‘पे युवर काँटॅक्ट’ कोटक ग्राहकांना आता फक्त मोबाइल नंबरसह सहज पैसे ट्रान्सफर करता येतील आणि पेमेंट करता येतील
‘पे युवर काँटॅक्ट’
कोटक ग्राहकांना आता फक्त मोबाइल नंबरसह सहज पैसे ट्रान्सफर करता येतील आणि पेमेंट करता येतील
मुंबई, 28 जून 2021: कोटक महिंद्रा बँकेने (KMBL) आज केएमबीएलच्या मोबाइल बँकिंग अॅपवरील 'पे युवर काँटॅक्ट' या नाविन्यपूर्ण सुविधेचे सादरीकरण केले. यात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) व्यासपीठाचा वापर करून् ग्राहकांना त्यांच्या कोणत्याही काँटॅक्टसाठी कोणत्याही पेमेंट अॅपवर फक्त संबंधित व्यक्तीचा मोबाइल नंबर वापरून पेमेंट करता येईल किंवा पैसे पाठवता येतील.
'पे युवर काँटॅक्ट'सह केएमबीएल ग्राहकांना आता पैसे पाठवण्यासाठी किंवा पेमेंट करण्यासाठी बँकेचे खाते क्रमांक किंवा आयएफएससी कोड मिळवण्याची, तो स्मरणात ठेवण्याची किंवा यूपीआय आयडी आठवण्याची गरज नाही. ग्राहकांना फक्त त्यांच्या मोबाइल फोनमध्ये सेव्ह केलेला काँटॅक्ट निवडावा लागेल किंवा ज्या व्यक्तीला पैसे द्यायचे तिचा मोबाइल नंबर प्रविष्ट करून यूपीआय अॅप किंवा त्या व्यक्तीच्या क्रमांकाशी जोडलेले केएमबीएल खाते प्रविष्ट करायचे आणि सहजरित्या पैसे पाठवता येतील... थेट कोटक मोबाइल बँकिंग अॅपमधूनच. 'पे युवर काँटॅक्ट' सुविधा अँड्रॉईड आणि आयओएसवरील सर्व पेमेंट अॅप्सला समर्थित आहे.
कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष आणि चीफ डिजिटल ऑफिसर दीपक शर्मा म्हणाले, "कोटक मोबाइल बँकिंग अॅपवरील 'पे युवर काँटॅक्ट' सुविधेमुळे पेमेंट करणे अत्यंत सोपे आणि सहज झाले आहे. कोटक ग्राहकांना आता मित्रपरिवार, घरातले मदतनीस, आसपासची दुकानं या साऱ्यांचे पेमेंट फक्त त्यांचा मोबाइल नंबर टाकून करता येईल. इतकेच नाही, कोणत्याही यूपीआय आयडीला कोटक मोबाइल बँकिंग अॅपच्या सुरक्षित प्रणालीतूनच पेमेंट होणार असल्याने फंड ट्रान्सफर आणि पेमेंट व्यवहार सुरक्षित राहतात. तसेच ग्राहकांना त्यांच्या फोनवर विविध पेमेंट अॅप डाऊनलोड करण्याचीही गरज नाही."
"'पे युवर काँटॅक्ट'मुळे आणखी एक मुद्दा सहज होतो तो म्हणजे विविध अॅप्समधील चलन म्हणजेच इंटरऑपरेटिबिलिटी. भारतीय बाजारपेठेत यूपीआय प्रणाली प्रचंड लोकप्रिय आहे. बँक खाते असलेल्या जवळपास प्रत्येक भारतीयाकडे यूपीआय आयडी आहे. 'पे युवर काँटॅक्ट'च्या माध्यमातून आमचे ग्राहक आता अगदी सहजरित्या कोणत्या यूपीआय-लिंक्ड बँक अकाऊंटला, कोणत्याही पेमेंट अॅपच्या माध्यमातून त्यांच्या बेनिफिशरीचा मोबाइल नंबर देऊन पैसे पाठवू शकतील," असे दीपक म्हणाले.
केएमबीएलच्या डिजिटल-फर्स्ट धोरणातील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कोटक मोबाइल बँकिंग अॅपमध्ये विविध ग्राहकस्नेही सुविधा गेल्या वर्षभरात देण्यात आल्या आहेत. ग्राहकांच्या बँकिंग, पेमेंट्स आणि लाईफस्टाईल गरजा भागवण्याचा उद्देश यामागे आहे आणि जागतिक महासंकटानंतर या सेवेच्या वापरात प्रचंड वाढ झाली आहे.
Comments
Post a Comment