क्रिस्टल हिअरिंग सोल्युशन्सचे मुंबईत पदार्पण, मुंबईतील पहिले एक्स्क्लुसिव्ह सिग्निया मान्यताप्राप्त साउंड सेंटर सुरू


क्रिस्टल हिअरिंग सोल्युशन्सचे मुंबईत पदार्पण, मुंबईतील पहिले एक्स्क्लुसिव्ह सिग्निया मान्यताप्राप्त साउंड सेंटर सुरू

 


मुंबई, २७ जुलै २०२१ : श्रवणयंत्र स्पेशालिस्ट क्रिस्टर हिअरिंग सोल्युशन्स यांच्या मुंबईतील चेंबूर येथील नव्या एक्सक्लुसिव्ह साउंड सेंटरचे उद्घाटन झाले. या निमित्ताने त्यांनी पश्चिम विभागामध्ये पदार्पण केले आहे. या नव्या सेंटरच्या निमित्ताने क्रिस्टल हिअरिंग सोल्यूशन्स या एका सर्वात जुन्या श्रवण यंत्र केंद्रातर्फे मुंबईतील उत्कृष्ट श्रवण यंत्र केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

 

क्रिस्टल हिअरिंग सोल्यूशन्स हे सिव्हान्तोस इंडिया प्रा. लि. (पूर्वीचे सिमेन्स हिअरिंग इन्स्ट्रुमेंट्स प्रा. लि.) आणि ब्रँड सिग्नियाचे अधिकृत प्लॅटिनम भागीदार असून श्रवण यंत्र सेगमेंटमध्ये ही एक आघाडीची कंपनी आहे. या कंपनीतर्फे त्यांच्या अत्याधुनिक निदान सुविधा केंद्रांमध्ये जागतिक दर्जाची हिअरिंग सोल्यूशन्स (श्रवण उपाययोजना) उपलब्ध करून देण्यात येतात.

 

क्रिस्टल हिअरिंग सोल्यूशन्सची स्थापना २००५ साली झाली. सिग्निया हिअरिंग एड्स विक्री आणि सेवा यांच्या प्युअर टोन ऑडियोमेट्री आणि टिम्पॅनोमेट्रीच्या साहाय्याने ऐकण्याच्या क्षमतेचे निदान करणे ही त्यांची स्पेशॅलिटी आहे. दर्जा, सेवा, मूल्ये आणि ग्राहकांशी आयुष्यभराचे नाते जोडणे ही त्यांची बलस्थाने आहेत.

 

आकडेवारीनुसार जगातील ५% हून अधिक लोकसंख्या किंवा सुमारे ४७ कोटी लोकांना त्यांच्या श्रवणक्षमतेमध्ये असलेल्या व्यंगावर उपचार करण्याची आवश्यकता आहे. यात मुलांचाही समावेश आहे. २०५० सालापर्यंत सुमारे ७० कोटी व्यक्तींच्या किंवा दर १० पैकी एका व्यक्तीच्या श्रवणक्षमतेमध्ये समस्या निर्माण झालेली असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 

"कोणत्याही व्यक्तीची, कोणत्याही वयात श्रवणक्षमता कमी होऊ शकते. पण त्यामुळे सामान्य आयुष्यावर परिणाम होण्याचे कारण नाही. आमच्या नव्या तंत्रज्ञानाने युक्त असलेली सिग्निया श्रवण यंत्रे अशा व्यक्तींची श्रवणक्षमतेमध्ये सुधारणा करतात आणि त्यांना विना अडथळा जगण्याचा आत्मविश्वास देतात.", असे क्रिस्टल हिअरिंग सोल्यूशन्सचे भागीदार विवेक व्ही. अय्यर म्हणतात.

 

 

 

मुंबईच्या बाजारपेठेत पदार्पण करत या शहरातील मोठ्या लोकसंख्येला सेवा पुरविण्याची कंपनीची योजना आहे. आतापर्यंत क्रिस्टल हिअरिंग सोल्यूशन्स दक्षिण मुंबईत आणि मुंबईच्या उपनगरांमध्ये अस्तित्व होते.

कोव्हिडोत्तर रिकव्हरी कालावधीमध्ये लोकांकडून श्रवणक्षमता कमी झाल्याच्या तक्रारींमध्ये अचानक वाढ होत असल्याच्या परिस्थितीत हे विस्तारीकरण होत आहे.

 

"आमच्या ग्राहकांना जागतिक दर्जाची श्रवण यंत्रे पुरविणे आणि विक्रीपश्चात सेवा देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. क्लिनिकमधील प्रशिक्षित आणि क्वालिफाइड ऑडियोलॉजिस्टची आमची टीम लोकांना उत्तम उत्पादने आणि सेवांविषयी मार्गदर्शन देते जेणेकरून त्यांच्या श्रवणयंत्रांचा त्यांना कमाल उपयोग होऊ शकेल.", असे क्रिस्टल हिअरिंग सोल्यूशन्सचे दुसरे भागीदार राजीव लखानी म्हणाले.

 

लोकांना अधिक स्पष्टपणे ऐकण्यासाठी सिग्नियाचे ब्रेकथ्रू तंत्रज्ञान वेगवेगळे पर्याय आणि कस्टमायझेशन्स उपलब्ध करून देते. त्याचप्रमाणे नैसर्गिकपणे ऐकू येणारा स्वतःचा आवाज आणि थेट स्ट्रीमिंगसह तडजोड न केलेली श्राव्यता (ऑडिबिलिटी) मिळते.

 

यामुळे वाणी स्पष्ट होते आणि संवाद सुलभ होतो. ब्ल्यूटूथ, रिचार्ज करता येण्याजोगी आणि जगातील पहिला इंटिग्रेटेड अॅकॉस्टिक मोशन सेन्सर असलेल्या सिग्नियाची श्रवणयंत्रे रु.८९९९/- पासून सुरू होतात. अधिक माहितीसाठी कृपया क्रिस्टल हिअरिंग सोल्यूशन्सच्या www.crystalhearingsolutions.in या वेबसाइटला भेट द्या.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202