हृदयातील मिट्रल वाल्वसाठी किमान तीव्रता असलेली शस्त्रक्रिया (मिनिमल इन्वॅसिव्ह शस्त्रक्रिया)

 



 

हृदयातील मिट्रल वाल्वसाठी किमान तीव्रता असलेली शस्त्रक्रिया (मिनिमल इन्वॅसिव्ह शस्त्रक्रिया)

मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट हॉस्पिटलमध्ये 2 रुग्णांवर हृदयातल्या मिट्रल वाल्वसाठी किमान तीव्रता असलेली शस्त्रक्रिया (मिनिमल इन्वॅसिव्ह शस्त्रक्रिया) यशस्वीरित्या पार पडली.

मुंबईमध्ये दुर्मिळपणे करण्यात येणारी किमान तीव्रता असलेली शस्त्रक्रिया (मिनिमल इन्वॅसिव्ह शस्त्रक्रिया) जगभरामध्ये मोठ्याप्रमाणावर ज्ञात आहे. पण हा हृदय शस्त्रक्रियेचा प्रकार भारतामध्ये नवीन आहे.

मुंबई : वॉकहार्ट हॉस्पिटल मधील कार्डिओ थोरिऍक सर्जन डॉ. मंगेश कोहळे (Dr. Mangesh Kohale, Cardio Thoriac Surgeon) यांच्या नेतृत्वाखाली संघाने 65 वर्षे वयाच्या सुश्री रिध्दी शाह (नाव बदलण्यात अले आहे) अणि 56 वर्षे वयाच्या श्री गणेश तरे (नाव बदलण्यात आले आहे) या 2 रुग्णांवर किमान तीव्रता/आक्रमक असलेली शस्त्रक्रिया (मिनिमल इन्वॅसिव्ह शस्त्रक्रिया) करण्यात आली. किमान तीव्रता/आक्रमक असलेली शस्त्रक्रिया (मिनिमल इन्वॅसिव्ह शस्त्रक्रिया) हा हृदय शस्त्रक्रियेचा प्रकार भारतामध्ये नवीन आहे. कोरोनरी हार्ट डिसीजच्या उपचारासाठी कोरोनरी बायपास करण्याचे हे तंत्र तुलनेने नवीन आणि अद्ययावत आहे. या तंत्रात 4-6 सेमीच्या लहान छेदामार्फत हृदयापर्यंत पोहोचले जाते. हा छेद निप्पलच्या अगदी खाली दिला जातो. हाडांना कापता, स्नायूला भेदून हाडाच्या सापळ्यामधून छातीत प्रवेश केला जातो.

सुश्री रिध्दी शहा (नाव बदलण्यात आले आहे) यांना श्वास लागण्याची तक्रार होती. 2डेको केल्यानंतर मिट्रल वाल्वचा आजार निदर्शनास आला आणि रिप्लेसमेंट उपचाराचा सल्ला देण्यात आला. डॉ. मंगेश कोहळे (Dr Mangesh Kohale) आणि संघाने छातीच्या उजव्या बाजूला खाली 6 सेमी लहान छेदासह मिट्रल वाल्वची किमान तीव्र/आक्रमक असलेली शस्त्रक्रिया(मिनिमल इन्वॅसिव्ह शस्त्रक्रिया) केली. 56 वर्षे वयाच्या श्री गणेश तरे (नाव बदलेले आहे) यांना गेल्या 2 महिन्यांपासून छातीत तीव्र वेदना होत होत्या आणि मुख्य धमनीमध्ये 90% गंभीर ब्लॉकेज होते. डॉ. कोहळे त्यांच्या संघाने छातीच्या डाव्या बाजूला 6 सेमी छेद करुन कमी तीव्र (मिनिमल इन्वॅसिव्ह) बायपास शस्त्रक्रिया केली.

कोरोनरी आर्टरी बायपास शत्रक्रिया (सीएबीजी) आणि वाल्व रिप्लेसमेंट कराव्या लागणा-या वयोवृध्द रुग्णांची संख्या वाढत आहे. दोन्ही केसेसमध्ये डॉ. कोहळ्यांनी केलेली किमान तीव्रता/आक्रमक शस्त्रक्रिया (मिनिमल इन्वॅसिव्ह शस्त्रक्रिया) मुंबईमध्ये नवीन आहे. किमान तीव्रता शस्त्रक्रिया (मिनिमल इन्वॅसिव्ह शस्त्रक्रिया) प्रत्येक रुग्णावर करता येत नाही. व्यक्तीला अगदी मोजके रुग्ण निवडावे लागतात, कारण हृदयात पाहण्यासाठी आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी अतिशय कमी जागा उपलब्ध असते, त्यामुळे रुग्णांची निवड अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावते. आत्तापर्यंत 15-20% रुटिन शस्त्रक्रिया रुग्णांवर किमान तीव्र/आक्रमक शस्त्रक्रिया होऊ शकते, नंतर हा आकडा वाढू देखील शकतो.

मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट हॉस्पिटलमधले कार्डिओ थोरिऍक सर्जन डॉ. मंगेश कोहळे म्हणतात,” हाडांना कापले जाणे या वास्तविकतेसारखे किमान तीव्रता (मिनिमल इन्वॅसिव्ह) असलेल्या कार्डिऍक शस्त्रक्रियेचे पारंपारिक तंत्रांच्या तुलनेत बरेच फायदे आढळतात. यामुळे वेदना कमी होण्यासारखे लाभ मिळतात त्याचप्रमाणे रुग्ण ड्रायव्हिंग किंवा इतर कार्यांना आंतर्भूत करत सर्वसामान्य जीवन जगू शकतात. बहुतांश रुग्णांमध्ये रक्ताचा व्यय कमी होण्यामुळे ब्लड ट्रान्सफ्युजनची आवश्यकता भासत नसल्यामुळे रक्तामुळे होणा-या संक्रमणांपासून बचाव होतो. यामुळे संक्रमणाला कमी प्रतिरोध असलेल्या मधुमेह असणा-या आणि वयस्क रुग्णांसाठी ही प्रक्रिया आदर्श ठरते.

कार्डिऍक शस्त्रक्रिया पारंपारिकरित्या नॉन कॉस्मेटिक होती, ती आता केवळ 5-6 सेमीच्या छेदासह कॉस्मेटिक होत आहे. या सर्व लाभांमुळे हॉस्पिटलमध्ये राहण्याचा कालावधी कमी होतो आणि अगदी कमी वेळात बरे होता येते. सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे हृदयात असलेल्या स्थानाला गौण मानत सर्व ब्लॉक्स सुरक्षित अपेक्षित पध्दतीने बायपास करता येतात.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24