दोन आठवड्यांमध्ये ५०० बेड्सची क्षमता असलेले कोव्हिड सेवा रुग्णालय उभारले.”
Comments
Post a Comment