रुणवाल ग्रुपने रुणवाल गार्डन्स डोंबिवली येथे 'साऊथ अव्हेन्यू' लाँच केले
रुणवाल ग्रुपने रुणवाल गार्डन्स डोंबिवली येथे 'साऊथ अव्हेन्यू' लाँच केले
भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट विकसकांपैकी एक असलेल्या रुणवाल ग्रुपने डोंबिवली पूर्वेकडील कल्याण-शिल रोड वर स्थित त्यांच्या रुणवाल गार्डन्स प्रकल्पात नवीन टप्पा 'साऊथ अव्हेन्यू' लाँच करण्याची घोषणा केली. रुणवाल गार्डन्स हे मोकळ्या आणि समृद्धीच्या हिरव्या जागेसह, शॉपिंगचा अनुभव आणि उत्कृष्ट कनेक्टिव्हिटीसह दक्षिण मुंबईची जीवनशैली डोंबिवलीत आणत आहे. साऊथ अव्हेन्यू ही 115 एकरच्या टाउनशिप चा एक भाग आहे ज्यामध्ये 100+ सुविधांसह अनेक उंच निवासी टॉवर्स आहेत.
प्रस्तावित 32 मजल्या, साऊथ अव्हेन्यू मध्ये 50 लाख रुपये इतक्या कमी किंमती पासून सुरु होणाऱ्या प्रशस्त 2 आणि 3 बेड घरे असतील. या टप्प्यातील रहिवासी टाउनशिपमध्ये बांधण्यात येणाऱ्या प्रस्तावित रिटेल स्पेसच्या सर्वात जवळ असतील. या टाउनशिपची सर्वात मोठी यूएसपी म्हणजे त्याचे सुविधाजनक ठिकाण व त्याची ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईशी असणारी उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी. ही इंटिग्रेटेड टाउनशिप वाहतुकीच्या अनेक विद्यमान आणि आगामी सोयींच्या अगदी जवळ आहे. यामध्ये प्रस्तावित कल्याण-तळोजा मेट्रो मार्ग, ऐरोली-कटाई बोगदा रस्ता, वसई-पनवेल रेल्वे आणि विरार-अलिबाग मल्टी-मोडल कॉरिडॉरचा समावेश आहे.
यावेळी बोलताना रुणवाल ग्रुपचे कार्यकारी संचालक श्री रजत रस्तोगी म्हणाले, “रुणवाल गार्डन्स देशातील सर्वात यशस्वी प्रकल्पांपैकी एक आहे ज्या मध्ये 5000 हून अधिक घरे विकली गेली आहेत. ईस्ट अव्हेन्यू, नॉर्थ अव्हेन्यू आणि वेस्ट अव्हेन्यूच्या भव्य यशानंतर, आम्ही आपला सर्वात नवीन विकास, साऊथ अव्हेन्यू रुणवाल गार्डन्स येथे सुरू केल्याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे. साऊथ अव्हेन्यू हा दक्षिण मुंबईच्या उत्कृष्ट जीवनशैली आणि कनेक्टिव्हिटी वर प्रेरित आहे. डोंबिवली हे प्रीमियम सुविधा, पायाभूत सुविधा आणि पैशाचे मूल्य या दृष्टिकोनातून एक उत्कृष्ट ठिकाण आहे आणि साऊथ अव्हेन्यू हे जागतिक दर्जाचे जगण्याचे एक प्रतीक असेल.”
रुणवाल गार्डन्सचे नियोजन तेथील रहिवाशांच्या मूलभूत आणि जीवनशैली गरजा लक्षात घेऊन केले आहे जिथे सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. ह्या प्रकल्पामध्ये जागतिक दर्जाचे रिटेल स्पेस, युरो स्कूल, 11 एकर सेंट्रल पार्क, 14+ गार्डन्स, 21 एकर हिरव्या जागा, 1,17,000 चौरस फुटा मध्ये पसरलेले मोठे क्लबहाऊस, 3.4 किलोमीटर जॉगिंग आणि सायकलिंग ट्रॅक, कार्यालयीन जागा आणि एक बहु-खास रुग्णालय असेल.
Comments
Post a Comment