विद्यार्थ्यांना जेईई आणि एनईईटीसाठी अधिक चांगली तयारी करण्यासाठी आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडने आपले 'आकाश अॅप’ लाँच केले.
विद्यार्थ्यांना जेईई आणि एनईईटीसाठी अधिक चांगली तयारी करण्यासाठी आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडने आपले 'आकाश अॅप’ लाँच केले.
अॅन्ड्रॉइड प्लेस्टोअर आणि अँपल अॅप स्टोअर या दोन्हीवर उपलब्ध
मुंबई,26जून,2021 :- जेईई (JEE)आणि एनईईटी (NEET) परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि महत्वाच्या संकल्पना उपलब्ध करून देण्यासाठी परीक्षा शैक्षणिक सेवांमध्ये देशव्यापी अग्रगण्य आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (एईएसएल) ने एक नवीन आणि फ्लॅगशिप 'आकाश अॅप' सुरू केले आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध, आकाश अॅप विद्यार्थ्यांना आपल्या घराच्या सुखसोयी आणि सुरक्षिततेपासून अभ्यास सुरू ठेवण्यास मदत करेल. अॅपमध्ये उपलब्ध उच्च प्रतीची सामग्री जेईई /एनईईटी विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल.
अॅन्ड्रॉइड प्लेस्टोअर आणि अँपल अॅप स्टोअर या दोन्हीवर उपलब्ध असलेले आकाश अॅप विद्यार्थ्यांना भारतातील आघाडीच्या शिक्षकांद्वारे ऑनलाइन अभ्यास करण्यास मदत करेल. हा अॅप आकाश आणि बैजूच्या अध्यापनशास्त्रीय शिक्षणावर आधारित आहे आणि जेईई / एनईईटीच्या संपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश असलेल्या संकल्पना व्हिडिओ आणि सराव प्रश्नांच्या मदतीने मार्गदर्शनित शिक्षण प्रदान करतो.
आकाश अॅपच्या लाँचिंगविषयी टिप्पणी करताना आकाश एजुकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड चे (एईएसएल) व्यवस्थापकीय संचालक श्री.आकाश चौधरी म्हणाले, “आकाश येथे आमचे सर्व प्रयत्न 'स्टुडंट फर्स्ट' या दृष्टिकोनातून केले जात आहेत. तंत्रज्ञानामध्ये प्रगतीचा भरीव उपयोग करून, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना विद्यार्थ्यांची अद्वितीय शिकण्याची गरज लक्षात घेऊन आकाश अॅपची रचना केली गेली आहे. हे कधीही स्मार्टफोन, टॅब्लेट सारख्या वैयक्तिक डिव्हाइसच्या मदतीने व्यापक शिक्षण सामग्री प्रदान करेल, मोठ्या संख्येने उमेदवारांना एनईईटी किंवा जेईई सारख्या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करण्यासाठी मदत करेल. अॅप भौगोलिक मर्यादा ओलांडेल आणि या दूरस्थ शिक्षणाच्या युगात विद्यार्थ्यांना घराच्या सोईतून शिकण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यास मदत करेल. ”
Comments
Post a Comment