के.एल.डीम्ड युनिव्हर्सिटीच्या उद्यमी विद्यार्थ्यांनी वायरलेस चार्जिंग असलेली पहिली ई-बाईक तयार केली
के.एल.डीम्ड युनिव्हर्सिटीच्या उद्यमी विद्यार्थ्यांनी
वायरलेस चार्जिंग असलेली पहिली ई-बाईक तयार केली
~ ई-बाईकसाठी वायरलेस चार्जिंग तंत्रज्ञान सध्या जगातील फक्त काही ठिकाणी उपलब्ध आहे ~
मुंबई, 25 जून 2021: देशातील पदवी आणि उच्च शिक्षणासाठी देशातील प्रमुख विद्यापीठांपैकी एक, के.एल. डीम्ड युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली एक अनोखी ई-बाईक (इलेक्ट्रिक बाईक) विकसित केली आहे. ही अभिनव प्रतिकृती विद्यापीठाच्या काही माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने के.एल. विद्युत व इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी विभाग,अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय आणि चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या टीमने विकसित केली आहे. या ई-बाईकमध्ये सेल बॅलन्सिंग आणि वायरलेस चार्जिंग सह अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्ये आहेत जी संपूर्ण जगामध्ये काही ठिकाणीच उपलब्ध आहेत. या टीमने के.एल. ई-बाईकची प्रारंभिक संकल्पना आणि प्रतिकृती डीमड विद्यापीठाने अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये आणि विनामूल्य सुविधा पुरविलेल्या चाचणी सुविधांचा फायदा घेऊन विकसित केली आहे. या टीमला विद्यापीठातील तज्ज्ञ आणि ज्येष्ठ शैक्षणिक तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि सतत प्रतिसाद मिळाला. या विद्यापीठाने या परियोजनेच्या संकल्पनेला एका स्टार्टअपच्या रूपात विकसित करण्यासाठी या टीमला रु. १,४०,००० देण्याचा प्रस्तावही दिला आहे.
के.एल.यु. च्या टीमद्वारे विकसित या ई-बाईकमुळे लोकांसाठी एका अशा चार्जिंग क्षमतेसह ५५ कि.मी. प्रति तास इतक्या अधिकतम वेगाने प्रवास करणे संभव होईल जे मानक परिस्थितीमध्ये एक वेळ चार्ज केल्यावर ८५ ते १०० कि.मी. पर्यंतचे अंतर पार करेल आणि याच्या चार्जिंगसाठी ५ तास लागतात. याच्या चार्जिंग टेक्नॉलॉजीसोबत एक प्रोग्रॅम करण्यायोग्य सेल बॅलन्सिंग सुविधासुद्धा प्रदान केली आहे जी अधिकतम बॅटरी क्षमता प्रदान करते जेणेकरून चार्ज जास्त वेळ चालू शकेल. या टीमने आधीपासूनच अस्तित्त्वात असलेली बाईक रूपांतरित केली आहे आणि त्यास वायरलेस चार्जिंगसह ई-बाईकच्या प्रतिकृतीत रूपांतरित केले आहे. तसेच या बाईकच्या डिझाईनमध्ये अनेक बदल केले ज्यामध्ये कंट्रोलरच्या माध्यमातून बी.एल.डी.सी. मोटर (ब्रशलेस डी.सी. इलेक्ट्रिक मोटर) ला गेअर मोड्युलमध्ये समाविष्ट करणे यांचा समावेश आहे.
या टीमचे अन्य सदस्य जे या परियोजनेचे भाग होते त्यांमध्ये बी.टेक. ई.ई.ई. २०१७ च्या बॅचचे विद्यार्थी श्री चरण साई तिरुवुरी, श्री ए संदीप, श्री किरीती पोलासी, श्री एस लोकेश बाबू, श्री वी साई प्रवीण, आणि ई.ई.ई. विभागाचे माजी विद्यार्थी श्री के. यशवंत साई यांचा समावेश होता.
Comments
Post a Comment